
हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात आयोजन; बारावी, पदवी व डिप्लोमाधारकांना रोजगाराची संधी
हिमायतनगर, अनिल मादसवार | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांनी जपलेल्या ‘युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


हा रोजगार मेळावा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथे होणार आहे. मेळाव्यात बारावी, पदवी आणि डिप्लोमा शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.


शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांचे प्रतिनिधी प्लेसमेंट ड्राइव्हसाठी उपस्थित राहणार आहेत. पात्र उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी केले आहे.


नावनोंदणीसाठी महाविद्यालयातील रोजगार व मार्गदर्शन विभाग तसेच करिअर कट्टा प्रमुख प्रा. डॉ. दत्ता मगर, सहप्रमुख वाणिज्य विभागाचे डॉ. संगपाल इंगळे आणि गणित विभागप्रमुख डॉ. सय्यद जलील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


