महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

जलधरा मंडळात चक्रीवादळासदृश्य वादळाचा तडाखा; घरावरील पत्रे उडाली, वीजपुरवठा ठप्प

जलधरा मंडळात चक्रीवादळासदृश्य वादळाचा तडाखा; घरावरील पत्रे उडाली, वीजपुरवठा ठप्प

महाराष्ट्र
किनवट–नांदेड मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळा; नागरिकांची मोठी गैरसोय किनवट/नांदेड| किनवट तालुक्यातील जलधरा मंडळात रविवारी (दि. १३) दुपारी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान चक्रीवादळासदृश्य प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या वादळामुळे अनेक गावांतील घरांवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले, तर किनवट–नांदेड राज्य मार्गावर झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. जलधरा मंडळातील बेल्लोरी धानोरा, धानोरा तांडा, पिंपरी, भंडारवाडी, गोंदखेडा, कोपरा, सावरी, डोंगरगाव तांडा, डोंगरगाव, दिग्रस, दिग्रस तांडा, थारा आदी गावांमध्ये वादळाचा जोरदार फटका बसला. अनेकांच्या घरांवरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः बेल्लोरी धानोरा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अचानक आल...
हिमायतनगर तालुक्यात तुफान वादळी वाऱ्याचा कहर; डीपी कोसळली, आखाड्यांवरील टिनपत्रे उडाली

हिमायतनगर तालुक्यात तुफान वादळी वाऱ्याचा कहर; डीपी कोसळली, आखाड्यांवरील टिनपत्रे उडाली

महाराष्ट्र
शेतकरी व महावितरणचे मोठे नुकसान; निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यात रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने मोठे नुकसान घडवून आणले. बोरगडी–धानोरा परिसरात महावितरणची वीज डीपी पूर्णतः कोसळून पडली, तर अनेक शेतकऱ्यांच्या आखाड्यांवरील टिनपत्रे उडून गेली. याशिवाय शेकडो झाडे उन्मळून पडल्याने पर्यावरणालाही मोठा फटका बसला आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस उलटून गेले असतानाही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात केवळ ढग दाटून येत असले, तरी पावसाने मात्र हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामासाठी मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज असताना वरुणराजा मात्र दडी मारून बसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यातच रविवारी आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. ...
हिमायतनगर शिवारात लांडग्याचा धुमाकूळ; शेतकऱ्याचे वासरू फाडून ठार

हिमायतनगर शिवारात लांडग्याचा धुमाकूळ; शेतकऱ्याचे वासरू फाडून ठार

शेती
वनविभागाचा पंचनामा; नुकसानभरपाईसह गस्त वाढविण्याची शेतकऱ्यांची आक्रमक मागणी हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्यालगतच्या शेतशिवारात लांडग्याने पुन्हा धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याच्या एक वर्षीय वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिनांक  १३ च्या पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार, हिमायतनगर येथील शेतकरी नागेश्वर शंकरराव ढोणे यांच्या बोरगडी रस्त्यालगत असलेल्या आखाड्यावर शनिवारी पहाटे सुमारे चार वाजताच्या दरम्यान लांडग्याने हल्ला चढवला. गोठ्याजवळ बांधलेल्या एक वर्षीय वासरावर हल्ला करून त्यास ठार करण्यात आले. सकाळी शेतकरी आखाड्यावर आल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील वासरू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनपाल सुनील मे...
टोल वसुली सुरू; मात्र जीवघेण्या भेगांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

टोल वसुली सुरू; मात्र जीवघेण्या भेगांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

महाराष्ट्र
रस्ते दुरुस्त न झाल्यास टोल नाका बंद आंदोलनाचा इशारा – वामनराव पाटील वडगावकर हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड–किनवट मार्गावरील भोकर, हिमायतनगर, सेंटर पॉइंट, पोटा आणि सोनारी परिसरातील टोल नाक्यांवर वाहनधारकांकडून नियमितपणे टोल वसुली केली जात असताना, दुसरीकडे रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या भेगांकडे संबंधित प्रशासन व टोल कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी केला आहे. या मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून, त्या दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहेत. काही ठिकाणी या भेगा सुमारे सहा इंच रुंद असून शंभर ते दोनशे फूट लांबीपर्यंत सलग पसरलेल्या आहेत. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी पाच ते सहा भेगा पडल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी, तीनचाकी, कार तसेच अवजड...
मृग नक्षत्र सुरू, तरीही पावसाची प्रतीक्षा कायम; हिमायतनगर तालुक्यात शेतकरी चिंतेत

मृग नक्षत्र सुरू, तरीही पावसाची प्रतीक्षा कायम; हिमायतनगर तालुक्यात शेतकरी चिंतेत

माहिती, शेती
पेरणीसाठी शेतकरी सज्ज, मात्र वरुणराजाच्या आगमनाकडे लागल्या नजरा हिमायतनगर, अनिल मादसवार| मृग नक्षत्राची सुरुवात होऊन तब्बल सात दिवस उलटून गेले असतानाही हिमायतनगर शहरासह तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा दिवसेंदिवस मावळताना दिसत असून, वरुणराजाच्या कृपादृष्टीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची सर्व कामे पूर्ण केली असून, बियाणे व खतांची खरेदीही करून ठेवली आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी पूर्णपणे सज्ज झाले असले, तरी पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने पेरणी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाची दमदार सुरुवात होत असते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आकाशाकडे डोळे लावून बस...
नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; 1,155 प्रकरणे आढळली, ₹5.86 लाख महसूल वसूल

नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; 1,155 प्रकरणे आढळली, ₹5.86 लाख महसूल वसूल

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व नियमबद्ध प्रवासाचा अनुभव देण्यासह विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 9 जून 2026 रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. विभागातील विविध रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये व्यापक स्तरावर पार पडलेल्या या मोहिमेत एकूण 1,155 अनधिकृत प्रवासाची प्रकरणे आढळून आली असून रेल्वेला ₹5 लाख 86 हजार 455 इतका महसूल प्राप्त झाला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेचा मुख्य उद्देश महसूल गळती रोखणे, प्रवास नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि वैध तिकीटधारक प्रवाशांना अधिक सुरक्षित व आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. मोहिमेदरम्यान तिकीट तपासणी पथकांनी रेल्वे गाड्या, स्थानके तसेच महत्त्वाच्या प्रवासी क्षेत्रांमध्ये सखोल तपासणी केली. यामध्ये विनातिकीट प्रवास (TWT) कर...
कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात किसान सभेचे आंदोलन; शासन आदेशाची होळी करून निषेध

कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात किसान सभेचे आंदोलन; शासन आदेशाची होळी करून निषेध

महाराष्ट्र
किनवट/नांदेड| राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन आदेशामध्ये जाचक अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने किनवट येथील जिजामाता चौकात गुरुवारी (दि. ११ जून) शासन आदेशाची होळी करून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर जोरदार टीका केली. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने आता कर्जमाफीसाठी कठोर अटी लागू करून बहुसंख्य शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी थकबाकीदार असतानाही केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफी देण्याची तरतूद करण्यात आली आ...
चार टोल नाके बंद करण्याची मागणी; २० वर्षांच्या टोल वसुलीची चौकशी करा – महेंद्र गायकवाड

चार टोल नाके बंद करण्याची मागणी; २० वर्षांच्या टोल वसुलीची चौकशी करा – महेंद्र गायकवाड

महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील नायगाव (कहाळा), मुखेड, बिलोली (दगडापूर) आणि देगलूर तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या टोल नाक्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र) नांदेडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे चारही टोल नाके तात्काळ बंद करून गेल्या २० वर्षांतील टोल वसुली व कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महेंद्र गायकवाड यांनी आरोप केला आहे की, संबंधित टोल नाक्यांवर गेल्या दोन दशकांपासून वाहनचालकांकडून कोट्यवधी रुपयांची टोल वसुली करण्यात आली, मात्र रस्त्यांची स्थिती आजही समाधानकारक झालेली नाही. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे, निकृष्ट डांबरीकरण, रस्त्यांच्या कडेला...
रेल्वे सुरक्षेला तांत्रिक बळ; नांदेड विभागात दोन नवीन हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर कार्यान्वित

रेल्वे सुरक्षेला तांत्रिक बळ; नांदेड विभागात दोन नवीन हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर कार्यान्वित

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वे सुरक्षिततेला अधिक मजबुती देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत मिरखेल आणि उमराम येथे दोन नवीन हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर (HABD) कार्यान्वित केले आहेत. 27 मे 2026 पासून हे अत्याधुनिक डिटेक्टर कार्यरत झाले असून, त्यामुळे विभागातील HABD केंद्रांची संख्या तीनवरून पाचवर पोहोचली आहे. यापूर्वी नांदेड विभागातील मुगट, बसमत आणि दौलताबाद येथे हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर कार्यरत होते. आता मिरखेल आणि उमराम येथेही ही प्रणाली सुरू झाल्याने रेल्वे गाड्यांच्या सुरक्षिततेवर अधिक प्रभावी आणि रिअल-टाइम देखरेख शक्य होणार आहे. हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर (HABD) ही अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा धावत्या रेल्वेगाड्यांच्या कार्ट्रिज टेपर रोलर बेअरिंग (CTRB) आणि अॅक्सल बॉक्सचे तापमान स्वयंचलितपणे तपासते. गाडी सामान्य वेगाने धावत असताना तापमानात कोणतीही असामान्य वाढ आढळल्...
दक्षिण रेल्वेतील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे चेन्नई एक्स्प्रेसच्या मार्गात बदल; अनेक स्थानकांवरील थांबे रद्द

दक्षिण रेल्वेतील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे चेन्नई एक्स्प्रेसच्या मार्गात बदल; अनेक स्थानकांवरील थांबे रद्द

तेलंगणा, महाराष्ट्र
चेन्नई/नांदेड| दक्षिण रेल्वेच्या अरक्कोनम (AJJ) परिसरात तिसरी व चौथी मार्गिका जोडणी प्रकल्पांतर्गत नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम हाती घेण्यात येत असल्याने काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर 13 जून ते 28 जून 2026 या कालावधीत धावणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 16003 चेन्नई सेंट्रल–नगरसूल एक्स्प्रेस दिनांक 21 जून 2026 रोजी जोलारपेट्टई–कृष्णराजपूरम–धर्मावरम–गुंतकल या पर्यायी मार्गाने धावणार आहे. तसेच 28 जून 2026 रोजी हीच गाडी अरक्कोनम–काटपडी–जोलारपेट्टई–कृष्णराजपूरम–धर्मावरम मार्गे वळविण्यात येणार आहे. या मार्ग बदलामुळे तिरुत्तणी, पुत्तूर, रेणीगुंटा, राजमपेट, कडप्पा, येर्रगुंटला, ताडीपत्री आणि गुटी या स्थानकांवरील नियोजित थांबे रद्द करण्यात आले आहेत. त्...
error: Content is protected !!