महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनावर १५ एप्रिलला डिजिटल शेतीशाळा-३

पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनावर १५ एप्रिलला डिजिटल शेतीशाळा-३

शेती
पुणे/नांदेड| शाश्वत शेतीकडे वाटचाल करताना कीड व्यवस्थापनात पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या विशेष डिजिटल शेतीशाळा मालिकेतील तिसरे सत्र १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शेतीशाळेत ‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे तसेच मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या उपाययोजनांद्वारे कीड नियंत्रण कसे साधता येईल, याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्चात बचत आणि मृदास्वास्थ्य जपण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. दरम्यान, या मालिकेतील पहिल्या दोन डिजिटल ...
उदगीरात मराठी पत्रकार अधिवेशनासाठी सभामंडपाचे भूमिपूजन

उदगीरात मराठी पत्रकार अधिवेशनासाठी सभामंडपाचे भूमिपूजन

महाराष्ट्र
उदगीर | उदगीर येथे येत्या 18 व 19 एप्रिल रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या अधिवेशनासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. हे अधिवेशन उदगीरमधील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात येत असून, दोन दिवसीय कार्यक्रमात विविध समकालीन विषयांवर परिसंवाद होणार आहेत. राज्यभरातील नामवंत पत्रकार, तसेच युवा राजकीय नेते या अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या अधिवेशनासाठी संकुलात भव्य व सुसज्ज सभामंडप उभारण्यात येत असून, तयारीला वेग आला आहे. यावेळी लातूर विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव व मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, संयोजन समितीचे युवराज धोतरे , बिभीषन मद्देवाड ,अर्जुन जाधव , सि...
हिमायतनगरात निकृष्ट नाली बांधकामावर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; काम बंद पाडले

हिमायतनगरात निकृष्ट नाली बांधकामावर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; काम बंद पाडले

महाराष्ट्र
अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार काम झाले तरच पुढे काम करू देऊ, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबू - पाटील  हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत ठेकेदाराचे काम थेट बंद पाडले. अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही कामात सुधारणा न झाल्याने हा संघर्ष उफाळून आला.  https://www.youtube.com/watch?v=4tTBXMy_cNE&t=4s माहितीनुसार, सुमारे 295 कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप वारंवार होत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून काम थांबवण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंते घटनास्थळी भेट देऊन अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करण...
आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली; खा. अशोकराव चव्हाण यांनी आठवणींना दिला उजाळा

आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली; खा. अशोकराव चव्हाण यांनी आठवणींना दिला उजाळा

महाराष्ट्र
नांदेड| स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी व्यक्त केलेली नांदेड भेटीची इच्छा त्यांच्या निधनामुळे अपूर्णच राहिली. त्यांच्या या अपूर्ण इच्छेची हळहळ व्यक्त करत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आशाताईंनी “मला नांदेडला यायचं आहे, सचखंड गुरुद्वारा (Sachkhand Gurudwara) येथे दर्शन घ्यायचे आहे. आपण लवकरच कार्यक्रम ठरवूया,” असा शब्द दिला होता. मात्र नियतीला हे मान्य नसल्याने त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली, असे चव्हाण यांनी भावुक शब्दांत सांगितले. सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी आशाताईंशी असलेल्या स्नेहबंधांचा विशेष उल्लेख केला. ९०च्या दशकात आशाताई नांदेडला आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा सचखंड गुरुद्वारात दर्शनासाठी येण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, असे त्यांनी नमूद केले. कोरोना काळानंतर प्रसाद महाडकर यांच्या माध्यमातून आशाताईंशी द...
केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर

केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर

शेती
शेतकऱ्यांचा लढा व आ. श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश नांदेड|मुदखेड, बारड आणि अर्धापूर महसुली मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा अखेर मंजूर झाला असून, या मंडळांसाठी उच्च व निम्न तापमानाची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी ७४ हजार ६७८ रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे. गतवर्षी जून महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे या तीनही मंडळातील सुमारे ४ हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे सलग पाच दिवस प्रतिकूल तापमानामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तापमानाची नोंद असूनही विमा कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांचे दावे फेटाळले जात होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, या शेतकऱ्यांनी भोकर विधानसभा ...
रेती माफियाचे जाळे मोडणार ? नदीचा प्रवाह बदलणे म्हणजे ‘राष्ट्रीय अपराध

रेती माफियाचे जाळे मोडणार ? नदीचा प्रवाह बदलणे म्हणजे ‘राष्ट्रीय अपराध

महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील रेती घोटाळ्याने आता केवळ स्थानिक पातळीवरील गैरव्यवहाराची चौकट ओलांडली असून, तो थेट शासनव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा गंभीर विषय ठरला आहे. महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती च्या अलीकडील दौऱ्यानंतर परिस्थितीची भीषणता उघड झाली असली, तरी ही कारवाई खरोखर परिणामकारक ठरणार की केवळ दिखाऊ ठरणार, याबाबत जनतेत तीव्र संशय आहे. गुरुवार, 9 एप्रिल रोजी झालेल्या पाहणीत समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी घटनास्थळी जे वास्तव पाहिले, ते धक्कादायक होते. नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यासाठी जाणीवपूर्वक छेडछाड करण्यात आली होती. हा प्रकार केवळ पर्यावरणीय उल्लंघन नसून, थेट ‘राष्ट्रीय अपराध’ असल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले. विशेष म्हणजे, हा प्रकार रेती माफिया आणि प्रशासनातील काही घटकांच्या संगनमताशिवाय शक्यच नाही, असे संकेतही त्यांनी दिले. या पार्श्वभूमीव...
आदिलाबाद स्थानकावर पायाभूत कामांना गती; RUB व FOB प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण

आदिलाबाद स्थानकावर पायाभूत कामांना गती; RUB व FOB प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड रेल्वे विभागाची उल्लेखनीय कामगिरी; प्रवाशांच्या सुरक्षिततेत होणार वाढ नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आदिलाबाद स्थानकावर दोन महत्त्वाची पायाभूत सुविधा संबंधित कामे यशस्वीपणे पूर्ण करत गती शक्ती युनिटच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. या कामांदरम्यान रेल्वे वाहतुकीत कमीत कमी अडथळा येईल याची विशेष दक्षता घेण्यात आली. मार्च महिन्याच्या अखेरीस आदिलाबाद स्थानक यार्डमध्ये लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 30 ऐवजी प्रस्तावित रोड अंडर ब्रिज (RUB) बांधकामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. या अंतर्गत 26.8 मीटर लांबीचा RH गर्डर ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान ट्रॅकखाली बसवून त्यानंतर प्रीकास्ट RCC बॉक्स सेगमेंटच्या साहाय्याने मजबूत संरचना उभारण्यात आली. या प्रक्रियेत ट्रॅकखाली दोन व्हेंट असलेला RUB तयार करण्यात आला. प्रत्येक व्हेंटमध्ये 1.50 मीटर रुंदीचे आठ RCC बॉक्स सेगमेंट...
हिमायतनगरात भूकंपाचा धक्का; घराच्या छताचा भाग कोसळला, अनर्थ टळला

हिमायतनगरात भूकंपाचा धक्का; घराच्या छताचा भाग कोसळला, अनर्थ टळला

महाराष्ट्र
हजरत उमर चौक परिसरातील घटना; नागरिकांमध्ये क्षणिक भीती हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यात शनिवारी सकाळी जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याचा परिणाम हिमायतनगर शहरातही दिसून आला. हजरत उमर चौक परिसरातील अलकरीम मशिदीजवळील एका घराच्या छताचा भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर शहरातील अलकरीम मशिदीजवळील इंडिया वॉटर प्लांटजवळ राहणारे अब्दुल गफार अब्दुल जब्बार हे सकाळी झोपेत असताना सुमारे पावणे नऊ वाजताच्या सुमारास अचानक जमीन हलल्याचा अनुभव आला. त्याच वेळी जोराचा आवाज झाला आणि भूकंपाचा धक्का जाणवला. घराबाहेर येऊन पाहिले असता त्यांच्या घराच्या छताचा काही भाग कोसळलेला दिसून आला. मात्र त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हिमायतनगर शहरातील विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाण...
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रता नोंद

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रता नोंद

महाराष्ट्र
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; कोणतीही जीवितहानी नाही नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यात आज सकाळी 8.45 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड शहरासह ग्रामीण भाग, अर्धापूर, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील काही गावांमध्ये जमीन हलल्याची व भूगर्भातून आवाज आल्याची माहिती नागरिकांनी प्रशासनाला दिली. प्राथमिक तपासणीनुसार National Center for Seismology च्या संकेतस्थळावर या धक्क्याची नोंद करण्यात आली असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावाच्या उत्तरेला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असून यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. संबंधित तहसीलदारांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास याबाबत अहवाल साद...
मराठवाडा–विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये क्षणिक भीती

मराठवाडा–विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये क्षणिक भीती

महाराष्ट्र
नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ परिसरात जाणवले कंप; कोणतीही हानी नाही नांदेड| आज सकाळी सुमारे ८ वाजून ४५ ते ४६ मिनिटांच्या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या अचानक झालेल्या कंपामुळे नागरिक काही काळ घाबरून घराबाहेर पडले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तीय हानी झाल्याचे वृत्त नाही. वाशिम शहरासह परिसरात सकाळी ८.४५ वाजता हलके धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी भागातही त्याच वेळेत भूकंपाचा कंप जाणवला. नांदेड शहर आणि आसपासच्या भागात हा धक्का सुमारे ८.४६ वाजता जाणवला असल्याची माहिती नागरिकांनी दिली. भूकंपाच्या वेळी काही नागरिकांनी भूगर्भातून आवाज येऊन जमीन हलल्याचा अनुभव सांगितला. अचानक झालेल्या या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही मिनिटांत परिस्थिती पूर्ववत झाली. दरम्यान, Nat...
error: Content is protected !!