सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिमायतनगरात आज दिव्यांग बांधवांसाठी मोफत सहाय्य साहित्य वितरण शिबिर

हिमायतनगरात आज दिव्यांग बांधवांसाठी मोफत सहाय्य साहित्य वितरण शिबिर

सामाजिक
कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, कॅलिपर्ससह विविध साहित्याचा लाभ; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने आयोजन हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आज (दि. २८ जून) हिमायतनगर येथे मोफत सहाय्य साहित्य वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कृत्रिम पाय, कृत्रिम हात, कॅलिपर्स, श्रवणयंत्र तसेच इतर आवश्यक सहाय्य साहित्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. एसआर ट्रस्ट, मध्यप्रदेश आणि ALIMCO, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला परिसरातील दिव्यांग नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून लाभार्थ्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम ...
इंदिरानगर सरसम आशा स्वयंसेविका नियुक्तीचा प्रस्ताव पाच महिन्यांपासून रखडला; ३० जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा

इंदिरानगर सरसम आशा स्वयंसेविका नियुक्तीचा प्रस्ताव पाच महिन्यांपासून रखडला; ३० जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील इंदिरानगर (सरसम) येथील आशा स्वयंसेविका नियुक्तीचा प्रस्ताव तयार असूनही तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यास गेल्या पाच महिन्यांपासून विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संबंधित उमेदवाराने ३० जूनपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, सरसम येथे कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. माहितीनुसार, यापूर्वी इंदिरानगर सरसम येथील आशा स्वयंसेविका निवड प्रक्रियेत अपात्र उमेदवाराची निवड झाल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर पात्र असूनही निवडीपासून वंचित राहिलेल्या रेखा कोंडबा कवडे यांनी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांनी दोन वर्षांत तीन वेळा कुटुंबासह आमरण उपोषणही केले होते. त्यानंतर २२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ...
सिमेंटच्या जंगलात हरवत चालले नांदेडचे ‘वसंतराव नाईक उद्यान’!

सिमेंटच्या जंगलात हरवत चालले नांदेडचे ‘वसंतराव नाईक उद्यान’!

सामाजिक
विकासाच्या घोषणांत हिरवाईचा बळी; झाडे तहानलेली, प्रशासन मात्र आश्वासनांत रमलेले नांदेड,गोविंद मुंडकर| एकेकाळी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" अशी संस्कृती जपणाऱ्या महाराष्ट्रात आता "सिमेंटवल्ली आम्हा विकासचरे" अशी नवी परंपरा सुरू झाली की काय, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती नांदेडमध्ये निर्माण झाली आहे. कारण शहरातील नागरिकांचा श्वास मानले जाणारे वसंतराव नाईक उद्यान आज स्वतःच श्वासासाठी धडपडत आहे. नागरिकांच्या आरोग्याचे, पर्यावरणाचे आणि भावी पिढ्यांच्या हरित भवितव्याचे स्वप्न पाहत वसंतराव नाईक सोसायटीने ही प्रशस्त जागा उद्यानाच्या संरक्षण व विकासासाठी महानगरपालिकेकडे सुपूर्द केली होती. मात्र संरक्षण झाले की उपेक्षा, हा प्रश्न आज या उद्यानात पाऊल ठेवताच पडतो. स्वातंत्र्य सैनिक नगर, शोभा नगर, वसंतराव नाईक नगर परिसरातील हजारो नागरिक रोज सकाळ-संध्याकाळ येथे फिरण्यासाठी येतात. पण त्यांचे...
नरसिंगराव बोंपिलवार यांचे निधन

नरसिंगराव बोंपिलवार यांचे निधन

सामाजिक
पुसद /हिमायतनगर | मूळचे हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील रहिवासी तथा सध्या पुसद येथे वास्तव्यास असलेले नरसिंगराव किसनराव बोंपिलवार यांचे उपचारादरम्यान दिनांक 27 रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, बहिणी, मेव्हणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी पुसद येथे मोक्षधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे....
हदगाव येथे दिव्यांगांसाठी ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर; कृत्रिम अवयव व साहित्याचे तात्काळ वितरण

हदगाव येथे दिव्यांगांसाठी ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर; कृत्रिम अवयव व साहित्याचे तात्काळ वितरण

सामाजिक
हदगाव | नांदेड जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स तसेच आवश्यक दिव्यांग साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी हदगाव येथील श्री साईबाबा निवासी दिव्यांग विद्यालयात ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर उत्साहात पार पडले. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नांदेड, एस.आर. ट्रस्ट (मध्य प्रदेश) आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून कृत्रिम अवयवांचे मोजमाप घेण्यात आले. अनेक लाभार्थ्यांना आवश्यक दिव्यांग साहित्याचे तात्काळ वितरणही करण्यात आले. शिबिराला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, गटविकास अधिकारी डी. के. आडेराघोव, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल, विस्तार अधिकारी बालासाहेब पवार, व्ही. एम. मुंडकर, सतीश फुलारी आणि शाखा अभियंता एस. एस. नालंदे या...
पहिल्याच दमदार पावसाने हिमायतनगरची दाणादाण; रस्त्यावर वाहिली गटारगंगा

पहिल्याच दमदार पावसाने हिमायतनगरची दाणादाण; रस्त्यावर वाहिली गटारगंगा

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| मृग नक्षत्र लागल्यानंतर हिमायतनगर शहर व परिसरात बुधवार (दि. 24) रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. या हंगामातील पहिल्याच पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना व पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, या पावसाने हिमायतनगर नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पहिल्याच पावसात शहरातील अनेक नाल्या तुंबल्याने रस्ते आणि गटारे एकरूप झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हिमायतनगर शहरात आठवडी बाजारासाठी आलेल्या महिला व पुरुष नागरिकांना दुर्गंधीयुक्त घाण पाण्यातून मार्ग काढत बाजार करावा लागला. मुख्य रस्त्यांवर गटारगंगा वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. शहरातील आठवडी बाजार परिसर, सराफ लाईन, जनता कॉलनी, आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, बस स्थानक परिसर, चौपाटी मार्केट, ग्रामीण रुग्णालय...
अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी ‘ऑन दि स्पॉट’ शिबिरे; कृत्रिम हात-पाय व साहित्याचे तात्काळ वितरण

अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी ‘ऑन दि स्पॉट’ शिबिरे; कृत्रिम हात-पाय व साहित्याचे तात्काळ वितरण

सामाजिक
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स व इतर आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, एस. आर. ट्रस्ट (मध्य प्रदेश) आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकानिहाय ‘ऑन दि स्पॉट’ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप घेऊन कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स, एएफओ, स्मार्ट बूट तसेच इतर आवश्यक साहित्य तात्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी केले आहे. समीर पटेल यांनी सांगितले की, लाभार्थ्यांनी शिबिरास उपस्थित राहताना दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. गरजू अस्थिव्यंग...
कलेचा आणि संस्कारांचा दीप मालवला; आदर्श शिक्षक बाबुराव घुंगरे यांचे निधन

कलेचा आणि संस्कारांचा दीप मालवला; आदर्श शिक्षक बाबुराव घुंगरे यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगरच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, आदर्श शिक्षक तसेच उत्कृष्ट चित्रकार म्हणून परिचित असलेले गुरुवर्य कै. बाबुराव गोपाळराव घुंगरे (वय 75) यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, कला आणि समाजजीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना घुंगरे सरांनी केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण दिले नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कारांची समृद्ध शिदोरीही दिली. चित्रकला विषयातील त्यांचे प्रभुत्व, विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपुलकीने पाहण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे ते विद्यार्थ्यांचे लाडके गुरुजी बनले होते. घुंगरे सरांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज ...
नांदेड महापालिकेचे गोदावरी प्रदूषण नियंत्रणासाठी मोठे पाऊल

नांदेड महापालिकेचे गोदावरी प्रदूषण नियंत्रणासाठी मोठे पाऊल

सामाजिक
२२ प्रमुख नाल्यांतील सांडपाणी नदीत जाणे रोखण्यात यश; आयुक्त डॉ. डोईफोडे यांचा आढावा नांदेड | शहराची जीवनवाहिनी आणि धार्मिक दृष्ट्या पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने हाती घेतलेल्या विविध उपाययोजना प्रगतीपथावर असून, २२ प्रमुख नाल्यांमधून थेट नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष आढावा बैठक पार पडली. बैठकीत गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महापालिकेने नदीकाठालगत ३.३ किलोमीटर लांबीची आणि १२०० मिमी व्यासाची मलवाहीनी उभारली असून, १७ इंटरसेप्ट स्ट्रक्चर्सद्वारे सांडपाणी अडवून ते मलशुद्धीकरण केंद्रांकडे वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बोंढार, इलिचपूर, सांगवी आणि डंकीन ...
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे रखडली; नागरिकांत नाराजी

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे रखडली; नागरिकांत नाराजी

सामाजिक
नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप, तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील विविध प्रभागांतील नाल्या तुडुंब भरलेल्या अवस्थेत असून पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाईची कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी गेल्या आठ दिवसांपासून नगरपंचायत प्रशासनाकडे नालेसफाईची मागणी लावून धरली आहे. मात्र काही ठिकाणी केवळ थातूरमातूर कामे करून चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाल्यांचे बांधकामही अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांक...
error: Content is protected !!