जी. डी. गोएंका हेल्थकेअर अकॅडमीला मान्यवरांची सदिच्छा भेट

नांदेड| जी. डी. गोएंका हेल्थकेअर अकॅडमीला सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी समाजातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन अकॅडमीची पाहणी केली. यावेळी सरदार महेंद्रसिंघ लांगरी, सरदार गुरमितसिंघ महाजन, सरदार तेजपालसिंघ खेड आणि सरदार लक्कीसिंघ रामगडिया यांनी अकॅडमीच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत व्यवस्थापनाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.

यावेळी सरदार तेजपालसिंघ खेड यांनी सध्याच्या काळात समाजातील युवक-युवतींसाठी तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांची गरज अधोरेखित केली. अशा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित व कुशल पॅरामेडिकल मनुष्यबळाची असलेली गरज पूर्ण करण्यासाठी अशा संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

नांदेडसारख्या शहरात जी. डी. गोएंका हेल्थकेअर अकॅडमीच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, युवक-युवतींना कौशल्याधारित शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे. नवीन पिढीने या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

भेटीदरम्यान मान्यवरांचा अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सचिन सिंघल, विक्रांत कांबळे, अर्शद पठाण, रुपाली कोत्तावार, जसपालसिंघ कोल्हापुरे यांच्यासह अकॅडमीचे शिक्षकवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!