क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व २७००० दंड

अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व २७००० दंड

क्राइम
बिलोली न्यायालयाचा निकाल बिलोली, गोविंद मुंडकर| नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या योगेश भिमराव कोंडेवाड वय. ३२ वर्षे यास बिलोली येथील जिल्हा न्यायाधिश-२ तथा अति. सत्र न्यायाधीश बिलोली वि. ब. बोहरा यांनी दि.२२ एप्रिल रोजी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे.वंजारवाडी ता.नायगाव येथे दि.९/११/२०२३ रोजी संध्याकाळी ७-३० वाजताच्या सुमारास सदर घटनेतील पिडीत अल्पवयीन व दिव्यांग मुलगी ही तीच्या घरी एकटी असताना आरोपी योगेश भिमराव कोंडेवाड वय ३२ हा पिडीत मुलीच्या घराच्या मागच्या दाराने जाऊन पिडीत मुलीच्या दिव्यांग पणाचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. सदर घटने बाबत पिडीत मुलीने स्वता: उपचार दरम्यान आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केल्यावरुन पोलिस स्टेशन कुंटूर येथे कलम ३७६...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक डिजिटल नामफलक प्रकरणी तक्रार; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक डिजिटल नामफलक प्रकरणी तक्रार; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईची मागणी

क्राइम
अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईची मागणी नांदेड /किनवट (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या डिजिटल नामफलकाच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी किनवट शहरातील मध्यवर्ती ठिकाणी “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक” या नावाचा आधुनिक डिजिटल नामफलक युवा उद्योजक आशिष शेळके यांनी स्वखर्चातून उभारला. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भिमजयंती निमित्त जयंती मंडळाचे अध्यक्ष आकाश आळणे व सचिव प्रतिकेश ओंकार यांनी चौकाला अधिकृत नामफलक नसल्याची बाब नगरपरिषद व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींसमोर मांडली होती. त्यानंतर आशिष शेळके यांनी पुढाकार घेत अव...
भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई : 10 घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा; 78.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई : 10 घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा; 78.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत 10 घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला असून सोन्या-चांदीसह एकूण 78 लाख 35 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात भा.न्या.संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेजने तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक शशांत एन.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष तांबे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बाजी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सोशल मीडियावर फरांदे नगर परिसरातील चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण (CDR, डम्प डेटा) यांच्या मदतीने आरोपींचा ...
धम्म निरंजन विपश्यना केंद्र व लोकमत प्रेस येथील चोरीचे दोन गुन्हे उघड; 58,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

धम्म निरंजन विपश्यना केंद्र व लोकमत प्रेस येथील चोरीचे दोन गुन्हे उघड; 58,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची कारवाई नांदेड (प्रतिनिधी) धम्म निरंजन विपश्यना केंद्र तसेच एमआयडीसी परिसरातील लोकमत प्रेस कार्यालय येथे झालेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा करत 58,600 रुपयांचा 100 टक्के मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात वजीराबाद पोलीस ठाणे गु.र.नं. 37/2026 (कलम 303(2) भा.न्या. संहिता-2023) तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे मुर.नं. 61/2026 (कलम 103(2) भा.न्या. संहिता-2023) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तपासाची सूत्रे हाताळली. दि. 20 एप्रिल 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, चोरी करणारा आरोपी नेकलेस रोड, केळी संशोध...
भाग्यनगर पोलिस ठाणे हद्दीत ट्रिपल मर्डर प्रकरणातील दोन फरार आरोपी जेरबंद

भाग्यनगर पोलिस ठाणे हद्दीत ट्रिपल मर्डर प्रकरणातील दोन फरार आरोपी जेरबंद

क्राइम
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची मोठी कारवाई नांदेड (प्रतिनिधी) भाग्यनगर पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या ट्रिपल मर्डर प्रकरणातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील गंभीर गुन्ह्याच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे. सदर प्रकरणात गु.र.नं. 172/2026 अंतर्गत भा.न्या.सं. कलम 103(1), 109, 118(1), 189, 191(2)(3), 190 तसेच भा.ह.का. कलम 04/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा रिपोर्ट मिलिंद सोनकांबळे यांनी दिला होता. दि. 04 एप्रिल 2026 रोजी रात्री 1.10 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास कॅनल रोडवरील ई-स्क्वेअर परिसरात प्रफुल ऊर्फ अजितसिंग गजानन चव्हाण यांची चाकू व तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील काही आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली हो...
नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननावर पहाटे धडक कारवाई; इंजिन-बोट स्फोट करून नष्ट

नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननावर पहाटे धडक कारवाई; इंजिन-बोट स्फोट करून नष्ट

क्राइम
नांदेड| अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने सोमवारी पहाटे मोठी कारवाई करत मौजे भनगी येथे नदीपात्रात धाड टाकली. या कारवाईत अवैधरित्या वाळू उपसा करणारे तीन इंजिन आणि एक बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट घडवून नष्ट करण्यात आली. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत सुमारे 13 लाख रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात पार पडली. नदीपात्राचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी तसेच शासनाच्या महसुलाला बसणारा फटका लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली. कारवाईत नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमाटे, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, सय्यद मोसीन तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज सारपे, मनोज जाधव, गजानन होळगे, ...
अर्धापूरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४ आरोपी ताब्यात, ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्धापूरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४ आरोपी ताब्यात, ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाईचा धडाका कायम ठेवत, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने अर्धापूर येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. दि. १८ एप्रिल रोजी अर्धापूर येथील उमर कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच अनेक जुगारी पळून गेले, मात्र ४ आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. आरोपीकडून ₹10,300 रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, १२ मोटारसायकली असा एकूण ₹6,60,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 207/2026 अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या धाडीत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. या कारव...
नांदेड परिक्षेत्रात मोठी मोहीम; गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांवर पोलिसांचा कडक प्रहार

नांदेड परिक्षेत्रात मोठी मोहीम; गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांवर पोलिसांचा कडक प्रहार

क्राइम
नांदेड परिक्षेत्रात धडक मोहीम; आठवड्यात ७३ गुन्हे, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त  नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत पहिल्याच आठवड्यात मोठे यश मिळाले आहे. दि. ११ ते १७ एप्रिल दरम्यान झालेल्या कारवाईत एकूण ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ₹५०.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. यामध्ये गुटखा प्रकरणे: १२ गुन्हे, अंमली पदार्थ प्रकरणे: १ गुन्हा, शस्त्र अधिनियमांतर्गत: ६० गुन्हे दाखल झाले असून, ₹30,60,611 किमतीचा गुटखा व अन्य साहित्य ₹1,12,550 किमतीचा गांजा ₹18,79,230 किमतीची शस्त्रे (३ गावठी पिस्टल, १० काडतुसे, तलवारी, खंजीर) अशी एकू...
नांदेड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी; ४६ लाखांचे ३०३ मोबाईल हस्तगत

नांदेड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी; ४६ लाखांचे ३०३ मोबाईल हस्तगत

क्राइम
नांदेड | नांदेड जिल्ह्यात हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सायबर पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. या मोहिमेत ३०३ अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत ₹४६,०३,००० इतकी आहे. मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सायबर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. जानेवारी २०२६ पासून सुरू असलेल्या या मोहिमेत विविध ठिकाणांहून हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्यात आले. हस्तगत करण्यात आलेले सर्व मोबाईल आज मिशन सहयोग व मिशन समाधान अंतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. तसेच, सापडलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांक "Nanded Police" या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सन २०२५ मध्ये: ८०० मोबाईल हस्तगत, अंदाजे...
नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; अवैध शस्त्रांसह एक जण ताब्यात

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; अवैध शस्त्रांसह एक जण ताब्यात

क्राइम
नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करत तलवार व खंजरासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 17 एप्रिल रोजी मध्यरात्री हिलालनगर परिसरात छापा टाकला. यावेळी संशयास्पदरीत्या उभा असलेल्या इसमाची तपासणी केली असता, त्याच्याकडे लोखंडी तलवार व खंजर आढळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव शेख इरफान शेख इब्राहीम (वय 29, रा. पाकीजानगर, नांदेड) असे असून तो मजुरी करत असल्याची माहिती आहे. आरोपीकडून लोखंडी तलवार, लोखंडी खंजर, एकूण अंदाजे ₹700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 4/25 अंतर्गत गुन्हा क्रमांक 410/2026 नोंदविण्यात आला आहे., पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलक...
error: Content is protected !!