सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नंदीग्राममधील कृष्णा चौकातील भुयारी ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

नंदीग्राममधील कृष्णा चौकातील भुयारी ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

सामाजिक
रस्ता खचून ट्रक अडकल्यानंतर महापालिकेची तातडीची कारवाई; वाहतूक वळवली नांदेड | नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटीच्या कृष्णा चौकात मुख्य भुयारी ड्रेनेज लाईनवरील रस्ता खचून रेतीने भरलेला ट्रक अडकल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, ४०० मिमी व्यासाच्या जुन्या भुयारी ड्रेनेज लाईनवरून अवजड रेतीचा ट्रक गेल्यामुळे काळ्या मातीचा भाग आतून कोसळला. त्यामुळे ड्रेनेज लाईनचे नुकसान होऊन रस्त्याखाली मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्यात ट्रक अडकला. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढला. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात बॅरिकेड्स उभारण्यात आले असून या मार्गावरील वाहतूक तात्पुरती वळविण्यात आली आहे. सध्या मु...
जिगळा येथे किन्नर गुरूंची भव्य आखाड पाणी पूजा; संत-महंतांच्या उपस्थितीत दिव्य मिरवणूक, महाप्रसादाचे आयोजन

जिगळा येथे किन्नर गुरूंची भव्य आखाड पाणी पूजा; संत-महंतांच्या उपस्थितीत दिव्य मिरवणूक, महाप्रसादाचे आयोजन

सामाजिक
नांदेड /बिलोली, प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील जिगळा (क्र. १) येथे मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी किन्नर समाजाच्या धार्मिक परंपरेनुसार भव्य आखाड पाणी पूजा, दिव्य अभिषेक, शोभायात्रा आणि महाप्रसादाचा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास देशभरातील संत-महंत, किन्नर गुरू, महामंडलेश्वर आणि हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या धार्मिक सोहळ्यास श्री श्री १००८ महंत उमाशंकर भारतीजी महाराज (काशी), माहूर पीठाधीश्वर श्री श्री १००८ महंत डॉ. धनेश्वर भारतीजी महाराज, श्री श्री १००८ महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज (क्षेत्र माहूर), आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मीनारायण त्रिपाठी, नांदेडच्या श्री आदि गादीपती किन्नर गुरू रंजीता नायक तसेच महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी य...
शासकीय कार्यक्रमात जखमी दिव्यांग युवकाला महिनाभरानंतरही मदत नाही; जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम स्मरणपत्र

शासकीय कार्यक्रमात जखमी दिव्यांग युवकाला महिनाभरानंतरही मदत नाही; जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम स्मरणपत्र

सामाजिक
आर्थिक मदत, उपचार खर्च व पुनर्वसनाची मागणी; भविष्यात शासकीय कार्यक्रमांत दिव्यांगांसाठी सुरक्षिततेची व्यवस्था अनिवार्य करण्याची मागणी नांदेड, प्रतिनिधी| दि. 26 जून 2026 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित शासकीय कार्यक्रमादरम्यान गंभीर जखमी झालेल्या दिव्यांग युवक कार्तिक कुमार भरतीपूरम यांना घटनेनंतर तब्बल एक महिना उलटूनही कोणतीही आर्थिक मदत, उपचार खर्चाची भरपाई अथवा पुनर्वसनाबाबत ठोस मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम स्मरणपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणी यापूर्वीही प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली असून राज्य मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जखमी दिव्यांग युवकाला उपलब्ध शासकीय योजनांमधून किंवा ...
हु. ज. पा. महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी; ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

हु. ज. पा. महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी; ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

सामाजिक
हिमायतनगर, प्रतिनिधी| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथे शनिवार (दि. १ ऑगस्ट २०२६) रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 'लेखन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृतींचे विशेष ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली. यावेळी स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे तसेच ग्रंथपाल राजू बोंबले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या समृद्ध साहित्यविश्वाची माहिती उपस्थितांना दिली. प्रदर्शनामध्ये फकीरा, रशियाचा प्रवास, चित्रा, आवडी, पाझर यांसह अण्णाभाऊ साठे यांच्या विविध साहित्यकृतींचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना या ग्रंथांचे महत्त्व समजावून सांगत वाचनाची प्रेरणा देण्याच...
भिवरा नदीच्या पुरामुळे उमरा–परसराम तांडा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प; पाणी ओसरताच मार्ग पुन्हा सुरू

भिवरा नदीच्या पुरामुळे उमरा–परसराम तांडा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प; पाणी ओसरताच मार्ग पुन्हा सुरू

सामाजिक
लोहा| लोहा तालुक्यातील भिवरा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्याने साजा उमरा अंतर्गत उमरा–परसराम तांडा–रूपसिंग तांडा मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्यामुळे गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजल्यापासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील संपर्क काही काळासाठी तुटला होता. परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. रूपसिंग तांडा आणि परसराम तांडा येथील नागरिकांसाठी लाडका–गुंडा (ता. कंधार) मार्गे राष्ट्रीय महामार्ग १६१ए हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. तर उमरा येथील नागरिकांना उमरा–जोमेगाव मार्गे नांदेड–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-161) वापरण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, रात्रीपर्यंत भिवरा नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पुलावरील पाणी ओसरले आणि वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली. प्रशासनान...
आरक्षण उपवर्गीकरण तातडीने करा; अन्यथा महाराष्ट्रात मंत्र्यांना फिरू देणार नाही – डॉ. रामचंद्र भरांडे

आरक्षण उपवर्गीकरण तातडीने करा; अन्यथा महाराष्ट्रात मंत्र्यांना फिरू देणार नाही – डॉ. रामचंद्र भरांडे

सामाजिक
हदगाव, प्रतिनिधी | अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तातडीने लागू करावे, या मागणीसाठी हदगाव येथे समस्त ५८ जाती समूहाच्या वतीने ‘आरक्षण उपवर्गीकरण जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मुसळधार पावसातही हजारो नागरिक सहभागी झाल्याने मोर्चाने शासनाचे लक्ष वेधले. मोर्चाला मार्गदर्शन करताना लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने दिलेल्या निर्णयानुसार आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करणे ही राज्य सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. डॉ. भरांडे म्हणाले, "आरक्षण उपवर्गीकरण कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून लाभवंचित घटकांना न्याय देणारा निर्णय आहे. इतर सात राज्यांनी हा निर्णय लागू केला आहे. मात्र महाराष्ट्र सरकार गेल्या दोन वर्षांपासून हा विषय प्रलंबित ठे...
महापौरांचा अधिकाऱ्यांना दणका; स्वच्छता, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

महापौरांचा अधिकाऱ्यांना दणका; स्वच्छता, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

सामाजिक
नांदेड, प्रतिनिधी| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींची गंभीर दखल घेत झोन क्रमांक १ व २ अंतर्गत येणाऱ्या विभागांचा संयुक्त आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी आपल्या प्रभागांतील नागरिकांच्या समस्या आक्रमकपणे मांडत प्रशासनाला जाब विचारला. बैठकीत झोन १ व २ मधील अनेक भागांत कमी दाबाने व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यावर महापौरांनी जलवाहिन्यांवरील गळती २४ तासांत दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यास संबंधित अभियंत्याला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील अंतर्गत रस्ते व मुख्य चौकांमध्ये कचरा साचणार नाही यासाठी घंटागाड्या वेळेवर पाठविणे, नियमित ...
आजमवाडी रस्त्यासाठी गावकऱ्यांचे चिखलात बसून सामूहिक आमरण उपोषण

आजमवाडी रस्त्यासाठी गावकऱ्यांचे चिखलात बसून सामूहिक आमरण उपोषण

सामाजिक
रस्ता, स्मशानभूमी व गावाच्या नामांतराच्या मागण्यांसाठी संघर्ष तीव्र; प्रशासनाकडून निधी मिळताच कामाचे आश्वासन लोहा| धावरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आजमवाडी (भगवानबाबा नगर) येथील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी चिखलमय रस्त्यावर बसून सामूहिक आमरण उपोषण सुरू केले आहे. गावाला जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना नदी-ओढ्याच्या पात्रातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आजमवाडी हे सुमारे ८०० लोकसंख्येचे गाव असून लोहा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. धावरी-आजमवाडी ही संयुक्त ग्रामपंचायत असून सरपंचपदाचा मान आजमवाडीला मिळत असला, तरी गावाला आजपर्यंत मजबूत रस्ता उपलब्ध झालेला नाही. पावसाळ्यात गावाचा संपर्क अक्षरशः तुटत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी प्रशासनाला निवेदन ...
कोट्यवधींच्या नाल्यांचा भोंगळ कारभार उघड; अल्प पावसातच घाण पाणी वस्तीत, महामार्ग विभागाविरोधात संताप!

कोट्यवधींच्या नाल्यांचा भोंगळ कारभार उघड; अल्प पावसातच घाण पाणी वस्तीत, महामार्ग विभागाविरोधात संताप!

आरोग्य, सामाजिक
हिमायतनगर परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातून गेलेल्या धानोडा भोकर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील कथित निकृष्ट दर्जाचा कारभार आता नागरिकांच्या आरोग्यावर बेतू लागला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले नाले अल्पशा पावसातच फेल ठरत असून, नाल्यांतील घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट शहरातील सखल वस्त्यांमध्ये घुसत आहे. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेसह गंभीर आरोग्य धोक्याचा सामना करावा लागत आहे. शहराच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या नाल्यांमध्ये पाण्याचा उतार, नैसर्गिक प्रवाह आणि जलनिस्सारणाचा कोणताही शास्त्रीय विचार न करता मनमानी पद्धतीने काम करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते उलट वस्त्यांमध्ये साचत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, याच निकृष्ट कामाविरो...
समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांमुळे सामाजिक न्यायाची संकल्पना: नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांमुळे सामाजिक न्यायाची संकल्पना: नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

सामाजिक
नांदेड,गोविंद मुंडकर| सामाजिक न्याय ही केवळ शासनाची घोषणा नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविण्याची व्यापक चळवळ आहे. या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय, ऊसतोड कामगार तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, हजारो नागरिक या योजनांचा लाभ घेत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ निरीक्षिका तथा प्रभारी कार्यालयीन अधीक्षिका माधुरी राठोड यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथे झालेल्या कार्यालयीन भेटीदरम्यान त्यांनी विभागाच्या कार्यपद्धती, विविध योजना आणि शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. सामाजिक न्याय विभाग हा केवळ शासकीय कार्यालय नसून समाजातील दुर्बल घटकांना सक्षम, स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर...
error: Content is protected !!