करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

प्रथमेशच्या वैद्यकीय स्वप्नांना नवे बळ; कॅप्टन आशिष दामले यांची ₹1 लाखांची मदत

प्रथमेशच्या वैद्यकीय स्वप्नांना नवे बळ; कॅप्टन आशिष दामले यांची ₹1 लाखांची मदत

करियर
आर्थिक संकटातही शिक्षण सुरू ठेवणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थ्याला समाजाचा हात; निखिल लातूरकर यांच्या पुढाकारातून मदतीची साखळी उभी नांदेड| जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर समाजही मदतीचा हात पुढे करतो, याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये समोर आले आहे. आर्थिक अडचणींशी झुंज देत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रथमेश शशिकांत देशमुख या विद्यार्थ्यास कॅप्टन आशिष दामले यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. ही मदत पत्रकारांच्या उपस्थितीत प्रथमेशचे वडील शशिकांत देशमुख आणि आई सविता देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमासाठी निखिल लातूरकर यांनी पुढाकार घेत विविध स्तरांवर मदतीचे प्रयत्न केले. प्रथमेश सध्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्याने शिक्षणाची वाट सोडलेली नाही. त्याचे वडील पुण्यात डीटीपी ऑपरेटर म्हणून काम कर...
ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांना ‘झुंजार पत्रकार’ पुरस्काराने गौरव

ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांना ‘झुंजार पत्रकार’ पुरस्काराने गौरव

करियर
नांदेड (प्रतिनिधी) शब्दांची शस्त्रे हातात घेऊन समाजहितासाठी अविरत लढणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान होताना अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. सामना वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी तसेच राज्य शासनाच्या अधिस्वीकृती मंडळाचे लातूर विभागाचे अध्यक्ष आणि मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष विजय जोशी यांना ‘झुंजार पत्रकार’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा प्रेरणादायी सोहळा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने आयोजित परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात पार पडला. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना विजय जोशी यांनी सांगितले, “हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, समाजाने ठेवलेला विश्वास अधिक जबाबदारीने पेलण्याचा प्रयत्न करीन. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून कार्य क...
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हदगाव तालुक्यातील दोन सख्खे भाऊ विना-कोचिंग बनले स्थापत्य अभियंता

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हदगाव तालुक्यातील दोन सख्खे भाऊ विना-कोचिंग बनले स्थापत्य अभियंता

करियर
हदगाव,गौतम वाठोरे| परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर कोणतेही शिखर गाठता येते, याचे उत्तम उदाहरण हदगाव तालुक्यातील उंचेगाव (बु.) येथील जमदाडे बंधूंनी घालून दिले आहे. गंगाधर किशन जमदाडे यांचे पुत्र कपिल आणि नयन यांनी कोणत्याही खाजगी कोचिंगचा आधार न घेता स्व-अभ्यासाच्या जोरावर ‘स्थापत्य अभियंता’ होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोठे बंधू कपिल गंगाधर जमदाडे यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर सातत्याने अभ्यास करत स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर आजवर पाच विविध सरकारी पदांवर त्यांची निवड झाली आहे. सुरुवातीला त्यांनी महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्य केले. त्यानंतर लातूर महानगरपालिकेत बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून निवड झाली. पुढे नगररचना विभागात सहाय्यक रचनाकार तसे...
गणेशवाडीतील विद्यार्थिनी राधिका टारपे हिची पोलीस भरतीत निवड

गणेशवाडीतील विद्यार्थिनी राधिका टारपे हिची पोलीस भरतीत निवड

करियर
किनवट/हिमायतनगर| गट ग्रामपंचायत जिरोणा अंतर्गत गणेशवाडी येथील विद्यार्थिनी कु. राधिका शाम टारपे हिची पोलीस भरतीत निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राधिका हिने मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी जिरोणा येथील पोलीस पाटील प्रतिनिधी गंगाधर मिराशे तसेच जाधव अकॅडमी, गोकुंदा (किनवट) यांच्या वतीने तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, तिच्या कुटुंबीयांमध्ये व गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे....
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

करियर
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न नांदेड| नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नांदेड हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले असून राज्यभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वंकष उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. आश्विनी जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सं...
बालविवाहाच्या प्रश्नावर मराठवाडा देशात आघाडीवर- हेरंब कुलकर्णी

बालविवाहाच्या प्रश्नावर मराठवाडा देशात आघाडीवर- हेरंब कुलकर्णी

करियर
नांदेड,गोविंद मुंडकर| सामाजिक प्रगतीच्या अनेक मापदंडांवर मराठवाड्याची ओळख ठळकपणे समोर येत नसली, तरी बालविवाहाच्या समस्येत हा प्रदेश देशात गंभीरपणे आघाडीवर असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मराठवाडा साहित्य परिषद आणि आयआयबी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. देशातील सुमारे ७० जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, यातील १७ जिल्हे महाराष्ट्रातील असून, त्यापैकी तब्बल ८ जिल्हे मराठवाड्यातील आहेत. परभणी जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी ४८ टक्क्यांपर्यंत बालविवाह होत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. मुलींच्या शिक्षणाबाबतची उदासीनता ही या समस्येची मुळ कारणे असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, ज्या महाराष्ट्राने मुलींच्या शिक्षणाची पहिल...
विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही – प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे

विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही – प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे

करियर
नांदेड| संकुचित विचारसरणी व मर्यादित वर्तुळात राहणे हे लोकशाहीचे विकृतीकरण असून विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे (Sudhir Gawhane) यांनी केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील (Swami Ramanand Teerth Marathwada University) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रातर्फे आयोजित महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर (Mahatma Jyotirao Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti Festival) समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. डॉ. गव्हाणे म्हणाले, “आपले घर, आपली माणसे एवढ्यापुरता विचार मर्यादित ठेवणे हे देशासाठी घातक आहे. सर्व काही आपल्यालाच हवे हा स्वार्थीपणा असून तो दुबळेपणाचे लक्षण आहे.” लोकशाही टिकवायची असेल तर मन, विचार आणि कृती यांना स्वातंत्र्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सत्कार सोहळा उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सत्कार सोहळा उत्साहात

करियर
लोहा| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत कृतज्ञता गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार विठ्ठल परळीकर होते. यावेळी बोलताना तहसीलदार परळीकर म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांमुळेच समाजात समता निर्माण झाली आणि शिक्षणाची क्रांती घडून प्रगतीची दारे सर्वांसाठी खुली झाली. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करणे आवश्यक आहे. जिज्ञासा अभ्यासिका ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असून, गेल्या बारा वर्षांत अनेक विद्यार्थी नोकरीला लागले आहेत, ही निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष शरद पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष करीम शेख, प्रा. डॉ. डी. एम. पवार, माजी नगरसेविका कमलबाई धुतमल, मारुती पाटील बोरगावकर, नगरसेवक हरिभाऊ चव्...
NTSE परीक्षेत निजामाबादचा वंश डालिया यशस्वी

NTSE परीक्षेत निजामाबादचा वंश डालिया यशस्वी

करियर, तेलंगणा
ऑल इंडिया 19 वा क्रमांक, तेलंगणा राजस्थानी समाजाचा गौरव निजामाबाद| निजामाबाद येथील गुणवंत विद्यार्थी वंश डालिया याने NTSE (राष्ट्रीय प्रतिभा शोध) परीक्षेत ऑल इंडिया स्तरावर 19 वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि संपूर्ण राजस्थानी समाजाचा गौरव झाला आहे. वंश हा निजामाबादमधील प्रतिष्ठित व्यापारी तसेच ‘निजामाबाद समाचार’ हिंदी दैनिकाचे संपादक रमेश कुमार डालिया यांचा नातू आणि राहुल डालिया यांचा सुपुत्र आहे. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल तेलंगणा सरकारतर्फे त्याला रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल शिक्षक, नातेवाईक आणि समाजातील मान्यवरांनी वंशचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही तो यशाच्या शिखरावर पोहोचो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे....
महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाची महत्त्वाची सूचना

महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाची महत्त्वाची सूचना

करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या शैक्षणिक (संलग्नीकरण) विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी एक महत्त्वाची सुधारित सूचना जाहीर करण्यात आली आहे. या सूचनेनुसार, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील काही संलग्न महाविद्यालयांनी दि. २३ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित यादीप्रमाणे संलग्नीकरण नूतनीकरणाचा प्रस्ताव व आवश्यक शुल्क विद्यापीठाकडे सादर केलेले नाही. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यापीठाने पुढे इशारा दिला आहे की, संबंधित महाविद्यालयांनी सूचनेचे पालन न केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. यात पात्रता मान्यता, परीक्षा अर्ज स्वीकृती, प्रवेशपत्र वितरण तसेच निकाल जाहीर होणे यांसारख्या प्रक्रिया थांबू शकतात. अशा परिस्थितीत याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्...
error: Content is protected !!