कंधार तालुक्यात बारावीचा निकाल 63 टक्के.!

कॉपी मुक्ती अभियानाचा सर्व विद्यालयांना फटका: निकालात मोठी घसरण
कंधार( सचिन मोरे) महाराष्ट्र राज्‍य लातूरच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ कडून फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्‍या परीक्षेच्या निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत कंधार तालुक्यातील 3394 मुले, 2087 मुली असे एकूण 5 हजार 481 विद्यार्थी परीक्षा दिली होती. त्यात 1993 मुले, 1469 मुली असे एकूण 3462 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

कंधार तालुक्यात मुलांचा 58.72 तर मुलींचा 70.38 एकूण 63.16 टक्के निकाल लागला आहे. मुलापेक्षा मुलीने बाजी मारली आहे.यावर्षी कॉपी मुक्त अभियानाचा मोठा फटका कंधार तालुक्यातील सर्व विद्यालयांना बसला आहे निकालामध्ये मोठी घसरण झाली आहे.

महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या कंधार तालुक्यातील विद्यालयाचा बारावीच्‍या परीक्षेच्या निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आला. पुढील प्रमाणे आहे. कंधार तालुक्यात शिवाजी कॉलेज नवरंगपूरा सायन्स 69.85 आर्ट 24.44 कॉमर्स 25.00 एकूण 59.62 टक्के, मनोविकास विद्यालयाचा सायन्स 85.07, आर्ट 14.28 एकूण 64.21, श्री शिवाजी हायस्कूल कंधार सायन्स 75.49, आर्ट 40.36, कॉमर्स 26.08 एकूण 62.59,

प्रियदर्शनी (मुलींचे ) विद्यालयाचा सायन्स 82.05, आर्ट 29.72 एकूण 65.21, श्री शिवाजी विद्यालय कुरुळा सायन्स 76.41, आर्ट 41.50 कॉमर्स 4.16 एकूण 56.83, माणिक प्रभू विद्यालय अंबुलगा सायन्स 82.02 आर्ट 48.48, कॉमर्स 26.66 एकूण 67.96, श्री शिवाजी विद्यालय बारूळ सायन्स 86.04 आर्ट 9. 80 कॉमर्स 15.00 एकूण 59.50, महात्मा फुले विद्यालय शेकापुर सायन्स 89.37 आर्ट 33.33 कॉमर्स 37.50 एकूण 66.18, पोस्ट बेसिक विद्यालय गांधीनगर आर्ट 32.00 ,कॉमर्स 43.75 एकूण 38.59,

श्री नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालय पानभोसी सायन्स 62.38 आर्ट 27.34 एकूण 54.19, समता जुनियर कॉलेज उस्माननगर सायन्स 75.00 आर्ट 25.45 कॉमर्स 6.66 एकूण 49.31, श्री शिवाजी जुनिअर कॉलेज हळदा सायन्स 78.04, आर्ट 15.09 कॉमर्स 16.66 एकूण 49.01, गोविंदराव पाटील विद्यालय चिखली सायन्स 89.00 आर्ट 18.36 एकूण 65.77, शांती दूत गोविंदराव पाटील विद्यालय गोणार सायन्स 81.81 आर्ट 13.55 एकूण 52.20, भिमाशंकर विद्यालय शिराढोण सायन्स 85.90 आर्ट 37.50 कॉमर्स 20.00 एकूण 71.66,

श्री शिवाजी विद्यालय दिग्रस सायन्स 92.53 आर्ट 58.82 एकूण 81.18, संत नामदेव महाराज ज्युनिअर कॉलेज पेठवडज सायन्स 98.71, आर्ट 47.42 एकूण 79.05, महात्मा गांधी कनिष्ठ विद्यालय बाचोटी सायन्स 97.85 आर्ट 78.72 एकूण 93.04, कै. गणेशराव पाटील विद्यालय राऊतखेडा सायन्स 86.79 आर्ट 19.51 एकूण 68.02, लालबहादूर शास्त्री विद्यालय सांगूचीवाडी सायन्स 66.66 आर्ट 50.00 एकूण 62.68, साईनाथ विठ्ठल नाथ विद्यालय मंगलसांगवी सायन्स 71.91 आर्ट 47.61 एकूण 61.84, श्री बालाजी विद्यालय बोरी खुर्द सायन्स 95.95 आर्ट 71.42 एकूण 91.16, रामकिशन विद्यालय गांधीनगर सायन्स 77.02 आर्ट 20.83 एकूण 54.9, मधू विद्यालय नेहरूनगर सायन्स 78.20 आर्ट 41.46 एकूण 65.54,

यशवंतराव चव्हाण विद्यालय गुंटूर आर्ट 29.03 एकूण 29.03, सुभाषराव पाटील विद्यालय कळका सायन्स 66.66, आर्ट 21.05 एकूण 45.00, कै. देशमुख ज्युनिअर कॉलेज कौठा सायन्स 92.96 आर्ट 19.14 एकूण 73.14, श्री विद्यासागर हायस्कूल कंधारेवाडी सायन्स 35.35 आर्ट 10.52, कॉमर्स 06.45 एकूण 21.84, सद्गुरु आश्रम शाळा बहादरपूर सायन्स 54.16,आर्ट 71.42 एकूण 64.40, असा निकाल लागला आहे.

शासनाने कॉपी मुक्ती अभियान सुरू केल्याने कंधार तालुक्यात जिल्हाधिकारी कर्डिले यांनी विशेष लक्ष दिल्याने कंधार तालुक्यातील सर्व विद्यालयातील निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!