महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड मनपा प्रकरणाची मंत्रालयात 11 मे रोजी सुनावणी

नांदेड मनपा प्रकरणाची मंत्रालयात 11 मे रोजी सुनावणी

महाराष्ट्र
नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या (मनपा) एका महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी आता मंत्रालयात होणार आहे. शिवाजीनगर (झोन क्र. 3) येथील कोनाळे कोचिंग क्लासेसच्या अवैध बांधकामाबाबत आणि सहाय्यक आयुक्त रमेश चवरे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. या संदर्भात नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी मनपाकडून चौकशी अहवाल मागवला होता. मात्र मनपाने या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. त्यामुळे अवर सचिव जयंत वाणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रांसह 11 मे 2026 रोजी मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. कोनाळे कोचिंग क्लासेसच्या अवैध बांधकामाबाबत 2023 मध्येच नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये पुन्हा नोटीस देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. 2024 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत कारव...
‘गुणवत्तेचा बळी’ की विकासाचा दिखावा? जि.प. बांधकाम विभागातील मनमानीवर नागरिक संतप्त

‘गुणवत्तेचा बळी’ की विकासाचा दिखावा? जि.प. बांधकाम विभागातील मनमानीवर नागरिक संतप्त

महाराष्ट्र
हिमायतनगर| जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभागात प्रभारी कार्यकारी अभियंत्यांच्या कारकिर्दीत विकासकामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निकृष्ट कामे, अंदाजपत्रकाकडे दुर्लक्ष आणि कंत्राटदारांच्या मर्जीप्रमाणे सुरू असलेल्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. नियमित कार्यकारी अभियंत्यांची बदली झाल्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांकडे सूत्रे गेल्यापासून कामांच्या दर्जात लक्षणीय घसरण झाल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. रस्ते व इतर बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता खालावलेली असताना, कंत्राटदारांची बिले मात्र मंजूर झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण व सिमेंटीकरण अपूर्ण असतानाही कामे पूर्ण दाखवून आर्थिक व्यवहार उरकले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिणामी, कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळत नसल्याची तीव...
नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये तुफान गर्दी; हिमायतनगर स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ

नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये तुफान गर्दी; हिमायतनगर स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ

तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये प्रचंड गर्दी झाल्याने हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. सर्व डबे हाऊसफुल झाल्यामुळे हिमायतनगरहून नांदेड व पुढील गावांकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांना गाडीत चढता आले नाही. दरम्यान, रेल्वेने स्थानकावर अपेक्षेपेक्षा कमी वेळ थांबा घेतल्याने परिस्थिती अधिकच बिघडली. तिकीट काढूनही प्रवास करता न आल्यामुळे अनेक प्रवाशांना स्टेशनवरच थांबावे लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी तिकीटाचे पैसे परत मागितले असता सुरुवातीला स्टेशन मास्टरने टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, प्रवाशांचा रोष वाढत असल्याचे पाहून अखेरीस तिकीटाची रक्कम परत करण्यात आली. याबाबत माहिती देताना मंगरूळ येथी...
पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू – पालकमंत्री अतुल सावे

पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू – पालकमंत्री अतुल सावे

महाराष्ट्र
नांदेड| राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निश्चित पाठपुरावा करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज नियोजन भवन, नांदेड येथे पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष विजय जोशी व समितीचे जिल्हा समन्वयक राम तरटे यांच्या पुढाकारातून ही भेट आयोजित करण्यात आली. अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भातील विविध मागण्या मांडल्या. यावेळी खासदार अशोकराव चव्हाण, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच पोलिस अधीक...
नांदेड विभागातील रेल्वे प्रश्नांवर 12 जूनला निर्णायक बैठक; प्रवाशांच्या अपेक्षा शिगेला

नांदेड विभागातील रेल्वे प्रश्नांवर 12 जूनला निर्णायक बैठक; प्रवाशांच्या अपेक्षा शिगेला

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| दक्षिण मध्य रेल्वेची महत्त्वपूर्ण बैठक दि. 12 जून 2026 रोजी नांदेड येथे होणार असून, या बैठकीत मराठवाडा व सीमावर्ती भागातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर तोडगा निघावा, अशी जनतेची तीव्र अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रवासी, सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांनी विविध मागण्यांचा पाढा मांडत रेल्वे प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी सोशल मीडियातून केली जात आहे. यामध्ये प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून, आदिलाबाद येथे पिट लाईन सुरू करून नांदेड स्टेशनवरील ताण कमी करणे, नागपूर–छत्रपती संभाजीनगर नवी रेल्वे सेवा किनवट–आदिलाबाद मार्गे सुरू करणे, नंदीग्राम एक्सप्रेसचा विस्तार गोंदिया पर्यंत करणे, तसेच कोल्हापूर–धनबाद एक्सप्रेसला हिमायतनगर येथे थांबा द्यावा. नांदेड–आदिलाबाद इंटरसिटीला हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथे थांबा देण्यात देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच काजीपेट–लोकमान्य...
रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष जाळू नका; दक्षिण मध्य रेल्वेचे शेतकऱ्यांना आवाहन

रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष जाळू नका; दक्षिण मध्य रेल्वेचे शेतकऱ्यांना आवाहन

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड विभागातील धेंगली पिंपळगाव – मानवत रोड रेल्वे मार्गावर २५७/८२ किमी अंतरावर लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. सुदैवाने या आगीमुळे रेल्वे वाहतुकीला तात्काळ अडथळा निर्माण झाला नाही, मात्र मोठा धोका टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राथमिक तपासानुसार, शेतातील पिकांचे अवशेष जाळल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामप्रतिनिधी आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांच्या समन्वयाने आग तात्काळ आटोक्यात आणण्यात आली. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष किंवा शेतीतील कचरा जाळणे अत्यंत धोकादायक आहे. अशा आगी वाऱ्यामुळे वेगाने पसरून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर (OHE), सिग्नल यंत्रणा, तसेच रेल्वेच्या इतर महत्त्वाच्या सुविधांचे मोठे नुकसान करू शकतात. यामुळे प्रवाशांच्...
एचटीबीटी कपाशी बियाण्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश

एचटीबीटी कपाशी बियाण्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश

शेती
नांदेड| जिल्ह्यात एचटीबीटी कपाशी बियाण्यांची साठवणूक, वाहतूक व विक्री यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले आहेत. अशा प्रकरणांमध्ये तातडीने कायदेशीर कारवाई करून पोलीसांकडून गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कापूस लागवडीची तयारी करत असताना बाजारात अनधिकृत व बंदी असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी महसूल, कृषी व पोलीस विभागाच्या समन्वयातून जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी किडरोग सल्ला प्रकल्पाचे पुनर्रचना, दक्षता पथकाची स्थापना, तसेच कपाशी पिकातील तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना लहान यंत्रे उपलब्ध करून देणे व त्याचा प्रसार करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, क्षेत्रीय स्तरावर पथकांमार्फत तपासणी मोहीम राबविण्याचेही आद...
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

महाराष्ट्र
नांदेड| राज्यातील सर्व घटकांचा विचार करून शेतकरी, रोजगार, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून ‘विकसित भारत 2047’च्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, महापौर कविता मुळे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कामगार दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छाही दिल्या. पालकमंत्र्यांनी सांगितले की, जनगणना-२०२७ चा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला असून १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना व १६ मे ते १४ जूनदरम्यान घरनोंदणी प्रक्रिया होणार आहे. या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आव...
जनगणना-२०२७ उपक्रमासाठी सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

जनगणना-२०२७ उपक्रमासाठी सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

महाराष्ट्र
नांदेड| देशभर सुरू झालेल्या जनगणना-२०२७ प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी स्वतः स्व-गणना करत मोहिमेची सुरुवात केली. नागरिकांनी स्व-गणना करताना सेल्फी काढून या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदवावा व इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणना प्रक्रिया होणार आहे. नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन भरता येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान घरनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ...
रेती वसुली प्रकरण पेटले; महाराष्ट्र दिनीच आमरण उपोषण सुरू

रेती वसुली प्रकरण पेटले; महाराष्ट्र दिनीच आमरण उपोषण सुरू

महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून रेतीसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून सुरू असलेला वाद आता तीव्र झाला असून, १ मे महाराष्ट्र दिनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. तक्रारदार अशोक रामराव हिवराळे आणि साईनाथ गंगाधर पांढरे यांनी आंदोलनाला प्रारंभ केला आहे. बिलोली तालुक्यातील सगरोळी, येजगी, गंजगाव, हुणगुंदा व बोळेगाव येथील रेती घाटांवर अवैध उत्खनन व घरकुल लाभार्थ्यांकडून बेकायदेशीर वसुली होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणी अनेक वेळा वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर तात्काळ निलंबनाची क...
error: Content is protected !!