करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

मराठी ही रोजगाराभिमुख भाषा; विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य विकसित करावे : राम तरटे

मराठी ही रोजगाराभिमुख भाषा; विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य विकसित करावे : राम तरटे

करियर
यशवंत महाविद्यालयातील उद्घोधन वर्गात मार्गदर्शन; 'बारा आण्याची बोंब' कथाकथनाने रंगली मैफल नांदेड | मराठी भाषा ही केवळ साहित्यापुरती मर्यादित नसून पत्रकारिता, कथालेखन, संपादन, मुद्रितशोधन, अनुवाद, आशयलेखन (कंटेंट रायटिंग), माध्यम क्षेत्र तसेच स्पर्धा परीक्षांमध्येही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणारी भाषा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी केले. यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात आयोजित उद्घोधन वर्गात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. राम तरटे यांनी विद्यार्थ्यांना मराठी विषयातील करिअरच्या विविध संधींची सविस्तर माहिती देत, पत्रकारिता, संपादन, मुद्रितशोधन, अनुवाद, माध्यम क्षेत्र आणि आशयलेखनात मराठी जाणकारांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सा...
बेटक बिलोली जि.प. शाळेचे शिक्षक आयुबखान पठाण यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा उत्साहात

बेटक बिलोली जि.प. शाळेचे शिक्षक आयुबखान पठाण यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा उत्साहात

करियर
हिमायतनगर, प्रतिनिधी| बेटक बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आयुबखान चाँदखान पठाण हे ३१ जुलै रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यासाठी ग्रामस्थ, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींच्या वतीने सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा १ ऑगस्ट रोजी नरसी येथील आदित्य गार्डन (फंक्शन हॉल) येथे उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला प्रकाश पाटील भिलवंडे, सरपंच सौ. सविताताई राहुल पाटील नकाते, शिक्षण विस्तार अधिकारी उद्धव ढगे, केंद्रप्रमुख उमाकांत डिंगणे, केंद्रप्रमुख कपिलेश्वर नलबलवार, वीरभद्र मिरेवाड, मंगनाळे, राहुल पाटील नकाते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सदस्य सुरेश पवार, रामकिशन पवार, गजानन नकाते, माजी चेअरमन माणिकराव भरकांड तसेच पोलीस पाटील भागवत पाटील भ...
RRB परीक्षार्थ्यांसाठी दिलासा; जालना–रायचूर एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त जनरल डबे

RRB परीक्षार्थ्यांसाठी दिलासा; जालना–रायचूर एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त जनरल डबे

करियर
1 ते 7 ऑगस्टदरम्यान वाढीव सुविधा; परीक्षार्थ्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय नांदेड, प्रतिनिधी| रेल्वे भरती बोर्ड (RRB) परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या उमेदवारांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गाडी क्रमांक 17663/17664 जालना–रायचूर–जालना एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त जनरल सेकंड क्लास (GS) डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. 17663 (जालना–रायचूर) ला 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत जालना येथून सुटणाऱ्या प्रत्येक फेरीमध्ये दोन अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार आहेत. तसेच गाडी क्र. 17664 (रायचूर–जालना) ला 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत रायचूर येथून सुटणाऱ्या प्रत्येक फेरीमध्ये हे अतिरिक्त डबे उपलब्ध असतील. आरआरबी परीक्षार्थ्यांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुव...
राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंगमध्ये स्वारातीम विद्यापीठ देशात १२ व्या क्रमांकावर; ९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’

राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंगमध्ये स्वारातीम विद्यापीठ देशात १२ व्या क्रमांकावर; ९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’

करियर
नांदेड|  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (स्वारातीम) राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग (NGUR) २०२६ मध्ये देशात १२ वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यापीठाला १०० पैकी ९२.५ गुण मिळाले असून 'गोल्ड रेटिंग' प्राप्त झाली आहे. आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी आणि केंद्रीय विद्यापीठांसह देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये हे यश मिळविल्याने विद्यापीठाच्या शाश्वत विकास उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. या यशामुळे विद्यापीठाला न्यूयॉर्क येथे होणाऱ्या '10th NYC Green School Conference 2026' मध्ये आंतरराष्ट्रीय सन्मानासाठी निमंत्रण मिळाले आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक अकृषिक विद्यापीठांमध्ये या क्रमवारीत स्थान मिळविणारे स्वारातीम हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे. पर्यावरणीय प्रशासन, जैवविविधता, कार्बन व हवामान कृती, हरित पायाभूत सुविधा, ऊर्जा कार्यक्षमता, जलव्यवस्थापन, क...
वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज; विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज; विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

करियर
नांदेड | रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आयोजित विशेष वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. "वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून सुरक्षित वाहतूक ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच रस्ता सुरक्षेचे नियम अंगीकारून जबाबदार नागरिक बनावे," असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला सेफ इंडिया रोड्स व अँटीकरप्शन टीम इंडियाचे डायरेक्टर घनश्याम ओझा, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जासपाल सिंग कोर्टतीर्थवाले, पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाळेतील विज्ञान विभा...
आषाढी एकादशीनिमित्त सवना जिल्हा परिषद शाळेत भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा अनोखा संगम

आषाढी एकादशीनिमित्त सवना जिल्हा परिषद शाळेत भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा अनोखा संगम

करियर
हिमायतनगर, प्रतिनिधी| आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सवना ज. येथे 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत भक्ती, संस्कार आणि अनुभवाधारित शिक्षणाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय झाला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानदिंडी काढत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ यांच्या विचारांचा जागर केला. अभंग गायन, भजन, संतवाणी, नामस्मरण आणि संतांच्या जीवनकार्याचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनाचा संदेश दिला. "विठ्ठल विठ्ठल" आणि "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषाने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती,...
कृत्रिम बुद्धिमत्ता वैद्यकीय क्षेत्रासाठी ठरणार वरदान; शैक्षणिक प्रायमर कार्यक्रम संपन्न

कृत्रिम बुद्धिमत्ता वैद्यकीय क्षेत्रासाठी ठरणार वरदान; शैक्षणिक प्रायमर कार्यक्रम संपन्न

करियर
"Al in Medical Practice & Interesting Clinical Cases in Medicine" नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड तसेच Association of Physicians of India (API), Nanded यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या पुढाकाराने "Al in Medical Practice & Interesting Clinical Cases in Medicine " या विषयावरील शैक्षणिक प्रायमर कार्यक्रमाचे आयोजन २६ जुलै रोजी दुपारी २ ते ४ यावेळेमध्ये महाविद्यालयातील पी.एस.एम. लेक्चर हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षक, तज्ज्ञ डॉक्टर, ज्येष्ठ चिकित्सक, एम.बी.बी.एस. (UG) विद्यार्थी, इंटर्न (Intern) विद्यार्थी, पदव्युत्तर (PG) विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी "Al in Medical Practice" या विषयावर ...
नांदेडमध्ये अवतरली पंढरी; गुजराती हायस्कूलच्या दिंडीने भाविकांना दिला विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय अनुभव

नांदेडमध्ये अवतरली पंढरी; गुजराती हायस्कूलच्या दिंडीने भाविकांना दिला विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय अनुभव

करियर
नांदेड| आषाढी वारीची भक्तिभावाने ओथंबलेली परंपरा आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर सोमवारी नांदेडच्या रस्त्यांवर अक्षरशः अवतरला. गुजराती हायस्कूल, नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पायी दिंडीने शहरातील नागरिक आणि पालकांना साक्षात पंढरपूरच्या वारीचा दिव्य अनुभव दिला. सकाळी सात वाजता शाळेच्या परिसरातून टाळ-मृदंग, वीणेचे सूर, अभंगांचा निनाद आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "पांडुरंग हरी"च्या जयघोषात दिंडीला प्रारंभ झाला. वारकरी वेशभूषेत सजलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भगव्या पताका आणि मुखी विठ्ठलनाम... हे दृश्य पाहून नांदेडकर क्षणभर पंढरपूरच्या पावन भूमीतच पोहोचल्याची अनुभूती घेत होते. दिंडीचे शहरातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आरती आणि भक्तिभावाने दिंडीचे स्वागत झाल्याने वातावरण अधिकच मंगलमय झाले. दिंडीतील पारंपरिक रिंगण सो...
हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय ‘विद्यार्थी दिंडी’

हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय ‘विद्यार्थी दिंडी’

करियर
भजन, भारूड आणि कवायतीतून साकारला विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आषाढी एकादशीनिमित्त येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनेविठ्ठल रुख्मिणीचा सजीव देखावा असलेली दिंडीच्या अनुषंगाने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक रणखांब सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरून भक्तिमय वातावरणात दिंडी काढली आणि विठू नामाचा गजर केल्याने शहरांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा साकारला. विद्यार्थ्यांनी भजन, भारूड आणि विविध कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शहरात आषाढी वारीचे चित्र निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून वारकरी स...
‘शिक्षणाची वारी… विठ्ठलाच्या दारी!’ जि.प. शाळा वांगीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी महोत्सवातून साकारली भक्तिमय दिंडी

‘शिक्षणाची वारी… विठ्ठलाच्या दारी!’ जि.प. शाळा वांगीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी महोत्सवातून साकारली भक्तिमय दिंडी

करियर
वांगी| आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीची अनुभूती देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगीच्या विद्यार्थ्यांनी ‘शिक्षणाची वारी... विठ्ठलाच्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा धारण करून टाळ, वीणा आणि मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठल-रखुमाईच्या पूर्णाकृती मूर्तीसह गावातून भव्य दिंडी काढली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या आषाढी महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, अभंग, लोकगीते आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून गावातील नागरिकांना पंढरपूरच्या वारीचा अनुभव मिळाला. तसेच ‘ग्रंथ दिंडी’च्या माध्यमातून शिक्षण आणि संस्कृतीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांमुळे...
error: Content is protected !!