
बिलोली न्यायालयाचा निकाल



बिलोली, गोविंद मुंडकर| नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या योगेश भिमराव कोंडेवाड वय. ३२ वर्षे यास बिलोली येथील जिल्हा न्यायाधिश-२ तथा अति. सत्र न्यायाधीश बिलोली वि. ब. बोहरा यांनी दि.२२ एप्रिल रोजी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.



याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे.वंजारवाडी ता.नायगाव येथे दि.९/११/२०२३ रोजी संध्याकाळी ७-३० वाजताच्या सुमारास सदर घटनेतील पिडीत अल्पवयीन व दिव्यांग मुलगी ही तीच्या घरी एकटी असताना आरोपी योगेश भिमराव कोंडेवाड वय ३२ हा पिडीत मुलीच्या घराच्या मागच्या दाराने जाऊन पिडीत मुलीच्या दिव्यांग पणाचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.


सदर घटने बाबत पिडीत मुलीने स्वता: उपचार दरम्यान आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केल्यावरुन पोलिस स्टेशन कुंटूर येथे कलम ३७६ (२) (ल), ४५२ भा.द.वि. व लैंगीक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ४ (२),६ आणि अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम चे कलम ९२ (ड) नुसार गुन्हा क्रमांक २१३/२०२३ या प्रमाणे दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर कुंटुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाहात्तरे यांनी तपास करून बिलोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.


सदर प्रकरणात सरकारतर्फे अभियोग पक्षाने एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राहय धरुन न्यायाधीश वि. ब. बोहरा यांनी आरोपी योगेश भिमराव कोंडेवाड वय: ३२ वर्षे रा. वंजारवाडी ता नायगाव यास दि. २२ एप्रिल २०२६ रोजी कलम ३७६ (२) (ल), ४५२ भा.द.वि. व लैंगीक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ४ (२),६ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यावरून आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व २७ हजार रुपये दंड. दंडाची रक्कम न भरल्यास तीन वर्षे सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड जयेश संदीप अग्रवाल, ॲड. योगेश सतीश पुंड, पैरवी कर्मचारी पी.आय. इजूलकंटे पो.हे.का.४११, सय्यद गौस क. लिपीक यांनी सहकार्य केले.
