धर्म अध्यात्म

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन

श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| वाढोणा ( हिमायतनगर, जि. नांदेड) येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही शोभायात्रा शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बाजार चौकातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातून प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन सर्व साधू-संत व माय-माऊलीच्या हस्ते करण्यात येणार आहे. या शोभायात्रेत भजन व विविध धार्मिक सादरीकरणे हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. विशेषतः प्रभु श्रीराम लल्ला, बाहुबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज तसेच गौमाता राष्ट्रमाता यांच्या झांक्यांमुळे मिरवणूक अधिक आकर्षक ठरणार आहे. तसेच भजन सम्राट विकास भैय्या परदेशी (श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळ, नांदेड) यांचे भजन सादरीकरण आणि रिध्दम लाईव्ह ...
हिमायतनगर शहरासह कारला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

हिमायतनगर शहरासह कारला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

धर्म अध्यात्म
हिमायतनगर (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हिमायतनगर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, विविध संस्था, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालये तसेच बौद्ध विहारांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष शेख रफिकभाई व नगरसेवकांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी नारवटकर, पांचाळ, स्वप्निल भद्रे, भौरे, भिसे आदींनी अभिवादन केले. तसेच तहसील कार्यालयासह शहरातील विविध शासकीय कार्यालयांतही जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील तक्षशिला बौद्ध विहारातही जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम...
हिमायतनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; शोभायात्रा, भीमगीतांतून अभिवादन

हिमायतनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; शोभायात्रा, भीमगीतांतून अभिवादन

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरासह तालुकाभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पंचशील ध्वजारोहण करून तथागत गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांची भव्य शोभायात्रा काढत अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध चौकांमध्ये मान्यवरांनी भीमसैनिकांना शुभेच्छा देत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. महिला-पुरुष, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिमायतनगर शहरात सकाळी ११ वाजता पंचशील ध्वजारोहणानंतर नालंदा बौद्ध विहारात सामुदायिक पंचशील व त्रिशरण ग्रहण करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गांवरून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तींची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेदरम्यान शालेय विद्यार्थी व युवकांनी...
आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा-ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर

आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा-ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर

धर्म अध्यात्म
कंधार( सचिन मोरे) मानवी जीवनामध्ये आई- वडील म्हणजेच ईश्वराचे दुसरे रूप होय. अनादी काळापासून अनेक महापुरुषांनी आपल्या आई-वडिलांची सेवा करत जिवंतपणी मोक्ष मिळवले. त्यांचाच आदर्श घेत या काळामध्ये देखील मानवांनी आईवडिलांची श्रद्धा पूर्वक सेवा करावी. त्यांची सेवा केली तर कुठल्याही देवांचे दर्शन घेण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय. असे परखड मत ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर यांनी बारुळ येथील येथे केले. कंधार पासून जवळच असलेल्या बारूळ येथे संत श्री नामदेव महाराज मठ संस्थान बारूळ व गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, कलशारोहण व भागवत कथा महा यज्ञाचा समारोप ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. याप्रसंगी पुढे बोलताना महाराज म्हणाले की,चांगले ते पहा. नालायकांचे प्रदर्शन हे अलीकडे फारच वाढले असून खरे संत चमत्कार दाखवत नसून साक्षात्कार दाख...
हिमायतनगरात अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिमायतनगरात अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धर्म अध्यात्म
स्वामी समर्थ केंद्रात धार्मिक वातावरण; १५ एप्रिल रोजी महाआरतीने होणार समारोप https://www.youtube.com/shorts/9MOGm3ssZhg हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात सुरू असलेल्या अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्यात विविध पूजाअर्चा, अखंड नामजप यज्ञ, पारायण आणि हवन विधी सुरू आहेत. या सप्ताहात गुरुचरित्र पारायण, वीणा पारायण, अखंड नामजप यज्ञ, देवी-देवतांची सेवा तसेच खंडोबाची सेवा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा आरती केली जात असून, यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भारत देशात शांतता नांदावी, देशाची सुरक्षा अबाधित राहावी तसेच युद्धजन्य परिस्थिती टळावी, या उद्देशाने हा धार्मिक उपक्रम राबवण्यात ये...
‘जय जगदंब’ कॉफीटेबल पुस्तकाचे तुळजापूरमध्ये भव्य प्रकाशन; अशोक चव्हाण यांचे गौरवोद्गार

‘जय जगदंब’ कॉफीटेबल पुस्तकाचे तुळजापूरमध्ये भव्य प्रकाशन; अशोक चव्हाण यांचे गौरवोद्गार

धर्म अध्यात्म
तुळजापूर | आई तुळजाभवानी देवीच्या महिम्याचे दर्शन घडवणारे ‘जय जगदंब’ हे आकर्षक कॉफीटेबल पुस्तक तुळजापूर येथे दिमाखात प्रकाशित करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पुस्तकाचे कौतुक करत ते भाविकांसह इतिहास संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले. लेखक श्रीकांत दीक्षित (Shrikrishna Dixit) यांनी या पुस्तकातून आदिमाता जगदंबेचा गौरवशाली इतिहास, परंपरा आणि वैभव सोप्या व प्रभावी भाषेत मांडले आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक देवीभक्ताने संग्रही ठेवण्यासारखे असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान राणा जगजीतसिंह पाटील यांनी भूषवले. यावेळी सतीश चव्हाण , अमिताताई चव्हाण , जितेश अंतापूरकर , श्रीजया चव्हाण , डी . पि . सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुस्तकात तुळजाभवानी देवीची सविस्तर आराधना, दुर्मिळ ...
दत्तशिखराचे अधिष्ठाता महंत मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन; माहूरगडावर भाविकांचा जनसागर

दत्तशिखराचे अधिष्ठाता महंत मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन; माहूरगडावर भाविकांचा जनसागर

धर्म अध्यात्म
माहूर (प्रतिनिधी) दत्तशिखराचे अधिष्ठाता आणि माहूरगड दत्त संस्थानाचे पूज्य महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी हजारो भाविकांनी उपस्थित राहून अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला. गेल्या चार दशकांपासून दत्तशिखराच्या गादीवर विराजमान असलेल्या महाराजांनी अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवला. साधी जीवनशैली, निस्वार्थ भाव आणि भक्तांप्रती असलेली आपुलकी यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले. महाराजांच्या निधनाची बातमी समजताच माहूरगड परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भक्तांनी अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. मंदिर परिसरात दिवसभर भजन, कीर्तन आणि धार्मिक विधींचा सुरेल माहोल निर्माण झाला होता. परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडत महाराज...
माहूरगडावर भाविकांचा जनसागर; आमदार बाबुराव कदम कोहळीकरांनी घेतले महंत मधुसूदन भारती महाराजांचे अंत्यदर्शन

माहूरगडावर भाविकांचा जनसागर; आमदार बाबुराव कदम कोहळीकरांनी घेतले महंत मधुसूदन भारती महाराजांचे अंत्यदर्शन

धर्म अध्यात्म
नांदेड/माहूर (प्रतिनिधी) दत्त शिखराच्या पवित्र गादीवर विराजमान असलेले महंत श्री मधुसूदन जी भारती (मालक) महाराज यांच्या निधनाने माहूरगडावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित राहून महाराजांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत “महाराजांचे जाणे अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. त्यांनी आयुष्यभर धर्मसंवर्धन, समाजसेवा आणि अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अखंड कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना जीवनाला दिशा मिळाली,” असे सांगितले. भक्तपरिवाराला मोठा धक्का - महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या निधनाने केवळ दत्त शिखर संस्थानचेच नव्हे तर संपूर्ण भक्तपरिवाराचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आमदारांनी व उपस्थित भक्तांनी ईश्वरचरणी प्...
परंपरेला नवा अर्थ; मधुकर महाराज बारुळकर यांना ‘परिवर्तनवादी’ श्रद्धांजली

परंपरेला नवा अर्थ; मधुकर महाराज बारुळकर यांना ‘परिवर्तनवादी’ श्रद्धांजली

धर्म अध्यात्म
नांदेड (प्रतिनिधी) समाजप्रबोधनाची अखंड ज्योत चेतवणारे, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आणि नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शि.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे नुकत्याच झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने समाज जागृतीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांच्या विचारांचा दीप आजही अनुयायांच्या मनामनात प्रज्वलित आहे. संत परंपरेचा वारसा जपत, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या भक्तीभावातून तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्य समाजपरिवर्तनासाठी अर्पण केले. ‘शिवधर्म’ पद्धतीने अंत्यसंस्कार १ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील बारूळ (मानार धरण परिसर) येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ‘शिवधर्म’ पद्धतीन...
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे; भव्य आयोजनाची ग्वाही

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे; भव्य आयोजनाची ग्वाही

धर्म अध्यात्म
नाशिक| पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला भव्य आणि अविस्मरणीय स्वरूप देण्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी तपोवन येथील श्री स्वामी नारायण मंदिरात ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्यासह विविध संत-महंत उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभ मेळा (Kumbh Mela) हा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा असून, भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. नाशिक (Nashik) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे होणाऱ्या या सोहळ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत ...
error: Content is protected !!