समृद्ध पंचायत राज अभियान : विशेष समितीत सोपान बोंपीलवार यांची निवड

पारदर्शकतेला चालना

हिमायतनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी तालुकास्तरीय विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीत हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी सोपान बोंपीलवार यांची पत्रकार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने ही समिती कार्यरत राहणार आहे. पत्रकार प्रतिनिधी म्हणून बोंपीलवार यांच्या समावेशामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रभावी व निष्पक्ष नजर ठेवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या निवडीबद्दल आमदार माधवराव पाटील जवळगांवकर, नगराध्यक्ष रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी जि प सदस्य सुभाष राठोड, सभापती जनार्धन ताडेवाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, शहराध्यक्ष संजय माने, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, त्रिरत्नकुमार भवरे, प्रकाश जैन, गोविंद गोडसेलवार, अशोक अनगूलवार, अनिल मादसवार, दत्ता शिराने, मारोती वाडेकर, दत्ता पोपलवाड आदी मान्यवरांसह पत्रकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान, या नियुक्तीमुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीत अधिक पारदर्शकता व जबाबदारी वाढेल, असा विश्वास गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विशाल पवार यांनी व्यक्त केला आहे.

समितीची रचना पुढीलप्रमाणे असून, गटविकास अधिकारी – अध्यक्ष, पी. जे. टारपे विस्तार अधिकारी (पंचायत) – नोडल अधिकारी , व्ही एस जामकर, कानिष्ठ अभियंता – सदस्य, ए के कदम ग्रामपंचायत अधिकारी – सदस्य, बी एच ठमके DEO – सदस्य यांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यातील इतर तालुक्यातील गावांना भेटी देऊन पारदर्शक कामकांजाचा आढावा घेईल असे सांगण्यात आले आहे.

या समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे सखोल मूल्यमापन होऊन ग्रामीण विकास प्रक्रियेला अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!