क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेडमध्ये अवैध वाळूविरुद्ध मोठी कारवाई; 87.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये अवैध वाळूविरुद्ध मोठी कारवाई; 87.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलीस विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल 87 लाख 20 हजार रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पथकाला नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कल्हाळ शिवारात पाठविण्यात आले होते. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता छापा टाकण्यात आला असता, गोदावरी नदीपात्रातून इंजिन बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईदरम्यान तीन इंजिन बोटी, एक फायबर बोट, वाळूने भरलेले 34 तराफे, भारत बेंझ कंपनीचा एक हायवा, एक JCB मशीन आणि सुमारे 640 ब्रास वाळू असा एकूण 87.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण प...
गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर धडक कारवाई; 25.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर धडक कारवाई; 25.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड ग्रामीण पोलीसांनी गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर मोठी कारवाई करत सुमारे 25 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी पहाटे गंगाबेट परिसरात करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला असता, नदीपात्रात तराफे व इंजिनच्या साहाय्याने अवैध रेती उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच पाच अनोळखी आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या कारवाईत 20 तराफे (प्रत्येकी 50 हजार रुपये), 5 इंजिन (प्रत्येकी अंदाजे 3 लाख रुपये) आणि सुमारे 5 ब्रास रेती असा एकूण 25,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नदीपात्रातील तराफे व इंजिन वाहून नेणे शक्य नसल्याने पंचासमक्ष त्यांचा नाश करण्यात आला, तर किनाऱ्यावर साठवलेली रेती जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. या...
महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त धडक कारवाई

महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त धडक कारवाई

क्राइम
मोर चौक ते छत्रपती चौक मार्ग अतिक्रमणमुक्त नांदेड | नांदेड शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहिम हाती घेतली असून त्याअंतर्गत मंगळवार, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मोर चौक ते छत्रपती चौक या महत्त्वाच्या मार्गावर संयुक्त कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस विभागाच्या मदतीने रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळा केला. उत्तर नांदेड भागासाठी पर्यायी रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या कारवाईमुळे रस्त्यावरची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांनीही अतिक्रमण न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच शहरातील इतर भागांतही अशीच धडक मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे काही ठिकाणी तणाव...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या; गावठी पिस्टलसह 1.32 लाखांचा मुद्देमाल जप्त

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या; गावठी पिस्टलसह 1.32 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, खंजरसह 1 लाख 32 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत 27 एप्रिलच्या रात्रीपासून 28 एप्रिलच्या पहाटेपर्यंत शहरात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. याचदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, काही संशयित इसम कामठा बाजार ते गाडेगाव रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाखाली थांबले असून ते दरोड्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तत्काळ छापा टाकून योगेश ऊर्फ गोट्या सोनकांबळे, राहुल काळे, राम कांबळे, श्रावण जोंधळे आणि मनोज कदम या पाच जणांना ...
नांदेड शहरात मटका अड्ड्यावर धाड; 13 जणांवर कारवाई, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड शहरात मटका अड्ड्यावर धाड; 13 जणांवर कारवाई, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील वजिराबाद पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 13 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, 92 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध व्यवसायविरोधी पथकाला मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, 28 एप्रिल 2026 रोजी कलामंदिर बसस्थानकाजवळील एका शेडमध्ये छापा टाकण्यात आला. या छाप्यात मटका खेळताना 9 जणांना रंगेहात पकडण्यात आले. तपासणीदरम्यान आरोपींकडून 37,600 रुपये रोख रक्कम, 26,500 रुपयांचे 7 मोबाईल फोन तसेच 28,000 रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 92,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चौकशी केली असता, मटका व्यवसायाचे मुख्य सूत्रधार म्हणून कमल यादव (दिलीपसिंह कॉलनी), अन्वर शेख (समीराबाग, खडकपुरा), माधव भुसेवाड...
नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी लागू

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी लागू

क्राइम
नांदेड| जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 11 मे 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. ही माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये हा आदेश लागू करण्यात आला असून, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या परिसरात एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तथापि, ड्युटीवरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह सोहळे, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम तसेच सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतलेल्या मिरवणुका व मोर्चांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. सभांचे आयोजन, मिरवणुका काढणे किंवा ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ...
सासरवाडीतच जावयाची हत्या; कौटुंबिक वादातून टोकाचा शेवट

सासरवाडीतच जावयाची हत्या; कौटुंबिक वादातून टोकाचा शेवट

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या सासरच्यांनी जावयाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बळीरामपूर (ता. नांदेड) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सासू आणि दोन मेहुण्यांना ताब्यात घेतले आहे. मृतक विजय साहेबराव शिंदे (वय ३०, रा. तेलंगणा) याचा काही दिवसांपूर्वी बळीरामपूर येथील युवतीसोबत विवाह झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला, तरी विजय शिंदे याचे दारूचे व्यसन आणि पत्नीवर होणारी मारहाण यामुळे घरात सतत वाद होत होते. याच कारणावरून काही दिवसांपूर्वी सासरच्यांसोबत त्याचा वाद झाला होता. शनिवारी संध्याकाळी पुन्हा तो सासरवाडीत आला असता वाद चिघळला. यानंतर सासू आणि दोन मेहुण्यांनी संतापाच्या भरात त्याला गावाबाहेरील धनेगाव शिवारात नेले. तेथे आधी त्याला दारू पाजण्यात आली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याची ...
नांदेडमध्ये फरार NDPS प्रकरणातील गँगस्टर अटक; पंजाब पोलिसांसह संयुक्त कारवाईत यश

नांदेडमध्ये फरार NDPS प्रकरणातील गँगस्टर अटक; पंजाब पोलिसांसह संयुक्त कारवाईत यश

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) NDPS (अंमली पदार्थ) प्रकरणातील फरार गँगस्टर आरोपीला नांदेड पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई स्थानिक पोलीस आणि बाह्य राज्यातील यंत्रणांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, अरविंद घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक वटाणे तसेच पुणे डीबी पथक व खंडणी विरोधी पथकाने पंजाबमधील श्री मुक्तसर साहेब येथील CIA पथकासोबत संयुक्त कारवाई केली. या कारवाईत यादवइंदरसिंग उर्फ ‘याडू’ (रा. यांनाखेरा, ता. मलोत, जि. श्री मुक्तसर साहेब, पंजाब) या आरोपीस नांदेड शहरातील गुरुद्वारा देना बँक चौकाजवळील नगिना घाट रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. संबंधित आरोपी हा NDPS अंतर्गत गुन्हा क्रमांक 21/2019 (कलम 21, 25, 29) मध्ये फरार होता. त्याच्यावर एकूण 11 गुन्हे ...
अहमदपूरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 16 जणांवर कारवाई, सुमारे 5.87 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 16 जणांवर कारवाई, सुमारे 5.87 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
अहमदपूर/जि. लातूर | अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाने अहमदपूर येथे मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत 16 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे 5 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा येथील विसावा बारच्या दुसऱ्या मजल्यावर ‘तिरंट’ नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती.या माहितीच्या आधारे दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी छापा टाकण्यात आला. छाप्यात 16 इसम जुगार खेळताना रंगेहात आढळले. त्यांच्याकडून ₹1,44,750 रोख रक्कम, ₹1,03,000 किमतीचे 14 मोबाईल, ₹3,40,000 किमतीच्या 6 मोटारसायकली असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रम...
गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रविरोधी मोहिमेत 131 गुन्हे दाखल

गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रविरोधी मोहिमेत 131 गुन्हे दाखल

क्राइम
नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोठी कारवाई; 94 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड | सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठा प्रहार करत गुटखा, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल 131 गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे 94 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत ही धडक मोहीम राबवण्यात आली. नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांनी संयुक्तरीत्या या कारवायांमध्ये सहभाग घेतला. यात गुटखा प्रकरणे : 34 गुन्हे, अंमली पदार्थ प्रकरणे : 5 गुन्हे, शस्त्र कायदा प्रकरणे : 92 गुन्हे असे एकूण गुन्हे : 131 दाखल करण्यात आले असून, यात गुटखा व इतर साहित्य : ₹57,48,753, गांजा व वाहन : ₹15,87,450, घातक शस्त्रे (पिस्टल...
error: Content is protected !!