लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

“बाबा… तुमच्यासाठी!” — कुटुंबसंस्थेच्या आधारस्तंभाला कृतज्ञ अभिवादन

“बाबा… तुमच्यासाठी!” — कुटुंबसंस्थेच्या आधारस्तंभाला कृतज्ञ अभिवादन

लेख
भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे वैभव म्हणजे तिची कुटुंबव्यवस्था. हजारो वर्षांच्या परंपरेत संस्कार, त्याग, कर्तव्य, माया आणि जबाबदारी यांच्या भक्कम पायावर उभी राहिलेली ही व्यवस्था अनेक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वादळांना तोंड देत आजही अभिमानाने उभी आहे. या कुटुंबसंस्थेचा सर्वात महत्त्वाचा आणि अनेकदा शांतपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणारा आधारस्तंभ म्हणजे "बाबा". स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून कुटुंबाच्या आनंदासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या वडिलांच्या त्यागाचे स्मरण, त्यांच्या कार्याचा गौरव आणि समाजात कुटुंबसंस्थेबद्दल आदराची भावना दृढ करण्याच्या पवित्र उद्देशाने चळवळी योद्धे कर्मवीर स्वर्गीय बसवंतराव परमेश्वरराव मुंडकर यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित "बाबा... तुमच्यासाठी!" हा समाजोपयोगी उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यावर्षी या उपक्रमांतर्गत चळवळी योद्धे स्वर्गीय बसवंतराव मुंडक...
 अमरनाथ गुहेतून – भाग ५  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग ५  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“धरतीवरील स्वर्ग…आणि स्वर्गालाहीअस्वस्थ करणारी वास्तवाची चाहूल!” वंदे भारतचा हवाहवासा वाटणारा प्रवास संपला आणि संध्याकाळच्या सुमारास आम्ही श्रीनगर रेल्वे स्थानकावर उतरलो. रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील सुखद प्रवास मागे पडला होता आणि आता आम्ही हिमालयाच्या कुशीत, बाबा बर्फानींच्या दर्शनाच्या उंबरठ्यावर उभे होतो.स्टेशनवर माझे जुने सहकारी आणि टूर ऑपरेटर सज्जादभाई स्वतः आम्हाला घेण्यासाठी आले होते. गेली अनेक वर्षे यात्रेच्या आयोजनात ते आमचे विश्वासू साथीदार आहेत. चेहऱ्यावर नेहमीचे हसू, पण डोळ्यांत मात्र काश्मीरच्या परिस्थितीची जाणीव स्पष्ट दिसत होती. यावर्षी एक महत्त्वाचा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. मोठ्या लक्झरी बसेस न करता वीस आसनी पाच मिनी बसेस केल्या. कारण स्पष्ट होते. मोठ्या वाहनांना सुरक्षा तपासणीसाठी वारंवार अडवले जात होते. प्रत्येक नाक्यावर तपासणी, चौकशी, कागदपत्रांची पडताळणी… ...
🔱 अमरनाथ गुहेतून – भाग ४ 🔱 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

🔱 अमरनाथ गुहेतून – भाग ४ 🔱 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
वंदे भारत : स्वप्न सत्यात उतरले! रात्री साडेअकराच्या सुमारास आम्ही हमसफर एक्सप्रेसने जम्मू रेल्वे स्थानकावर उतरलो. एक काळ असा होता की, हमसफर एक्सप्रेस सुरू झाली तेव्हा तिचे आधुनिक डबे, आकर्षक रचना आणि उत्तम सुविधा पाहून मी तिच्यावर स्वतंत्र लेख लिहिला होता. पण काळ बदलतो तशी माणसं बदलतात, गाड्याही बदलतात! यंदा हमसफरकडे पाहताना ती थोडी थकलेली, दमलेली वाटली. नवीन कोचेसची गरज आता स्पष्टपणे जाणवत होती. स्टेशनच्या बाहेर पाऊल टाकताच जम्मूच्या उकाड्याने आमचे स्वागत केले. एसी डब्यातील दोन दिवसांच्या गारव्याच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीची उष्णताही अंगावर येत होती. सामानाचा मोठा पसारा पाहून काही कुलींच्या चेहऱ्यावर आनंद, तर यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. बरीच घासाघीस करून प्रति बॅग २०० रुपयांवरून ८० रुपये दर ठरवला. पाच हातगाड्यांवर सामान ठेवून आम्ही स्टेशनबाहेरील वैष्णवी धाम येथे एसी...
🔱 अमरनाथ गुहेतून – भाग ३ 🔱 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

🔱 अमरनाथ गुहेतून – भाग ३ 🔱 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“रेल्वेचा प्रवास… आणि भोलेनाथाच्या दरबाराकडे धावणारी मनं!” आजचा पूर्ण दिवस रेल्वेत जाणार होता. त्यामुळे काल रात्री झोपताना मनात विचार आला होता की, “उद्या जरा निवांत उठू.” पण अमरनाथ यात्रेत असे विचार करणे म्हणजे हिमालयात जाऊन थंडी पडणार नाही अशी अपेक्षा करण्यासारखे आहे! रात्री साधारण तीनच्या सुमारास सुनीता देशमुख यांचा घाबरलेला फोन आला, “भाऊ , B-6 डब्यात फायर अलार्म वाजत आहे.” क्षणाचाही विलंब न करता मी त्या डब्याकडे धाव घेतली. मनात सतत भोलेनाथाचा धावा सुरू होता – “बाबा, गेली २६ वर्षे तुझ्या कृपेने प्रत्येक यात्रा सुखरूप पार पडली. यंदा अशी कसोटी का पाहतो आहेस?”B-6 डब्यात पोहोचल्यावर परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आम्ही तातडीने चेन ओढली. काही वेळातच गार्ड, टीटीई, रेल्वे सुरक्षा दल आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण डब्याची कसून तपासणी करण्यात आली. शेवटी ‘खोदा पहाड, निकला चुहा’...
🔱 अमरनाथ गुहेतून – भाग २ 🔱 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

🔱 अमरनाथ गुहेतून – भाग २ 🔱 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“घरातून निघालो… आणि भोलेनाथाने हजेरी घेतली!” आज तो दिवस अखेर उजाडला… ज्याची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा सुरू होती. पहाटे पाच वाजता डोळे उघडले तेव्हा बाहेर अजूनही अंधाराची चादर पसरलेली होती, पण मनात यात्रेचा सूर्य उगवला होता. सामानाची शेवटची एकदा पाहणी केली. कपडे, औषधे, मोबाईल चार्जर, रेनकोट, ओळखपत्र… सगळे व्यवस्थित होते. पण सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी – रेल्वे तिकीट आणि यात्रा परची – त्या माझ्या खिशात सुरक्षित होत्या. अनुभवाने एक गोष्ट शिकवली आहे. हिमालयातील चढाईपेक्षा कधी कधी एखादा कागद जास्त महत्त्वाचा ठरतो. अनेक वर्षांपूर्वी एका कुटुंबाने यात्रा परची घरी विसरली होती. त्या दिवशी बाबा बर्फानींपेक्षा आम्हाला फोटोकॉपी सेंटर, कुरिअरवाला आणि मोबाईल नेटवर्क जास्त आठवत होते! त्या प्रसंगानंतर मी एक नियम बनवला – यात्रेकरू मोजण्याआधी यात्रा परच्या मोजायच्या. भक्तीच्या प्रवासात श्रद्धा जि...
आत्महत्येनंतर नव्हे, आत्महत्या होण्यापूर्वी समाज जागा झाला पाहिजे!

आत्महत्येनंतर नव्हे, आत्महत्या होण्यापूर्वी समाज जागा झाला पाहिजे!

लेख
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. प्रत्येक आत्महत्येनंतर अश्रू ढाळले जातात, संवेदना व्यक्त केल्या जातात, आर्थिक मदतीच्या घोषणा होतात, अधिकारी धाव घेतात, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होतात आणि माध्यमांमध्ये अनेक दिवस चर्चा रंगते. परंतु एक मूलभूत प्रश्न मात्र प्रत्येक वेळी अनुत्तरित राहतो—हे सर्व त्या व्यक्तीने जगण्याचा निर्णय घेतला असता, त्याआधी का घडत नाही? आज आत्महत्येनंतर मदतीची व्यवस्था निर्माण झाली आहे; पण आत्महत्या होऊच नये यासाठीची यंत्रणा अजूनही तितकी प्रभावी दिसत नाही. हीच आपल्या समाजाची आणि व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसतो. तो एका कुटुंबाचा आधार हरवण्याचा क्षण असतो. एका घरातील मुलांचे भविष्य अंधारात लोटणारी घटना असते. वृद्ध आई-वडिलांच्या उरात कायमची वेदना निर्माण करणार...
🔱 अमरनाथ गुहेतून – भाग १ 🔱  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

🔱 अमरनाथ गुहेतून – भाग १ 🔱 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
वाचक मित्रांनो! अमरनाथ यात्रा म्हटली की डोळ्यासमोर उभे राहतात हिमालयातील बर्फाच्छादित पर्वत, खडतर चढाई, अनिश्चित हवामान, लष्कराच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि बाबा बर्फानींच्या दर्शनाची आस लागलेले लाखो भाविक!याच अद्भुत यात्रेसाठी नांदेडचे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यंदा सलग २७ व्या वर्षी १०० यात्रेकरूंसह रवाना होत आहेत. काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीपासून रेल्वेच्या वेटिंग लिस्टपर्यंत, रजिस्ट्रेशनच्या “सर्व्हर बिझी” पासून हिमालयातील बर्फवृष्टीपर्यंत, यात्रेकरूंच्या गमती-जमतींपासून अध्यात्मिक अनुभूतींपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास यंदा एका वेगळ्याच अंदाजात आपल्या भेटीला येत आहे.दरवर्षीप्रमाणे केवळ प्रवासवर्णन नव्हे, तर विनोद, मार्मिक निरीक्षणे, थरार, मानवी स्वभावाचे रंग, सेवा, श्रद्धा आणि हिमालयाच्या कुशीत घडणाऱ्या असंख्य अविस्मरणीय घटनांची ही जिवंत सफर असेल. “अमरनाथ गुहेतून” ही लेखमाला वाच...
“३५% चा विजय” एका मुलीच्या आयुष्याला मिळालेलं नवं वळण

“३५% चा विजय” एका मुलीच्या आयुष्याला मिळालेलं नवं वळण

लेख
कधी कधी काही बातम्या आकड्यांमध्ये मोजता येत नाहीत… त्या मनात घर करून जातात... अशीच एक प्रेरणादायी घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे. “साहेब… माझी मुलगी पास झाली हो… तिला ३५% पडले…” फोनवरील त्या वडिलांचा थरथरता पण आनंदाने भरलेला आवाज आजही मनाला स्पर्श करून जातो. कारण हे फक्त ३५ टक्के नव्हते… तर एका मुलीच्या नव्या आयुष्याची सुरुवात होती. शिवसांब घोडके हे नांदेड वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असताना कंधार तालुक्यातील एका गावात बिबट्याच्या अफवेच्या शोधमोहीमेवर गेले होते. तेव्हा त्यांच्या नजरेस एक दहावीतील मुलगी उन्हात शेतात काम करताना दिसली. अभ्यासात मागे पडल्याने आणि मुलांच्या चेष्टेमुळे तिने शाळा सोडली होती. त्या दिवशी भोकराच्या झाडाखाली झालेला संवाद एका मुलीच्या आयुष्याला नवं वळण देणारा ठरला. “तू शाळेत जा… शिक्षणच तुझं आयुष्य बदलू शकतं…” या शब्दांनी त्या मुलीच्या मनात नवी आशा नि...
उष्माघात : जीवघेण्या उष्णतेपासून बचावासाठी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

उष्माघात : जीवघेण्या उष्णतेपासून बचावासाठी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

लेख
राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून नांदेडसह अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही एक गंभीर वैद्यकीय अवस्था असून वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. उष्माघात म्हणजे काय? उष्माघात ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते आणि शरीराला स्वतःचे तापमान नियंत्रित करता येत नाही. सामान्यतः शरीर घामाद्वारे थंड होते, मात्र उष्माघातात ही प्रक्रिया अयशस्वी ठरते. उष्माघाताची लक्षणे उष्माघात झालेल्या व्यक्तीत खालील लक्षणे दिसून येतात: त्वचा लाल, गरम व कोरडी होणे श्वास घेण्यास त्रास चक्कर येणे, थकवा मळमळ, उलट्या तीव्र डोकेदुखी हृदयाचे ठोके वेगाने वाढणे गोंधळ, चिडचिडेपणा प्रमुख कारणे ...
नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांसाठीचा सन्मान सोहळा आता राज्य पातळीवर साजरा होणार

नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांसाठीचा सन्मान सोहळा आता राज्य पातळीवर साजरा होणार

लेख
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते; परंतु या स्तंभाला बळकट ठेवण्यासाठी जे व्यक्तिमत्त्व स्वतःचे आयुष्य झोकून देतात, त्यापैकी एक ठळक नाव म्हणजे बापुराव गजभारे. गेली तब्बल २४ वर्षे पत्रकारांसाठी सकारात्मक, सन्माननीय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी अविरतपणे केलेले कार्य हे केवळ उल्लेखनीय नाही, तर अनुकरणीय आहे. बापुराव गजभारे यांची कार्यशैली ही केवळ पत्रकारितेपुरती मर्यादित नाही. त्यांनी पत्रकार आणि प्रामाणिक समाजसेवक यांना समान दर्जा देत, दोघांनाही समाजघडणीचे महत्त्वपूर्ण घटक मानले. ही व्यापक दृष्टीच त्यांच्या कार्याला वेगळी उंची देणारी ठरली. ग्रामीण भागातील पत्रकार असो किंवा महानगरातील प्रतिनिधी — सर्वांना एकाच धाग्यात बांधण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे पत्रकारितेतील भेदाभेद कमी होऊन एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. विशेष म्हणजे,...
error: Content is protected !!