उन्हाळी गर्दीवर उपाय; हजूर साहिब नांदेड–आसनसोल दरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरू

नांदेड| उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत हजूर साहिब नांदेड–आसनसोल विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 07701 ही विशेष गाडी दि. 21 एप्रिल 2026 रोजी हजूर साहिब नांदेड येथून रात्री 23:50 वाजता सुटेल आणि आसनसोल येथे गुरुवारी दुपारी 12:00 वाजता पोहोचेल. मार्गात पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, टाटानगर, चांदिल आणि पुरुलिया या प्रमुख स्थानकांवर थांबे असतील.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 07702 ही विशेष गाडी दि. 23 एप्रिल 2026 रोजी आसनसोल येथून दुपारी 14:00 वाजता सुटेल आणि शनिवारी पहाटे 00:45 वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.

परतीच्या मार्गातही ही गाडी पुरुलिया, चांदिल, टाटानगर, राऊरकेला, झारसुगुडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, बडनेरा, अकोला, वाशिम, हिंगोली आणि पूर्णा येथे थांबे घेईल.

या विशेष रेल्वेगाडीत एकूण 24 डबे असतील. त्यामध्ये 02 एसी टू टियर, 06 एसी थ्री टियर, 10 स्लीपर क्लास, 04 जनरल सेकंड क्लास आणि 02 एसएलआर डब्यांचा समावेश आहे.

प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा तसेच प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करून नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!