हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय ‘विद्यार्थी दिंडी’

भजन, भारूड आणि कवायतीतून साकारला विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आषाढी एकादशीनिमित्त येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनेविठ्ठल रुख्मिणीचा सजीव देखावा असलेली दिंडीच्या अनुषंगाने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक रणखांब सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरून भक्तिमय वातावरणात दिंडी काढली आणि विठू नामाचा गजर केल्याने शहरांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा साकारला. विद्यार्थ्यांनी भजन, भारूड आणि विविध कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शहरात आषाढी वारीचे चित्र निर्माण झाले होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘शिक्षणासोबत संस्कार आणि संस्कृतीची जपणूक’ हा संदेश दिला.

दरम्यान, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमेटीचे पदाधिकारी, पंचायत समिती, नगरपंचायत तसेच पोलिस स्टेशनच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी दिंडीला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेचे संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आषाढी महोत्सवाला भक्तिमय आणि सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली. शाळेच्या या उपक्रमाचे पालक, नागरिक आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!