RRB परीक्षार्थ्यांसाठी दिलासा; जालना–रायचूर एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त जनरल डबे

1 ते 7 ऑगस्टदरम्यान वाढीव सुविधा; परीक्षार्थ्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय

नांदेड, प्रतिनिधी| रेल्वे भरती बोर्ड (RRB) परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या उमेदवारांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गाडी क्रमांक 17663/17664 जालना–रायचूर–जालना एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त जनरल सेकंड क्लास (GS) डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. 17663 (जालना–रायचूर) ला 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत जालना येथून सुटणाऱ्या प्रत्येक फेरीमध्ये दोन अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार आहेत.

तसेच गाडी क्र. 17664 (रायचूर–जालना) ला 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत रायचूर येथून सुटणाऱ्या प्रत्येक फेरीमध्ये हे अतिरिक्त डबे उपलब्ध असतील.

आरआरबी परीक्षार्थ्यांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने स्पष्ट केले आहे.

रेल्वे प्रशासनाने सर्व परीक्षार्थी आणि प्रवाशांना या अतिरिक्त सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, प्रवासापूर्वी रेल्वेच्या वेळापत्रकाची व गाडीच्या तपशीलाची खातरजमा करूनच प्रवास करण्याचेही सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!