NTSE परीक्षेत निजामाबादचा वंश डालिया यशस्वी

ऑल इंडिया 19 वा क्रमांक, तेलंगणा राजस्थानी समाजाचा गौरव

निजामाबाद| निजामाबाद येथील गुणवंत विद्यार्थी वंश डालिया याने NTSE (राष्ट्रीय प्रतिभा शोध) परीक्षेत ऑल इंडिया स्तरावर 19 वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि संपूर्ण राजस्थानी समाजाचा गौरव झाला आहे.

वंश हा निजामाबादमधील प्रतिष्ठित व्यापारी तसेच ‘निजामाबाद समाचार’ हिंदी दैनिकाचे संपादक रमेश कुमार डालिया यांचा नातू आणि राहुल डालिया यांचा सुपुत्र आहे. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल तेलंगणा सरकारतर्फे त्याला रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Oplus_16908288

या यशाबद्दल शिक्षक, नातेवाईक आणि समाजातील मान्यवरांनी वंशचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही तो यशाच्या शिखरावर पोहोचो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!