किनवट येथे १ ऑक्टोबरला भव्य मोफत आरोग्य महाशिबिर

मोतीबिंदू, श्रवणदोष, दात, रक्तदाब व रक्तातील साखरेची होणार तपासणी; गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन
किनवट, प्रतिनिधी| गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचाराचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने श्री साईकृपा विश्वस्त मंडळाच्या वतीने गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईबाबा मंदिर, किनवट येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाशिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी व मार्गदर्शन, कमी ऐकू येणे अथवा श्रवणासंबंधी तक्रारींची तपासणी, दातांची तपासणी, रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व पुढील उपचाराबाबत सल्ला दिला जाणार आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून, नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या आरोग्य महाशिबिरासाठी अधिक माहितीसाठी पवार गुरु स्वामी यांच्याशी मोबाईल क्रमांक ९८५०६३१९९१ वर संपर्क साधता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!