सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कारला येथे बेलदार समाजाचा सामूहिक विवाह मेळावा; ७ जोडपी विवाहबद्ध

कारला येथे बेलदार समाजाचा सामूहिक विवाह मेळावा; ७ जोडपी विवाहबद्ध

सामाजिक
हिमायतनगर| तालुक्यातील कारला येथे बेलदार–गवंडी समाजाच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात एकूण ७ जोडपी विवाहबद्ध झाली असून, साधेपणा आणि सामाजिक एकतेचा आदर्श घालून देणारा हा सोहळा ठरला. या प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “बदलत्या काळात वाढत्या विवाह खर्चाला फाटा देत बेलदार समाजाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. अशा सामूहिक विवाहाचा आदर्श इतर समाजांनीही घ्यावा,” असे आवाहन केले. गेल्या १६ वर्षांपासून कारला येथे हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, शेकडो वधू-वरांचे विवाह या माध्यमातून पार पडले आहेत. विशेष म्हणजे, या सोहळ्यात गावातील सर्व धर्म व जातींच्या नागरिकांनी एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडवले. यंदाच्या मेळाव्यात रासमवाड, मुढेवाड, ढाणके, आचमवाड, एटलेवाड, यमजलवाड आणि चिंतलवाड या कुटुंबांतील 7 वधू-वरांचे ...
विनायक नगरात वारंवार वीज खंडित; नागरिकांची महावितरणकडे तक्रार

विनायक नगरात वारंवार वीज खंडित; नागरिकांची महावितरणकडे तक्रार

सामाजिक
नांदेड| शहरातील विनायक नगर परिसरात मागील अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून काही वेळा कमी दाबाने वीज येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी दाब, जुन्या व धोकादायक वीज खांबांची अवस्था तसेच तारांमधील बिघाड यामुळे परिसरातील दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. श्री विनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, विनायक नगर येथील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. परिसरात वीजेचा भार वाढल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असून स्वतंत्र डीपी (ट्रान्सफॉर्मर) बसवण्याची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिक...
हिमायतनगरमध्ये 31 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा (इजतेमाई शादिया) उत्साहात संपन्न

हिमायतनगरमध्ये 31 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा (इजतेमाई शादिया) उत्साहात संपन्न

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर येथे समाजसेवक हाजी अब्दुल वहीद यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही (इजतेमाई शादिया) सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. रविवारी संपन्न झालेल्या या सोहळ्यात एकूण 31 जोडप्यांचा विवाह आनंदात पार पडला. नांदेडचे रहिवासी व हिमायतनगरचे जावई असलेले हाजी अब्दुल वहीद सेठ हे होंडा कंपनीचे डीलर असून सामाजिक कार्यातही ते अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांच्या तहजीब फाउंडेशनच्या माध्यमातून २००७ पासून सामूहिक विवाह सोहळ्यांचा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नातून तब्बल ५४० जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या पार पडले आहेत. हिमायतनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या या सोहळ्यात विवाह विधी मौलाना मुफ्ती उबेदुल्लाह यांनी संपन्न करून दिले, तर हाफेज अजीम साब यांनी वधू-वरांसाठी दुआ केली. या प्रसंगी वधू-वरांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच शेकडो ...
जवळा देशमुख येथे बालविवाह विरोधी पथनाट्यातून जनजागृती

जवळा देशमुख येथे बालविवाह विरोधी पथनाट्यातून जनजागृती

सामाजिक
नांदेड | जवळा देशमुख येथे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रभावी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे यंदाच्या अक्षय तृतीया निमित्त नांदेड जिल्ह्यात होऊ घातलेले तब्बल ११ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. तरीदेखील काही ठिकाणी बालविवाहाच्या घटना समोर येत असल्याने जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे बालविवाहाचे दुष्परिणाम आणि त्यावरील कायदेशीर बंदी याबाबत संदेश दिला. या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, शिक्षिका संगिता बडवणे, शिक्षक उमाकांत बेंबडे व संतोष घटकार यांचे मार्गदर्शन लाभले. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार मुलाचे किमान विवाहयोग्य वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या कायद्याबाबत ग्रामीण स्तरावर जनजागृती कर...
नांदेड जिल्ह्यात स्व-गणनेचे आवाहन; 1 ते 15 मेदरम्यान नागरिकांनी सहभागी व्हावे

नांदेड जिल्ह्यात स्व-गणनेचे आवाहन; 1 ते 15 मेदरम्यान नागरिकांनी सहभागी व्हावे

सामाजिक
नांदेड| भारताची जनगणना-2027 ही देशातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार असून, त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी 1 ते 15 मे दरम्यान जास्तीत जास्त स्व-गणना करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हा नियोजन भवन येथे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी तसेच एनएसएस व एनसीसी समुपदेशकांची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी डिजिटल जनगणनेच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत स्व-गणनेचे महत्त्व अधोरेखित केले. स्व-गणनेसाठी नागरिकांना 1 ते 15 मे 2026 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर माहिती भरता येणार आहे. नोंदवलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत स्व-गणनेत सहभागी व्हावे आणि नांदेड जिल्ह्याला राज्यात अग्रस्थानी आणण्यासाठी यो...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजांचे प्रेरणास्थान : डॉ. राम वाघमारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजांचे प्रेरणास्थान : डॉ. राम वाघमारे

सामाजिक
अर्धापूर| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजांचे प्रेरणास्थान आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले. येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राम वाघमारे बोलत होते. कार्यक्रमास विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. वाघमारे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या समता, शिक्षण आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली. भीमजयंती साजरी करताना केवळ एक दिवसापुरता उत्साह न ठेवता तो वर्षभर टिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वाचन संस्कृती वाढवून समाजप्रबोधनासाठी पुढाकार घेण्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात प्रज्ञा बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर गाथा पठनाचा कार्यक्रम पार पडल...
उष्णतेच्या तीव्र लाटेत गुरुद्वारा सचखंड श्री हजुर साहिबला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कडक व्यवस्था – डॉ. विजय सतबीर सिंघ  

उष्णतेच्या तीव्र लाटेत गुरुद्वारा सचखंड श्री हजुर साहिबला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कडक व्यवस्था – डॉ. विजय सतबीर सिंघ  

धर्म अध्यात्म, सामाजिक
नांदेड | मराठवाड्यात सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे येणाऱ्या भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे, यासाठी गुरुद्वारा प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांच्या निर्देशानुसार, सर्व प्रवेशद्वारांवर व स्थानिक गुरुद्वारांमध्ये थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी निवासस्थाने, कार्यालये व गुरुद्वारांमध्ये प्रथमोपचार (First-Aid) किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, लंगरसोबत भाविकांना थंड लस्सी दिली जात असून वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका सतत सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ व ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह ...
“माँ गंगा गोदावरी शुद्धीकरण अभियान”चा 128 वा आठवडा यशस्वी

“माँ गंगा गोदावरी शुद्धीकरण अभियान”चा 128 वा आठवडा यशस्वी

सामाजिक
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरात सुरू असलेल्या “माँ गंगा गोदावरी शुद्धीकरण संकल्प अभियान” अंतर्गत वचनपूर्तीचा 128 वा आठवडा रविवारी (दि. 26 एप्रिल 2026) यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या उपक्रमात श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी येथील स्वयंसेवकांसह नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी अचानक गोदावरी तटावर भेट देऊन स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत स्वच्छता अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. अभियानाच्या उद्दिष्टांबाबत व भविष्यातील नियोजनावरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमामुळे गोदावरी नदी परिसर स्वच्छ व सुंदर राखण्यास मोठा हातभार लागत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशी माहिती ज्येष्ठ स्वयंसेवक तथा नेहरू इंग्लिश स्कूलचे प्रधाना...
उद्घाटनानंतरच कुलूप! हिमायतनगरात आयुष्मान आरोग्य मंदिर वर्षभरापासून बंद

उद्घाटनानंतरच कुलूप! हिमायतनगरात आयुष्मान आरोग्य मंदिर वर्षभरापासून बंद

आरोग्य, सामाजिक
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड हिमायतनगर, अनिल मादसवार | सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मागील वर्षी हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये येणाऱ्या संभाजीनगर येथे मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेले “आयुष्मान आरोग्य मंदिर” उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवसापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल वर्षभर उलटूनही हे केंद्र बंदच असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांच्या मते, उद्घाटनाच्या दिवशी मोठ्या घोषणाबाजी आणि गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात सेवा सुरू होण्याऐवजी दुसऱ्याच दिवशी दाराला कुलूप लागले. त्यानंतर आजपर्यंत येथे कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे “हे आरोग्य मंदिर आहे की बंद मंदिर?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आधीच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मर्यादित असताना अशा प्रकारे उभारलेले केंद्र निष्क्रिय ठेवणे ही ग...
भोकर तालुक्यातील जाकापुरमध्ये तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव

भोकर तालुक्यातील जाकापुरमध्ये तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव

सामाजिक
नांदेड/भोकर | भोकर तालुक्यातील जाकापुर येथे भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. ग्रामस्थांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी जागरण करावे लागत असून, अनेकांना लांब अंतर पायपीट करून केवळ एक घागर पाणी मिळवावे लागत आहे. महिलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून, दैनंदिन गरजाही भागवणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती 2026 मध्येही कायम असल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना एवढा संघर्ष करावा लागणे ही गंभीर बाब असल्याची बाब सोशल मीडियाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न श्रीधर जाधव यांनी केला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ टँकरद्वारे प...
error: Content is protected !!