पीपल्स हायस्कूलमध्ये गीता परिवारातर्फे विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण

सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन

नांदेड | नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे गीता परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए डॉ. प्रवीण पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सदिच्छा सोनी, शालेय समितीचे अध्यक्ष स. नौनिहाल सिंग जहागीरदार, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड. कॉ. प्रदीप नागापूरकर, ॲड. चिरंजीलाल दागडिया, गीता परिवाराच्या अध्यक्षा सौ. सारिका बंग, कोषाध्यक्ष नारायण मामडी, सचिव डॉ. उर्मिला मालू तसेच मुख्याध्यापक प्रशांत चौधरी यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात सीए डॉ. प्रवीण पाटील म्हणाले की, गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये जात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत असा भेदभाव दिसून येत नाही. आपण सर्व समान आहोत, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते. गीता परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वासही वाढतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा सावले यांनी केले, तर बंग यांनी आभार मानले. पीपल्स हायस्कूल आणि गीता परिवाराच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून गीता परिवाराचे आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!