करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेडमध्ये अवतरली पंढरी; गुजराती हायस्कूलच्या दिंडीने भाविकांना दिला विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय अनुभव

नांदेडमध्ये अवतरली पंढरी; गुजराती हायस्कूलच्या दिंडीने भाविकांना दिला विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय अनुभव

करियर
नांदेड| आषाढी वारीची भक्तिभावाने ओथंबलेली परंपरा आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर सोमवारी नांदेडच्या रस्त्यांवर अक्षरशः अवतरला. गुजराती हायस्कूल, नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पायी दिंडीने शहरातील नागरिक आणि पालकांना साक्षात पंढरपूरच्या वारीचा दिव्य अनुभव दिला. सकाळी सात वाजता शाळेच्या परिसरातून टाळ-मृदंग, वीणेचे सूर, अभंगांचा निनाद आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "पांडुरंग हरी"च्या जयघोषात दिंडीला प्रारंभ झाला. वारकरी वेशभूषेत सजलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भगव्या पताका आणि मुखी विठ्ठलनाम... हे दृश्य पाहून नांदेडकर क्षणभर पंढरपूरच्या पावन भूमीतच पोहोचल्याची अनुभूती घेत होते. दिंडीचे शहरातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आरती आणि भक्तिभावाने दिंडीचे स्वागत झाल्याने वातावरण अधिकच मंगलमय झाले. दिंडीतील पारंपरिक रिंगण सो...
हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय ‘विद्यार्थी दिंडी’

हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय ‘विद्यार्थी दिंडी’

करियर
भजन, भारूड आणि कवायतीतून साकारला विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आषाढी एकादशीनिमित्त येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनेविठ्ठल रुख्मिणीचा सजीव देखावा असलेली दिंडीच्या अनुषंगाने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक रणखांब सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरून भक्तिमय वातावरणात दिंडी काढली आणि विठू नामाचा गजर केल्याने शहरांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा साकारला. विद्यार्थ्यांनी भजन, भारूड आणि विविध कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शहरात आषाढी वारीचे चित्र निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून वारकरी स...
‘शिक्षणाची वारी… विठ्ठलाच्या दारी!’ जि.प. शाळा वांगीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी महोत्सवातून साकारली भक्तिमय दिंडी

‘शिक्षणाची वारी… विठ्ठलाच्या दारी!’ जि.प. शाळा वांगीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी महोत्सवातून साकारली भक्तिमय दिंडी

करियर
वांगी| आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीची अनुभूती देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगीच्या विद्यार्थ्यांनी ‘शिक्षणाची वारी... विठ्ठलाच्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा धारण करून टाळ, वीणा आणि मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठल-रखुमाईच्या पूर्णाकृती मूर्तीसह गावातून भव्य दिंडी काढली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या आषाढी महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, अभंग, लोकगीते आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून गावातील नागरिकांना पंढरपूरच्या वारीचा अनुभव मिळाला. तसेच ‘ग्रंथ दिंडी’च्या माध्यमातून शिक्षण आणि संस्कृतीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांमुळे...
आष्टी हायस्कूलमध्ये २३७ विद्यार्थ्यांसाठी केवळ ७ शिक्षक!

आष्टी हायस्कूलमध्ये २३७ विद्यार्थ्यांसाठी केवळ ७ शिक्षक!

करियर
एकाच शिक्षकावर सात विषयांची जबाबदारी; विद्यार्थ्यांचा संताप, प्रतिनियुक्तीवरील शिक्षकाला परत आणण्याची मागणी हदगाव | तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, आष्टी येथे शिक्षकांची कमतरता दिवसेंदिवस गंभीर होत असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याची तक्रार पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. २३७ विद्यार्थ्यांसाठी दहा वर्ग आणि केवळ सात शिक्षक अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने शाळेतील अध्यापन व्यवस्था अक्षरशः ताणली गेली आहे. या प्रश्नाकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. २२ जुलै) शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थांनी पंचायत समिती हदगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सन २०२२ पासून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले विषय शिक्षक आर. बी. राठोड यांना तातडीने मूळ शाळेत परत आणावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. ...
एसजीजीएसआयई अँड टी.च्या दोन विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित ‘एलएफएक्स मेंटरशिप २०२६’साठी निवड

एसजीजीएसआयई अँड टी.च्या दोन विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित ‘एलएफएक्स मेंटरशिप २०२६’साठी निवड

करियर
राहुल अत्राम व तुषार पटले यांची आंतरराष्ट्रीय ओपन-सोर्स प्रकल्पांसाठी निवड; प्रत्येकी मिळणार सुमारे २.८० लाखांचे मानधन नांदेड | श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था (एसजीजीएसआयई अँड टी.), विष्णुपुरी, नांदेडच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी राहुल अत्राम आणि तुषार पटले यांची जगभरातील प्रतिष्ठित लिनक्स फाऊंडेशन एलएफएक्स मेंटरशिप प्रोग्राम २०२६ (टर्म-२) साठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राहुल अत्राम यांची क्लाऊड नेटिव्ह कॉम्प्युटिंग फाऊंडेशन (सीएनसीएफ) – रिस्क-फाइव्ह इंटरनॅशनल अंतर्गत ‘रिस्क-फाइव्ह एक्स्टेन्शन्स लँडस्केप’ या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. तर तुषार पटले यांची सीएनसीएफ – क्यूबएज अंतर्गत ‘अल्टरनेटिव्ह फॉर आयपीटेबल मॅनेजर व्हाया एपीआय सर्व्हर रिडायरेक्शन’ या प्र...
आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांचा निर्णय

आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांचा निर्णय

करियर
कामारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात कारवाईची मागणी; सात दिवसांत चौकशीचे आश्वासन हिमायतनगर, अनिल मादसवार| मौजे कामारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कारमोड सर यांच्याविरोधात तात्काळ शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिगंबर विठ्ठलराव शिरफुले व वैभव प्रकाशराव नरवाडे यांनी २१ जुलै २०२६ पासून शाळेच्या प्रांगणात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, उपशिक्षणाधिकारी यांच्या वतीने आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या लेखी आश्वासनाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांकडून स्वीकारताना उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या साक्षीने आंदोलकांनी प्रशासनावर विश्व...
बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शिक्षण संचालक डॉ. हेमंत वसेकर यांची पीएम श्री हायस्कूलला प्रेरणादायी भेट

बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शिक्षण संचालक डॉ. हेमंत वसेकर यांची पीएम श्री हायस्कूलला प्रेरणादायी भेट

करियर
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक; शिक्षकांना निपुण भारत व PAT संदर्भात मार्गदर्शन हदगाव/नांदेड, प्रतिनिधी| पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल, हदगाव येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी सदिच्छा भेट देत शाळेची पाहणी केली. त्यांच्या या भेटीमुळे शाळेच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळण्यासोबतच विद्यार्थी आणि शिक्षकांना नवी प्रेरणा मिळाली. डॉ. वसेकर यांच्यासोबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नांदेडचे प्राचार्य अमोल निळेकर, वरिष्ठ अधिव्याख्याता बालाजी शेळके आणि अधिव्याख्याता शिवाजी साखरे उपस्थित होते. या भेटीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे डॉ. वसेकर यांचे वडील सन १९७१ ते १९७७ या कालावधीत याच शाळेत राजपत्रित मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्या काळात डॉ. वसेकर यांचे बालपण हदगावमध्ये गेले. अनेक वर्षांनंतर आपल्या बालपणीच्या आठवणी...
पीपल्स हायस्कूलमध्ये गीता परिवारातर्फे विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण

पीपल्स हायस्कूलमध्ये गीता परिवारातर्फे विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण

करियर
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन नांदेड | नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे गीता परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए डॉ. प्रवीण पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सदिच्छा सोनी, शालेय समितीचे अध्यक्ष स. नौनिहाल सिंग जहागीरदार, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड. कॉ. प्रदीप नागापूरकर, ॲड. चिरंजीलाल दागडिया, गीता परिवाराच्या अध्यक्षा सौ. सारिका बंग, कोषाध्यक्ष नारायण मामडी, सचिव डॉ. उर्मिला मालू तसेच मुख्याध्यापक प्रशांत चौधरी यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाष...
महाराष्ट्र भूषण भाग्यश्री जाधव यांचा संघर्षमय जीवनप्रवास आता शालेय अभ्यासक्रमात!

महाराष्ट्र भूषण भाग्यश्री जाधव यांचा संघर्षमय जीवनप्रवास आता शालेय अभ्यासक्रमात!

करियर
बालभारतीच्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता तिसरीच्या पुस्तकात ‘Struggler Bhagyashree Jadhav’ धडा नांदेड| नांदेड जिल्ह्याची भूमिकन्या आणि महाराष्ट्र भूषण आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची दखल आता राज्याच्या शालेय अभ्यासक्रमाने घेतली आहे. त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित धडा यावर्षीपासून बालभारतीच्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री जाधव यांनी अवघ्या अकरा वर्षांच्या क्रीडा प्रवासात गोळाफेक आणि भालाफेक या क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पॅरा ऑलिम्पिक आणि वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारता...
‘छत्रपती शिवाजी महाराज : विचारधारा आणि व्यवस्थापन’ विषयात एम.ए. अभ्यासक्रम सुरू करा

‘छत्रपती शिवाजी महाराज : विचारधारा आणि व्यवस्थापन’ विषयात एम.ए. अभ्यासक्रम सुरू करा

करियर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराज : विचारधारा आणि व्यवस्थापन’ या विषयात एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन लक्ष्यवेध फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल मोरे आणि उपाध्यक्ष तथा निवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, राष्ट्रनीती, लोककल्याणकारी प्रशासन, नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन तत्त्वांचा शैक्षणिक पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रशासन, न्यायव्यवस्था, राष्ट्रनिष्ठा, लोककल्याण आणि दूरदृष्टीच्या दृष्टी...
error: Content is protected !!