महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून सुरुवात

लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून सुरुवात

शेती
फेरी-९ अंतर्गत राज्यभर लसीकरण; १ कोटी लसमात्रांचे वितरण सुरू नांदेड| राज्यातील पशुधनाचे लाळखुरकूत (एफएमडी) या घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयव्हीबीपी संस्थेकडून प्राप्त झालेल्या १ कोटी लसमात्रांचे शीत साखळीच्या माध्यमातून सुरक्षितपणे वितरण सुरू करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेच्या कोल्ड रूममध्ये लस साठवून ठेवण्यात आली असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत लस वेळेत पोहोचविण्याची कार्यवाही सुरू आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक लससाठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार उपलब्ध १ कोटी लस...
घराघरात श्रावणबाळ घडले तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही

घराघरात श्रावणबाळ घडले तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही

महाराष्ट्र
घराघरात श्रावणबाळ घडले तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही; मात्र वृद्धाश्रमही सक्षमपणे टिकले पाहिजेत – डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर नांदेड| "घराघरात श्रावणबाळ झाले तर वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. वृद्धाश्रम ही आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा नाही, हे विधान निश्चितच खरे आहे. मात्र ज्यांना केवळ मुली आहेत, ज्यांना अपत्य नाही किंवा विविध कारणांमुळे वृद्धावस्थेत आधार मिळत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम हा एक महत्त्वाचा आणि सन्मानजनक पर्याय आहे. त्यामुळे वृद्धाश्रम केवळ अस्तित्वातच नव्हे तर अधिक सक्षम, संवेदनशील आणि सुसज्ज स्वरूपात टिकले पाहिजेत," असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक तथा प्रसिद्ध चिकित्सक डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांनी केले. स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच, नांदेड यांच्या वतीने "बाबा तुमच्यासाठी..." या उपक्रमांतर्गत संध्याछाया वृद्धाश्रम, नांदेड येथे आयोज...
श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात

श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात

शेती
पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; सुकत चाललेल्या खरीप पिकांना मिळाले जीवदान हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आणि ठिकठिकाणी देवदेवतांना पावसासाठी घातलेल्या साकड्यानंतर शनिवारच्या रात्रीपासून तालुक्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली. श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात झाल्याची भावना शेतकरी व नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील खरीप पिके सुकू लागली होती. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू केली होती, तर बहुतांश शेतकरी आभाळाकडे डोळे लाव...
कर्तव्यतत्पर पशुवैद्यकीय सेवेला सलाम!

कर्तव्यतत्पर पशुवैद्यकीय सेवेला सलाम!

शेती
गोवंश तस्करीप्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्पर सेवा; घटनास्थळी उपचार व नमुने संकलित नांदेड, अनिल मादसवार| मौजे बोंढार तर्फे हवेली, ता. नांदेड परिसरात गोवंश तस्करी व कत्तलीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून संपर्क साधण्यात आल्यानंतर जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, नांदेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव तरपेवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दि. १८ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत भूल देण्यात आलेल्या गोवंशावर डॉ. तरपेवाड यांनी तत्परतेने आवश्यक पशुवैद्यकीय उपचार केले. तसेच कत्तल करण्यात आलेल्या एका गोवंशाचे आवश्यक नमुने शास्त्रीय पद्धतीने संकलित करून पुढील तपासासाठी पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत संवेदनशीलता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत पशुवैद्यकीय विभागाने केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. डॉ. राजीव तरपेवाड व त्य...
डीपीडीसी बैठकीत आमदार बाबुराव कदम कोहळीकरांचा संताप; ‘लोडशेडिंग बंद करा, नाहीतर बैठकच थांबवा’

डीपीडीसी बैठकीत आमदार बाबुराव कदम कोहळीकरांचा संताप; ‘लोडशेडिंग बंद करा, नाहीतर बैठकच थांबवा’

महाराष्ट्र
ग्रामीण जनता अंधारात, महावितरणचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’! नांदेड, अनिल मादसवार| ग्रामीण भागातील जनता रात्रीच्या अंधारात आणि महावितरणचे अधिकारी मात्र जनतेच्या फोनपासून दूर, अशी संतप्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हदगाव–हिमायतनगरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रात्रीच्या लोडशेडिंगच्या प्रश्नावर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणला चांगलेच धारेवर धरले. वारंवार सूचना देऊनही अधिकारी सुधारत नसतील तर काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करा; अन्यथा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकेन किंवा बैठक इथेच समाप्त करावी, असा थेट इशारा आमदार कोहळीकर यांनी दिला. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित केला जात असताना शहरी भागाला तुलनेने वेगळे प्राधान्य का, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शहरी भागात माणसे...
जिल्हा विकासासाठी 867.59 कोटींच्या आराखड्याला मंजुरी; गुणवत्तापूर्ण कामांवर भर

जिल्हा विकासासाठी 867.59 कोटींच्या आराखड्याला मंजुरी; गुणवत्तापूर्ण कामांवर भर

महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार | जिल्ह्यातील विकासकामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ८६७.५९ कोटी रुपयांच्या नियोजनाला मंजुरी देण्यात आली. तसेच सन २०२५-२६ मधील ७९०.५७ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. बैठकीत शाळांमधील शौचालये, अतिरिक्त वर्गखोल्या, स्मशानभूमींसाठी जागा उपलब्ध करून देणे आणि इतर मूलभूत सुविधांवरील कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपूर्ण विकासकामे लवकर पूर्ण करावीत तसेच शाळांच्या जा...
तिरुपती लाडू देशात दुसरा, तर महाराष्ट्रातील माहूरच्या प्रसिद्ध तांबुल मानांकन मिळालेला पहिलाच ‘प्रसाद

तिरुपती लाडू देशात दुसरा, तर महाराष्ट्रातील माहूरच्या प्रसिद्ध तांबुल मानांकन मिळालेला पहिलाच ‘प्रसाद

धर्म अध्यात्म, तेलंगणा, महाराष्ट्र
'जीआय टॅग'; इतिहास, संस्कृती व परंपरेची जपणूक ' मंदिरात दररोज महाप्रसादाचे होतेय वाटप... श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील 'विडा तांबुल' या प्रसादाला अखेर बहुमानाचा भौगोलिक मानांकन ('जीआय टॅग') मिळाला आहे. केंद्र सरकारच्या चेन्नई येथील 'जिओग्राफिकल इंडिकेशन्स' रजिस्ट्रीने याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र प्रसिद्ध केले आहे. भारतात यापूर्वी केवळ तिरुपतीच्या लाडूला प्रसादाच्या स्वरूपात 'जीआय टॅग' मिळाला होता. त्यानंतर हा बहुमान मिळवणारा माहूरचा तांबुल हा देशातील दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद ठरला आहे. माहूरगड श्री रेणुका मातेचा पानाच विडा तांबुल हा मुख्यप्रसाद आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात. ज्या ठिकाणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्...
नेताजी पालकर समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी सकल मराठा समाजाचा पाठिंबा

नेताजी पालकर समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी सकल मराठा समाजाचा पाठिंबा

महाराष्ट्र
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाला वाढता प्रतिसाद; प्रशासनाकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन नांदेड | स्वराज्याचे सरसेनापती छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे नेताजी पालकर यांच्या तामसा (ता. हदगाव) येथील समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करून उच्च दर्जाचे स्मारक उभारावे, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला सकल मराठा समाज, नांदेड जिल्ह्याने जाहीर पाठिंबा दिला. छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण आणि मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील हे १६ जुलैपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांच्या मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. तसेच १७ जुलै रोजी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे आणि जिल्हा प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली. आंदोलना...
मुखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या

मुखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या

शेती
शेतकरी पुत्रांचे तहसीलदारांना निवेदन; भारनियमन कमी करण्याचीही मागणी मुखेड/नांदेड, प्रतिनिधी| मुखेड तालुक्यात पावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके करपली असून, अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेती काळी पडली आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी पुत्रांनी तहसीलदार शंकर लाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली असून, काही भागात बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर शेतकऱ्...
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : आधुनिक शेतीसाठी अनुदानाची सुवर्णसंधी; महाडीबीटीवर अर्ज सुरू

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : आधुनिक शेतीसाठी अनुदानाची सुवर्णसंधी; महाडीबीटीवर अर्ज सुरू

शेती
नांदेड| एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी नांदेड जिल्ह्यास रु. २६८.३६ लाखांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. फळबाग लागवड, रोपवाटिका, हरीतगृह, शेडनेट, शेततळे, कांदाचाळ, अळिंबी उत्पादन, मधुमक्षिकापालन, कृषी यांत्रिकीकरण, शीतगृह, पॅक हाऊस आदी विविध घटकांसाठी आकर्षक अनुदान उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार राधाकृष्ण कळसाईत यांनी केले आहे. या अभियानाचा उद्देश आधुनिक, शाश्वत आणि कमी खर्चातील शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रातील लहान व मोठ्या रोपवाटिका, विविध फळपिकांची लागवड, अळिंबी व बीज उत्पादन केंद्र, कंपोस्ट युनिट, सुगंधी व औषधी वनस्पती, फुलशेती, मसाला पिके, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक व वैयक्तिक शेततळे, हरीतगृह, शेडनेट, प्लास्टिक मल्च...
error: Content is protected !!