श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा; शहरात जल्लोषाचे वातावरण

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) वाढोणा शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखेच्या पुढाकारातून श्री राम नवमी व हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 18 रोजी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. डोळे दिपवून टाकणाऱ्या फटाक्यांची आकर्षक आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि रिद्धम लाईव्ह संगीताच्या जल्लोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
या शोभायात्रेत गोमाता, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज व संकटमोचन हनुमान यांच्या सुंदर मूर्तींच्या झांक्यांनी उपस्थितांचे मन जिंकले. या पद्धतीने शोभायात्रेत शहरासह विविध भागातून सहभागी झालेल्या युवकांनी नृत्य करत उत्साह व्यक्त केला, तर “जय श्रीराम” जय हनुमान च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
oplus_0
शोभायात्रेचा समारोप लकडोबा चौक येथे करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी एकत्र येत हनुमान चालीसा पठण केले आणि भक्तीभावाने कार्यक्रमाची सांगता झाली. या भव्य सोहळ्यामुळे शहरात धार्मिक उत्साहाचे आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!