ओखा–मदुराई विशेष रेल्वे आता नियमित “ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस” म्हणून धावणार

नांदेड| पश्चिम रेल्वेने सध्या धावणारी गाडी क्रमांक 09520/09519 ओखा–मदुराई–ओखा विशेष साप्ताहिक रेल्वे नियमित करण्यात आली असून ती आता गाडी क्रमांक 19560/19559 ओखा–तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या निर्णयामुळे गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक नियमित व सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.

गाडी क्रमांक 19560 ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस ओखा येथून 11 मे 2026 पासून दर सोमवारी रात्री 11.35 वाजता सुटणार असून द्वारका, जामनगर, राजकोट, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, बासर, निजामाबाद, काचेगुडा, गडवाल, कर्नुल सिटी आणि ढोणे मार्गे बुधवारी रात्री 11.30 वाजता तिरुपती येथे पोहोचणार आहे. तसेच गाडी क्रमांक 19559 तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस तिरुपती येथून 14 मे 2026 पासून दर गुरुवारी सकाळी 8.15 वाजता सुटेल आणि त्याच मार्गाने शनिवारी सकाळी 11.50 वाजता ओखा येथे पोहोचेल.

या गाडीत एकूण 20 डबे असणार असून त्यामध्ये 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC-2 Tier), 3 वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC-3 Tier), 10 सामान्य द्वितीय श्रेणी डबे, 4 शयनयान डबे तसेच 2 जनरेटर-सह सामानवाहू ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. या रेल्वेच्या नियमित धावण्यामुळे धार्मिक, पर्यटन, शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः राजकोट, अहमदाबाद, नंदुरबार, भुसावळ, पूर्णा, काचीगुडा आणि तिरुपती यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांना थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणालीद्वारे वेळापत्रक व आरक्षण स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!