सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना असूनही माळाकोळी, सावरगावात भीषण पाणीटंचाई

कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना असूनही माळाकोळी, सावरगावात भीषण पाणीटंचाई

सामाजिक
लोहा तालुक्यात 60 विहीर-बोअर अधिग्रहण प्रस्ताव; अनेक गावांमध्ये टंचाई निवारणासाठी प्रशासनाची धावपळ लोहा| कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही लोहा तालुक्यातील माळाकोळी आणि सावरगाव नसरत या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माळाकोळी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे 32 कोटी रुपयांची जलयोजना सुरू असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तर सावरगाव नसरत येथे 23 कोटी रुपयांची योजना अर्धवट अवस्थेत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. माळाकोळी गावाला पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी पूर्वी ग्रामस्थांनी स्मशानभूमीत उपोषण आंदोलन केले होते. त्यानंतर योजना मंजूर झाली, उद्घाटनही झाले; मात्र गावात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यानंतर चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निगराणीत 32 कोटी रुपयांची नवीन योजना मंजूर करण्यात आली....
२७ मे रोजी धडक ठिय्या आंदोलन; “शासनाचा पगार घेता, मग मुख्यालयी राहायला लाज वाटते का?”

२७ मे रोजी धडक ठिय्या आंदोलन; “शासनाचा पगार घेता, मग मुख्यालयी राहायला लाज वाटते का?”

सामाजिक
हिमायतनगरमधील ‘मुजोर’ अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात २७ मे रोजी धडक ठिय्या आंदोलन; हलगी वाजवत केला जाणार निषेध हिमायतनगर,अनिल मादसवार | तालुक्यातील विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेरून ये-जा करत असल्याने सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची कामे रखडत असल्याचा संतापजनक आरोप पुढे आला आहे. या कथित निष्काळजी, मुजोर व सुस्त प्रशासनाविरोधात बुधवार, दि. २७ रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयावर “धडक ठिय्या व हलगी बजाव स्वागत आंदोलन” छेडण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ गायकवाड यांनी दिली. “शासनाचा लाखोंचा पगार आणि घरभाडे भत्ता घेतात, मग मुख्यालयी राहायला लाज वाटते का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. तालुक्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी नांदेडसह इतर शहरांतून आरामशीर ये-जा करत असल्याने कार्यालये वेळेवर सुरू हो...
डिझेलनंतर आता ग्रामीण भागात गॅस टंचाईचे चटके; ४५ दिवसांच्या प्रतीक्षेमुळे नागरिक हैराण

डिझेलनंतर आता ग्रामीण भागात गॅस टंचाईचे चटके; ४५ दिवसांच्या प्रतीक्षेमुळे नागरिक हैराण

सामाजिक
गॅसअभावी पुन्हा चूल पेटली; मोठ्या कुटुंबांपुढे स्वयंपाकाचा गंभीर प्रश्न हिमायतनगर | एकीकडे डिझेल टंचाईने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त असताना, आता घरगुती गॅस टंचाईनेही सामान्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, सिलेंडरसाठी तब्बल ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांतून व्यक्त होत आहे. विशेषतः मोठ्या कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी लागणारा गॅस लवकर संपत असल्याने गृहिणींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातील गॅस संपल्यानंतर नाईलाजाने पुन्हा पारंपरिक चूल पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भाग धुरमुक्त झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस वेळेवर मिळ...
हिमायतनगरातील भारतबाई मादसवार यांचे निधन: बासर येथे गोदावरीत अस्थीविसर्जन

हिमायतनगरातील भारतबाई मादसवार यांचे निधन: बासर येथे गोदावरीत अस्थीविसर्जन

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील बजरंग चौक परिसरातील रहिवासी भारतबाई नरसिंगा मादसवार यांचे सोमवार (दि. १८) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर तिसऱ्या दिवशी बुधवारी कुटुंबीयांनी बासर येथे पवित्र गोदावरी नदीत त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले. भारतबाई मादसवार या प्रेमळ, शांत स्वभावाच्या आणि कुटुंबवत्सल म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनामुळे मादसवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्या सहशिक्षक धर्मपुरी मादसवार यांच्या मातोश्री तर पत्रकार अनिल मादसवार यांच्या काकू होत्या....
नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंग्स व बॅनर्सवर कठोर कारवाई; संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंग्स व बॅनर्सवर कठोर कारवाई; संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

सामाजिक
नांदेड | नांदेड शहरातील वाढत्या अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनरबाजीवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. राज्य शासन व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई राबविण्यात येणार असून, विनापरवाना जाहिरात फलक लावणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. बैठकीस महापौर कविता संतोष मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी व्यंजने, प्रशांत शिंदे यांच्यासह उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निलेश संकेवार, उपायुक्त अजितपालसि...
नांदेड तालुक्यात जनगणना 2027 च्या प्रत्यक्ष कामास उद्यापासून प्रारंभ

नांदेड तालुक्यात जनगणना 2027 च्या प्रत्यक्ष कामास उद्यापासून प्रारंभ

सामाजिक
नांदेड| भारतीय जनगणना 2027 अंतर्गत घर यादी व घर गणना अभियानाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, नांदेड अंतर्गत सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांचे अंतिम प्रशिक्षण शंकराव चव्हाण सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील प्रत्यक्ष जनगणना कार्यास उद्यापासून प्रारंभ होत असून प्रशासनाने त्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. प्रशिक्षणादरम्यान जनगणना प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः “मांडणी दर्शक नकाशा” अचूक पद्धतीने तयार करणे, गावातील प्रत्येक घराची नोंद करणे तसेच घरांची क्रमवारी आणि भौगोलिक मांडणी याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली. याशिवाय केंद्र शासनाच्या “HLO App” चा वापर करून डिजिटल पद्धतीने माहिती नोंदविणे, माहिती अपलोड करणे, स्वगणना आयडी तपासणे आणि ऑनलाइन प्रक्रियेमधील अडचणी सोडविणे याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले...
महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; ९.८६ कोटी मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; ९.८६ कोटी मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी

सामाजिक
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेत राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशीलांची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात येणारे ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) देखील सहकार्य करणार आहेत. दुबार नावे, मृत व्यक्तींची नोंद वगळणे तसेच नव्या पात्र मतदारांची नोंदणी करणे, याव...
नांदेडमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी पारदर्शक मुलाखती; ५६९ उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण

नांदेडमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी पारदर्शक मुलाखती; ५६९ उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण

सामाजिक
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १३६२ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार, १५ मे रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा सेतू समितीच्या वतीने आयोजित या प्रक्रियेत अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड आणि माहूर या आठ तालुक्यांतील ५६९ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १५ मेपासून मुलाखत प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत एकूण १२ स्वतंत्र मुलाखत कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आठ तालुक्यांसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऊन व पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोठ...
नांदेड रेल्वे मंडळात ‘पर्यावरण संरक्षण शपथ’ व स्वाक्षरी अभियान उत्साहात

नांदेड रेल्वे मंडळात ‘पर्यावरण संरक्षण शपथ’ व स्वाक्षरी अभियान उत्साहात

सामाजिक
नांदेड| भारतीय रेल्वेतर्फे 15 मे ते 5 जून 2026 या कालावधीत “हवामान बदल व पर्यावरण संरक्षण” या विषयावर जागतिक पर्यावरण दिन अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत दक्षिण मध्य रेल्वेच्या हज़ूर साहिब नांदेड मंडळात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडल रेल व्यवस्थापक कार्यालय, हज़ूर साहिब नांदेड येथे पर्यावरण संरक्षण शपथ व स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संरक्षण व शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली. दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक बदल करण्यासह कुटुंबीय, मित्र आणि समाजातील इतर नागरिकांनाही पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याशिवाय हज़ूर साह...
दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षणादरम्यान हिमायतनगर शहरात भव्य शोभायात्रा; राष्ट्रभक्तीचा जागर

दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षणादरम्यान हिमायतनगर शहरात भव्य शोभायात्रा; राष्ट्रभक्तीचा जागर

सामाजिक
शौर्य, संस्कार आणि राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी प्रात्यक्षिक हिमायतनगर, अनिल मादसवार | विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत आयोजित दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवरून गुरुवार दिनांक 14 च्या रात्री भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या शोभायात्रेत सहभागी युवतींनी विविध शौर्य प्रात्यक्षिके सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरात भगवे ध्वज, घोषणाबाजी आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या दुर्गावाहिनीच्या युवतींमुळे परिसरात राष्ट्रभक्ती आणि संस्कारमय वातावरण निर्माण झाले होते. आत्मसंरक्षण, शिस्त, संघटन आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणाऱ्या या शोभायात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुर्गावाहिनीच्या माध्यमातून राष्ट्रभक्त, संस्कारित आणि स्वाभिमानी युवती घडविण्याचे महत्त्व या शोभायात्रेतून अधोरेखित करण्यात आले. प्रशिक्षण...
error: Content is protected !!