करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कंधार तालुक्याचा दहावीचा निकाल ६८.७७ टक्के,यंदाही मुलीच सरस

कंधार तालुक्याचा दहावीचा निकाल ६८.७७ टक्के,यंदाही मुलीच सरस

करियर
कॉपी मुक्ती अभियानाचा विद्यालयांना फटका ! कंधार (सचिन मोरे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवार ८ मे रोजी जाहीर करण्यात आला असून यात कंधार तालुक्याचा सरासरी निकाल ६८.६६ टक्के इतका लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कॉफी मुक्त अभियानाचा फटका दहावीच्या निकालावर दिसून आला आहे. मागच्यावर्षी प्रमाणे याही वर्षी दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदा तालुक्यातून ३७८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते त्यात ३ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कंधार तालुक्याचा सरासरी निकाल ६८.७७ टक्के लागला आहे. कॉपी मुक्ती अभियानाचा परिणाम यावर्षी निकालावर झाल्याचे दिसून येत आहे. कंधार तालुक्यातील सर्व विद्यालयातील गेल्या वर्षीच्या दहावीचा निकालाच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. मागच्यावर्षी प्रमाण...
योगेश्वरी महाविद्यालयात गोविंद मुंडकर व बापूराव गजभारे यांचा विशेष सन्मान

योगेश्वरी महाविद्यालयात गोविंद मुंडकर व बापूराव गजभारे यांचा विशेष सन्मान

करियर
नांदेड /अंबाजोगाई (प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्रामातील अग्रणी नेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी प्राचार्य म्हणून कार्य केलेल्या योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे मराठवाडा मुक्ती चळवळ आणि जनजागरण उपक्रमाचे समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर आणि डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशन चे संस्थापक बापूराव गजभारे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा योगेश्वरी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या हस्ते रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी संपन्न झाला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाची आठवण जागवून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. गोविंद मुंडकर आणि बापूराव गजभारे यांनी केलेल्या जनजागरणात्मक कार्याचा विशेष उल्लेख य...
मातृभाषेतील शिक्षणच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मातृभाषेतील शिक्षणच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

करियर
नांदेड,गोविंद मुंडकर | विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून तेच त्यांच्या आयुष्याची भक्कम पायाभरणी करते, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केला. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड आणि नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेत ते बोलत होते. श्री शंकरराव चव्हाण सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, शिक्षण उपसंचालक दीपक चव्हाण (लातूर), डायटचे प्राचार्य अमोल निळेकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, तसेच माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अवधूत गंजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शालेय परीक्षा स्पर्धात्मक परीक्षांच्या धर्तीवर घेण...
समृद्ध पंचायत राज अभियान : विशेष समितीत सोपान बोंपीलवार यांची निवड

समृद्ध पंचायत राज अभियान : विशेष समितीत सोपान बोंपीलवार यांची निवड

करियर
पारदर्शकतेला चालना हिमायतनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी तालुकास्तरीय विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीत हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी सोपान बोंपीलवार यांची पत्रकार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने ही समिती कार्यरत राहणार आहे. पत्रकार प्रतिनिधी म्हणून बोंपीलवार यांच्या समावेशामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रभावी व निष्पक्ष नजर ठेवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निवडीबद्दल आमदार माधवराव पाटील जवळगांवकर, नगराध्यक्ष रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी जि प सदस्य सुभाष ...
कंधार तालुक्यात बारावीचा निकाल 63 टक्के.!

कंधार तालुक्यात बारावीचा निकाल 63 टक्के.!

करियर
कॉपी मुक्ती अभियानाचा सर्व विद्यालयांना फटका: निकालात मोठी घसरण कंधार( सचिन मोरे) महाराष्ट्र राज्‍य लातूरच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ कडून फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्‍या परीक्षेच्या निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत कंधार तालुक्यातील 3394 मुले, 2087 मुली असे एकूण 5 हजार 481 विद्यार्थी परीक्षा दिली होती. त्यात 1993 मुले, 1469 मुली असे एकूण 3462 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कंधार तालुक्यात मुलांचा 58.72 तर मुलींचा 70.38 एकूण 63.16 टक्के निकाल लागला आहे. मुलापेक्षा मुलीने बाजी मारली आहे.यावर्षी कॉपी मुक्त अभियानाचा मोठा फटका कंधार तालुक्यातील सर्व विद्यालयांना बसला आहे निकालामध्ये मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या कंधार तालुक्यातील विद्यालयाचा बारावीच्‍या परीक्षेच्य...
पंचशील उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी निकालात दमदार यश; विज्ञान ९१%, कला ८३%

पंचशील उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी निकालात दमदार यश; विज्ञान ९१%, कला ८३%

करियर
हदगाव, गौतम वाठोरे| शहरातील पंचशील उच्च माध्यमिक विद्यालय (आदर्श विद्यार्जन मंडळ संचलित) यांनी इयत्ता बारावीच्या निकालात यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालात विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९१ टक्के, तर कला शाखेचा ८३ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत एकूण १७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कुमारी आरती दत्ता शिंदे (८६.३३%) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी पूजा शिवाजी वाघमारे (७४.६७%) यांनी द्वितीय, तर कुमारी प्रज्ञा सत्यप्रकाश कुंभकर्ण (७२.६७%) आणि शुभम शंकर राठोड (७१.३३%) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेत १६७ पैकी १३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गंगाराम दिगंबर झाडे (८०.१७%) यांनी प्रथम, कुमारी पल्लवी रावसाहेब वानखेडे (७८.३३%) यांनी द्वितीय, तर कुमारी प्रज्ञा प्र...
नामांकित ‘हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा’ एच.एस.सी. परीक्षेत डंका

नामांकित ‘हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा’ एच.एस.सी. परीक्षेत डंका

करियर
यशाची परंपरा कायम!  ​हिमायतनगर (प्रतिनिधी) गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध अध्यापनासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकमेव नामांकित हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अनुभवी शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे विद्यालयाने ८६.३५% निकालासह यशाची सुवर्ण परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या या यशामागे तालुक्यातील सर्वात अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्गाचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शाखेने ९५.२७% या उच्चांकी निकालाची नोंद केली असून, कला शाखेने ८०.९५% निकाल मिळवून तालुक्यात आपला नावलौकिक वाढवला आहे. विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कला शाखा: गुणांनुक्रमे अव्वल -  कु. शिवानी...
लोकवर्गणीतून बेळकोणी खुर्द शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

लोकवर्गणीतून बेळकोणी खुर्द शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

करियर
नांदेड| शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बेळकोणी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकवर्गणीच्या माध्यमातून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला असून, शाळा परिसर सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी गावातील विष्णुकांत अडबलवार व सचिन अनमुलवाड यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा केली. जमा झालेल्या निधीतून १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शाळेच्या परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शाळेतील हालचालींवर लक्ष ठेवणे सुलभ होणार असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच शिस्त व पारदर्शकतेलाही चालना मिळणार आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांनी ग्रामस्थांचे आभार म...
लेखणीच्या बळावर समाजासाठी कार्य; गोविंद गोडसेलवार यांना ‘डिजिटल मीडिया पुरस्कार 2026’

लेखणीच्या बळावर समाजासाठी कार्य; गोविंद गोडसेलवार यांना ‘डिजिटल मीडिया पुरस्कार 2026’

करियर
हिमायतनगर/नांदेड| राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात डिजिटल मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल Nanded24News चे संपादक गोविंद गोडसेलवार यांना “डिजिटल मीडिया पुरस्कार 2026” प्रदान करण्यात आला. तळागाळातील गोरगरीब, वंचित व शोषित घटकांना लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या पत्रकारितेमुळे अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फुटून जनतेच्या समस्यांना योग्य व्यासपीठ मिळाले आहे. तर गरजू गोर गरीब विद्यार्थी यांना समाजाचे पाठबळ मिळावे यासाठी त्यांनी लेखणीतून आवाज उठवत शिक्षणासाठी दानशूर व्यक्तीकडून मदत मिळून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. हा पुरस्कार राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे तसेच ...
हिमायतनगरात परमेश्वर शिंदे यांना ‘सेवागौरव’ पुरस्कार; वीज सेवेसाठीच्या कार्याचा गौरव

हिमायतनगरात परमेश्वर शिंदे यांना ‘सेवागौरव’ पुरस्कार; वीज सेवेसाठीच्या कार्याचा गौरव

करियर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता अहोरात्र झटणारे परमेश्वर शिंदे यांच्या प्रामाणिक व निष्ठावंत कार्याचा गौरव करत राज्य मराठी पत्रकार परिषदेतर्फे त्यांना ‘सेवागौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मैदानात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. या वेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या हस्ते लाईनमन श्री परमेश्वर शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तत्पर राहून सेवा देणाऱ्या शिंदे यांच्या कार्याची शहरात विशेष दखल घेतली जात आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी केलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केल...
error: Content is protected !!