कंधार तालुक्याचा दहावीचा निकाल ६८.७७ टक्के,यंदाही मुलीच सरस

कॉपी मुक्ती अभियानाचा विद्यालयांना फटका !

कंधार (सचिन मोरे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवार ८ मे रोजी जाहीर करण्यात आला असून यात कंधार तालुक्याचा सरासरी निकाल ६८.६६ टक्के इतका लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कॉफी मुक्त अभियानाचा फटका दहावीच्या निकालावर दिसून आला आहे.

मागच्यावर्षी प्रमाणे याही वर्षी दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदा तालुक्यातून ३७८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते त्यात ३ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कंधार तालुक्याचा सरासरी निकाल ६८.७७ टक्के लागला आहे. कॉपी मुक्ती अभियानाचा परिणाम यावर्षी निकालावर झाल्याचे दिसून येत आहे. कंधार तालुक्यातील सर्व विद्यालयातील गेल्या वर्षीच्या दहावीचा निकालाच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे.

मागच्यावर्षी प्रमाणे याही वर्षी दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यात १ हजार २८७ म्हणजे ६२.१४ टक्के मुले उत्तीर्ण झाले तर १ हजार २०८ म्हणजे ७७.५८ टक्के मुली उत्तीर्ण झाले. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. कंधार तालुक्यातून विशेष प्राविण्य श्रेणीतून २८० तर प्रथम श्रेणीतून ६३३ द्वितीय श्रेणीतून ९३६ तृतीय श्रेणीत ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ६८.७७ टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील शाळा आणि त्यांची टक्केवारी अशी : जिल्हा परिषद हायस्कूल कंधार शून्य टक्के, जिल्हा परिषद मुलींची शाळा कंधार शून्य टक्के, श्री शिवाजी हायस्कूल कंधार ७४.६३टक्के, मनोविकास विद्यालय कंधार ८१.२५ टक्के, श्री गणपतराव मोरे विद्यालय कंधार ७५.०० टक्के, श्री शिवाजी विद्यामंदिर कंधार ३०.४३ टक्के, महात्मा फुले विद्यालय कंधार ९५.२३ टक्के, श्री संत निवृत्तीनाथ महाराज कंधार ४३.७५ टक्के,

प्रियदर्शनी कन्या शाळा कंधार ८२.६६ टक्के, जिल्हा परिषद हायस्कूल बाचोटी ७१.४२ टक्के , जिल्हा परिषद हायस्कूल काटकळंबा ६०.०० टक्के, जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज ७३.०२ टक्के, माणिक प्रभू अंबुलगा ८३.५६ टक्के, श्री शिवाजी विद्यालय बारूळ ७४.८१ टक्के, श्री नाईक विद्यालय दिग्रस खु. ५१.४२ टक्के, श्री शिवाजी विद्यालय दिग्रस बु. ८४.९३ टक्के, श्री शिवाजी विद्यालय हाळदा ५०.५६ टक्के, जनता हायस्कूल कौठा ७६.९७, श्री शिवाजी विद्यालय कुरूळा ६७.६१, श्री साईनाथ विठ्ठलनाथ विद्यालय मंगलसांगवी ४४.००%, समता विद्यालय उस्माननगर ८२.९५%, नेताजी सुभाष चंद्र बोस पानभोसी ६०.६६, बसवेश्वर विद्यालय फुलवळ ७१.०१, पोस्ट बेसिक आश्रम नेहरूनगर ३४.७१%, महात्मा फुले विद्यालय शेकापूर ७१.००%, भिमाशंकर विद्यालय शिराढोण ७४.६२%,

पोस्ट बेसिक आश्रम शाळा गांधीनगर ५०.००%, पुंडलिक विद्यालय हाडोळी ८१.४२, गोविंदराव पाटील चिखली ७२.३६ %, श्री संत बलगीर महाराज येल्लूर ७६.९२ %, शांतीदूत गोविंदराव पाटील गोणार ५०.७९ %, संत नामदेव महाराज बोरी ८८.५७ %, पोस्ट बेसिक आश्रम बिजेवाडी ५५.१७ टक्के, नामदेव महाराज पानशेवडी ९४.२८ टक्के , शिवाजी हायस्कूल दाताळा ७७.२७%, राजीव गांधी बोळका ६९.४४ टक्के, माध्यमिक आश्रम शिराढोण ६३.३३ टक्के, ज्ञानेश्वर माऊली मोहजा परांडा ८२.७५ %, महात्मा बसवेश्वर रुई ५४.५४ %, लालबहादूर शास्त्री ७६.६६ %, सुभाषराव पाटील कळका ८३.३३%, महारुद्र विद्यालय मानसपुरी ६२.५० टक्के , यशवंतराव चव्हाण गुंटूर ८०.०० टक्के, गणेशराव पाटील धोंडगे राऊतखेडा ३१.८१ टक्के,

संत नामदेव महाराज उमरज ७९.५४ %, संत गाडगेबाबा सोमठाणा ९५.६५ %, रामकृष्ण पाटील देवीचीवाडी ६१.३६ %, सोमानाईक आश्रम शाळा रामानाईक तांडा २१.७३ %, त्रिमूर्ती विद्यालय उस्मान नगर ६५.७%, शिवशंकर पांगरा ८६.४ % , महात्मा गांधी बाचोटी ६०.९७ %, सद्गुरु आदिवासी आश्रम बहादरपुरा ६४.२८ %, मातोश्री अनुसयाताई घोलप आश्रम १४.२८ % , विश्वनाथराव कौशल्य पांगरा ९२.५० %, शांती दूत गोविंदराव पाटील कंधार १४.२८ टक्के, राजे संभाजी विद्यालय पेठवडज ३३.३३ टक्के, विद्यासागर माध्यमिक विद्यालय कंधारेवाडी ३८.२९ टक्के निकाल लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!