दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या; गावठी पिस्टलसह 1.32 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, खंजरसह 1 लाख 32 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत 27 एप्रिलच्या रात्रीपासून 28 एप्रिलच्या पहाटेपर्यंत शहरात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. याचदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, काही संशयित इसम कामठा बाजार ते गाडेगाव रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाखाली थांबले असून ते दरोड्याच्या तयारीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तत्काळ छापा टाकून योगेश ऊर्फ गोट्या सोनकांबळे, राहुल काळे, राम कांबळे, श्रावण जोंधळे आणि मनोज कदम या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, लोखंडी खंजर, गजाळी, दोरी, मिरची पावडर पाकीट व मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला.

आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मुद्देमालासह विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 310(4) तसेच आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कडक कारवाई सुरूच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!