महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

4 ते 6 जुलैदरम्यान मुंबई, कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

4 ते 6 जुलैदरम्यान मुंबई, कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

महाराष्ट्र
मुंबई | राज्यात 4 ते 6 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, मुंबई महानगर क्षेत्र (MMR), कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, घाटरस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका तसेच काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन ...
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद आवश्यक; विशेष पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करा – तहसीलदार पल्लवी टेमकर

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद आवश्यक; विशेष पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करा – तहसीलदार पल्लवी टेमकर

महाराष्ट्र
हिमायतनगर तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देत मतदारांशी साधला संवाद हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधत प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद होणे ही सक्षम लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. शुक्रवारी तालुक्यातील मौजे कारला येथील मतदान केंद्राला भेट देताना तहसीलदार टेमकर यांनी बीएलओ नारायण काळे यांच्याकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाची माहिती घेतली. यावेळी मुख्याध्यापिका आशाताई बोयले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना तहसीलदार पल्लवी टेमकर म्हणाल्या की, बीएलओ घरोघरी येऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. नागरिकांनी त्य...
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून काँग्रेस नेत्यांविरोधात सिडकोत ‘जोडेमार’ आंदोलन

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून काँग्रेस नेत्यांविरोधात सिडकोत ‘जोडेमार’ आंदोलन

महाराष्ट्र
मातंग समाजाचा तीव्र संताप; नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेचा निषेध नवीन नांदेड | अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध केल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला सिडको येथील डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मातंग समाज बांधवांनी गुरुवारी (२ जुलै) जोडेमार आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रातील मातंग समाजाची अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानंतर तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाली असून, महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर निर्णय व्हावा, अशी समाजाची अपेक्षा आहे. यासाठी राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने आपला अहवाल शासनाकडे स...
हिमायतनगर SBI चा मनमानी कारभार? ८७ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; संतापाची लाट

हिमायतनगर SBI चा मनमानी कारभार? ८७ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; संतापाची लाट

महाराष्ट्र
पंचायत समितीकडून धनादेश वेळेत दिल्याचा दावा; बँकेच्या हलगर्जीपणाचा आरोप, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, उपासमारीची वेळ.!  हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील तब्बल ८७ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) स्थानिक शाखेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पंचायत समितीकडून वेतनाचा धनादेश वेळेत जमा करूनही अनेक दिवस उलटून गेले, तरी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समितीने दिनांक २४ जून रोजी सुमारे ७ लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश बँकेत जमा केला. मात्र, अनेक दिवस उलटूनही वेतन खात्यात न आल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. याप्र...
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू; पहिल्याच दिवशी विकासकामांना गतीचे संकेत

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू; पहिल्याच दिवशी विकासकामांना गतीचे संकेत

महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची सूत्रे महेश पाटील यांनी गुरुवारी अधिकृतपणे स्वीकारली. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला गतिमान करण्याचे स्पष्ट संकेत दिले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी महेश पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांची शासनाने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शासनाच्या लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी...
लोकप्रतिनिधींच्या असहकारामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला -डॉ. कोम्पलवार

लोकप्रतिनिधींच्या असहकारामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला -डॉ. कोम्पलवार

महाराष्ट्र
नांदेड, गोविंद मुंडकर| मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या मराठवाडा जनता विकास परिषदेला असलेल्या असहकारामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला, असा संताप म.ज. वि.प.चे जिल्हाध्यक्ष व बाभळी बंधाऱ्याचे योद्धे डॉ.बालाजी कोम्पलवार यांनी आनंदधाम, सीताखंडी, तालुका भोकर येथे संपन्न झालेल्या जिल्हा बैठकीत व्यक्त केला. याप्रसंगी मराठवाड्याचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे, रेल्वे संघर्ष समितीचे शंतनू डोईफोडे, समाजसेवक डॉक्टर अशोक बेलखोडे, बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, उपप्राचार्य डॉक्टर खिल्लारे, सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर ,समाजसेवक भाऊराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विरोधी पक्षात असताना राजकीय मंडळी मराठवाडा जनता विकास परिषदेमध्ये सक्रिय असतात परंतु सत्तेत गेल्यावर मात्र म.ज.वि.प.च्...
कृषी दिनानिमित्त सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण; राज्यभरात १५ दिवसांत वाटप पूर्ण होणार

कृषी दिनानिमित्त सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण; राज्यभरात १५ दिवसांत वाटप पूर्ण होणार

महाराष्ट्र
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक वितरण; कृषी विभागात आनंदाचे वातावरण मुंबई | कृषी दिनानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, कृषिमंत्री दत्ता भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, फलोत्पादन मंत्री भारतशेठ गोगावले, प्रधान सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे आणि कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष वसंत...
नांदेड रेल्वे परिसरात ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प; वन महोत्सव २०२६ ला उत्साहात प्रारंभ

नांदेड रेल्वे परिसरात ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प; वन महोत्सव २०२६ ला उत्साहात प्रारंभ

महाराष्ट्र, तेलंगणा
'एक पेड माँ के नाम' उपक्रमातून हरित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल नांदेड, अनिल मादसवार| हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान, वन महोत्सव २०२६ आणि 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत नांदेड रेल्वे परिसरात तब्बल ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधत सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड आणि मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा उपक्रम विभागीय वन अधिकारी संदीप चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक नितेश निघडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कल्याण राजू, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. एम. के. श्रीनिवासा, तसेच रेल्...
नवतंत्रज्ञान व जोड व्यवसायातून शेतीची प्रगती साधा : संदीप माळोदे

नवतंत्रज्ञान व जोड व्यवसायातून शेतीची प्रगती साधा : संदीप माळोदे

शेती
जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात साजरा; पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव नांदेड| शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक उत्पादनक्षम करावी. तसेच पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या जोड व्यवसायांची सांगड घालून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पंचायत समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कै. वसंतराव नाईक जयंती आणि कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संदीप माळोदे बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूनम पवार, कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अर...
हिमायतनगर तालुका कृषी विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप; निकृष्ट बियाणे, मार्गदर्शनाचा अभाव आणि विविध योजनांतील गैरव्यवहाराचे गंभीर आरोप

हिमायतनगर तालुका कृषी विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप; निकृष्ट बियाणे, मार्गदर्शनाचा अभाव आणि विविध योजनांतील गैरव्यवहाराचे गंभीर आरोप

शेती
कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे आर्थिक संकटात सापडून एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्यास जबादार कोण?? हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या निष्क्रिय कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निकृष्ट बियाणे, वेळेवर न मिळणारे अहवाल, मार्गदर्शन शिबिरांचा अभाव आणि शासकीय योजनांतील कथित गैरव्यवहारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळं तालुका कृषी अधिकारी व कृषी दुकानदार यांनी मिलिभगत करून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारली गेली कि काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका कृषी अधिकारी व गुण नियंत्रण अधिकारी यांनी हिमाय...
error: Content is protected !!