उष्णतेच्या तीव्र लाटेत गुरुद्वारा सचखंड श्री हजुर साहिबला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कडक व्यवस्था – डॉ. विजय सतबीर सिंघ  

नांदेड | मराठवाड्यात सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे येणाऱ्या भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे, यासाठी गुरुद्वारा प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत.

गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांच्या निर्देशानुसार, सर्व प्रवेशद्वारांवर व स्थानिक गुरुद्वारांमध्ये थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी निवासस्थाने, कार्यालये व गुरुद्वारांमध्ये प्रथमोपचार (First-Aid) किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

याशिवाय, लंगरसोबत भाविकांना थंड लस्सी दिली जात असून वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका सतत सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ व ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान या सर्व सुविधांचे काटेकोर पालन करण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!