महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

पावसाच्या खंडात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजना राबवावी

पावसाच्या खंडात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजना राबवावी

शेती
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन; सोयाबीन, मूग, उडीद पिकांवर परिणाम, कपाशी व तुरीलाही पाण्याच्या ताणाचा धोका नांदेड| ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील हलक्या मुरमाड व माळरानाच्या जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, मूग आणि उडीद या कमी कालावधीच्या पिकांना फटका बसला असून, कपाशी व तूर या दीर्घ कालावधीच्या पिकांवरही पाण्याच्या ताणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. पिके व जमिनीतील ओलाव्याचे निरीक्षण : पिकांची वाढीची अवस्था आणि जमिनीतील उपलब्ध ओलावा याचे नियमित निरीक्षण करून त्यानुसार ...
शहापूर येथे एसबीआय बँकेची शाखा स्थापन करण्याची मागणी

शहापूर येथे एसबीआय बँकेची शाखा स्थापन करण्याची मागणी

महाराष्ट्र
२५ गावांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध होणार; खासदार अजित गोपछडे यांना निवेदन देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील शहापूर हे परिसरातील महत्त्वाचे उपबाजारपेठेचे गाव असून, गावाशी जवळपास २० ते २५ खेड्यांचा थेट संपर्क आहे. मात्र, गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नसल्याने नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहारांसाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे शहापूर येथे भारतीय स्टेट बँकेची (SBI) शाखा तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात अधिवक्ता श्रीकांत कोपले आणि भाजपाचे सोशल मीडिया तालुकाप्रमुख संजय पांचाळ यांनी खासदार डॉ. अजित गोपछडे यांना निवेदन देऊन बँक शाखा स्थापन करण्याची मागणी केली. शहापूरची लोकसंख्या सुमारे दहा हजारांहून अधिक असून, गावात सात-आठ आडत व्यापारी, पाच-सहा सराफा व्यावसायिक, ५० पेक्षा अधिक किराणा दुकाने तसेच सात-आठ का...
पीपल्स हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

पीपल्स हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

क्रीडा
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधींचे मार्गदर्शन नांदेड, प्रतिनिधी| हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स हायस्कूल, नांदेडच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण व्हावी तसेच खेळातून मिळणाऱ्या विविध संधींची माहिती व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नौनिहाल सिंघ जहागीरदार होते. पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य सुकाळे सर यांची विशेष उपस्थिती होती. नांदेडचे प्रसिद्ध हॉकीपटू प्रा. डॉ. सरदार जुझारसिंग सिलेदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सिलेदार यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व तसेच क्रीडा क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधींची माहिती दि...
शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणार : गुणवंत पाटील हंगरगेकर

शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणार : गुणवंत पाटील हंगरगेकर

शेती
जन्मदिनानिमित्त विशेष अंकाचे विमोचन; शेतकरी, बाजारव्यवस्था आणि सामाजिक वास्तवावर परखड भाष्य नांदेड, प्रतिनिधी| “शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी माझ्या कुवतीप्रमाणे आणि क्षमतेनुसार झिजता आले, याचे समाधान आहे. अन्नदात्या पोशिंद्याचे जीवन अधिक समृद्ध, सन्मानपूर्ण आणि स्वाभिमानी व्हावे, यासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत झटण्याचा माझा संकल्प आहे,” असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात एका दैनिकाच्या विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी रामेश्वर बद्दर, डॉ. पाटील, गोविंद मुंडकर आणि बालाजी वैजळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना हंगरगेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. शेतकरी हा केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेचा घटक नसून संपूर्ण समाजव्यवस्थेचा पोशिंदा आ...
कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाची दडी; शहापूर परिसरात सोयाबीनला तुषार सिंचनाचा आधार

कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाची दडी; शहापूर परिसरात सोयाबीनला तुषार सिंचनाचा आधार

शेती
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाचे असमान वितरण अनुभवायला मिळत असून, शहापूर परिसरातील काही शिवारांत अतिपावसामुळे पिके पिवळी पडत आहेत, तर काही भागात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपू लागली आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आता बोअरवेलचा आधार घेत तुषार सिंचनाद्वारे सोयाबीनला पाणी देण्याची वेळ आली आहे. शहापूर परिसरात यंदा प्रथमच शेतकऱ्यांना अक्षरशः ‘ऊन-सावलीचा खेळ’ अनुभवायला मिळत आहे. आलूर, कोटेकलूर, लिंबा, शेवाळा, करेमलकापूर आदी शिवारांत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आजही शेतात वापसा झालेला नाही. परिणामी काही ठिकाणी खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत. याउलट सुडगी, सुडगी फाटा, नरगल, मडगी, चैनपूर आदी शिवारांत अपेक्षित पाऊस न झाल्याने सोयाबीनची पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. शेतकऱ्यांनी छोट्या-मोठ्या पावसाच्या भरवशावर सोयाबीनची लागवड के...
तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे क्रीडांगणे पडली ओस; प्रशासनाचे दुर्लक्ष!

तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे क्रीडांगणे पडली ओस; प्रशासनाचे दुर्लक्ष!

क्रीडा
नियमित प्रशिक्षण, स्पर्धांचे नियोजन ठप्प; होतकरू खेळाडूंचे नुकसान देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्रीडांगणांवर सध्या सामसूम वातावरण दिसून येत असून, तालुका क्रीडा अधिकारी पद रिक्त असल्याचा फटका खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना बसत आहे. नियमित मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धांचे नियोजन आणि क्रीडा उपक्रमांना अपेक्षित गती मिळत नसल्याने अनेक क्रीडांगणे अक्षरशः ओस पडल्याचे चित्र आहे. देगलूर तालुक्यात ग्रामीण तसेच शहरी भागातील युवक-युवतींमध्ये विविध खेळांविषयी मोठी आवड आहे. अनेक होतकरू खेळाडू नियमित सराव करून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची तयारी करीत आहेत. मात्र, त्यांना आवश्यक प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्पर्धांची योग्य माहिती व नियोजन मिळत नसल्याने त्यांच्या क्रीडा गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळत नसल्याची खंत पालक व क्रीडाप्रेमींमधून...
हिमायतनगर एसबीआयचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर! सीटीएस मशीन १५ दिवसांपासून बंद

हिमायतनगर एसबीआयचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर! सीटीएस मशीन १५ दिवसांपासून बंद

महाराष्ट्र
धनादेश क्लिअरन्ससाठी ग्राहकांच्या चकरा, कर्ज व कृषी कर्जाच्या कामांनाही फटका हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंक (State Bank of India) च्या शाखेतील भोंगळ कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला असून, गेल्या पंधरा दिवसांपासून सीटीएस (Cheque Truncation System) मशीन बंद असल्याने सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. धनादेश क्लिअरन्सपासून कर्ज, कर्जमाफी आणि कृषी कर्जाशी संबंधित कामांना विलंब होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हिमायतनगर शहरातील ग्राहक-व्यापारी गजानन मुत्तलवाड यांनी मागील पंधरा दिवसांपासून धनादेश क्लिअरन्ससाठी बँकेच्या चकरा मारूनही काम होत नसल्याचा आरोप केला आहे. शाखेतील चेक तपासणीसाठी आवश्यक असलेले सीटीएस मशीन बंद असल्याने धनादेश वटविण्याची प्रक्रिया रखडली असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या एसबीआय शाखेत गेल्यावरही...
ज्येष्ठांच्या न्यायिक हक्कांच्या लढ्याला सर्वोच्च न्यायालयाचे बळ; ‘फेस्कॉम’च्या मागण्या घटनात्मक असल्याचा दावा

ज्येष्ठांच्या न्यायिक हक्कांच्या लढ्याला सर्वोच्च न्यायालयाचे बळ; ‘फेस्कॉम’च्या मागण्या घटनात्मक असल्याचा दावा

महाराष्ट्र
नांदेड, प्रतिनिधी | ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे मोठे बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम, नांदेडचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी व्यक्त केली आहे. वृद्धापकाळात पालकांची देखभाल न करणाऱ्या तसेच त्यांची हेळसांड करणाऱ्या मुलांविरोधात कठोर भूमिका घेण्यासंदर्भातील न्यायालयीन भूमिकेमुळे ज्येष्ठांच्या न्यायिक हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. वैद्य यांनी सांगितले की, फेस्कॉमच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून मांडण्यात येत असलेल्या मागण्या कोणत्याही प्रकारे बेकायदा अथवा घटनाबाह्य नाहीत. भारतीय संविधानातील अनुच्छेद १५(३), २१, ३९(अ), ४१ आणि ५१अ तसेच ज्येष्ठ नागरिक कायदा, २००७ मधील तरतुदींचा त्यांच्या मागण्यांना आधार असल्याचा द...
NHAI फिरते पथकाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; आर्थिक वसुलीच्या आरोपांची चौकशी करा

NHAI फिरते पथकाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; आर्थिक वसुलीच्या आरोपांची चौकशी करा

महाराष्ट्र
सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांची मागणी नांदेड, प्रतिनिधी| खडकूत येथील किया शोरूमसमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) फिरत्या पथकाने मोटारसायकली हटविण्याची कारवाई केल्याने वाहनधारकांमध्ये काही काळ गोंधळ व धावपळ उडाली. या कारवाईदरम्यान नागरिकांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, परिसरातील व्यावसायिकांकडून आर्थिक वसुली केली जात असल्याच्या चर्चेचीही निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केली आहे. शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता कॉ. गंगाधर गायकवाड हे वाहन सर्व्हिसिंगसाठी खडकूत येथील किया शोरूममध्ये गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. NHAIची चारचाकी सायरन वाजवत शोरूमसमोर आली. वाहनामध्ये अंदाजे ७ ते ८ व्यक्ती असल्याचे दिसून आले. त्यापैकी काही जणांनी खाकी रंगाचे कपडे परिधान केले होते. संबंध...
डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणातील सचिन अंदुरेला जामीन व जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणातील सचिन अंदुरेला जामीन व जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

महाराष्ट्र
अं नि स मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार नांदेड, गोविंद मुंडकर| महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजीतसिंह भोसले यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला आणि पुण्यातील विशेष न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली. पुणे येथे 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. ओंकारेश्वर परिसरातील महर्षी विठ्ठल रामजी शि...
error: Content is protected !!