
मोर चौक ते छत्रपती चौक मार्ग अतिक्रमणमुक्त


नांदेड | नांदेड शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहिम हाती घेतली असून त्याअंतर्गत मंगळवार, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मोर चौक ते छत्रपती चौक या महत्त्वाच्या मार्गावर संयुक्त कारवाई करण्यात आली.


महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस विभागाच्या मदतीने रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळा केला. उत्तर नांदेड भागासाठी पर्यायी रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.



या कारवाईमुळे रस्त्यावरची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांनीही अतिक्रमण न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच शहरातील इतर भागांतही अशीच धडक मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलीस बंदोबस्तात संपूर्ण मोहीम शांततेत पार पडली. “रस्ता मोकळा… वाहतूक सुरळीत!” – या उद्देशाने महानगरपालिकेची कारवाई सुरूच राहणार आहे.


