नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; अवैध शस्त्रांसह एक जण ताब्यात

नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करत तलवार व खंजरासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 17 एप्रिल रोजी मध्यरात्री हिलालनगर परिसरात छापा टाकला. यावेळी संशयास्पदरीत्या उभा असलेल्या इसमाची तपासणी केली असता, त्याच्याकडे लोखंडी तलवार व खंजर आढळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव शेख इरफान शेख इब्राहीम (वय 29, रा. पाकीजानगर, नांदेड) असे असून तो मजुरी करत असल्याची माहिती आहे.

आरोपीकडून लोखंडी तलवार, लोखंडी खंजर, एकूण अंदाजे ₹700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 4/25 अंतर्गत गुन्हा क्रमांक 410/2026 नोंदविण्यात आला आहे.,

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!