नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी लागू

नांदेड| जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 11 मे 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. ही माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये हा आदेश लागू करण्यात आला असून, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या परिसरात एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

तथापि, ड्युटीवरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह सोहळे, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम तसेच सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतलेल्या मिरवणुका व मोर्चांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

सभांचे आयोजन, मिरवणुका काढणे किंवा ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच नांदेड पोलीस विभाग यांनी अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. प्रशासनाने नागरिकांनी या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!