क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

ऑपरेशन क्रॅकडाऊन : अवैध जनावर वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; ११.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑपरेशन क्रॅकडाऊन : अवैध जनावर वाहतुकीवर पोलिसांचा मोठा प्रहार; ११.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
विमानतळ, इतवारा व मांडवी पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जनावरांची सुटका, सहा आरोपींवर गुन्हे नांदेड | ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत नांदेड पोलिसांनी अवैध जनावर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विमानतळ, इतवारा व मांडवी पोलीस ठाण्यांच्या पथकांनी स्वतंत्र कारवायांमध्ये ११ गोवंश व महेस जातीच्या जनावरांची सुटका केली असून, या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैध जनावर वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याच्या आदेशानुसार संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे २४ मे रोजी छापे टाकले. विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत आबना ओव्हरब्रिज रोड परिसरात कारवाई करत निजामाबाद (तेलंगणा) ये...
इस्लापूर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बोलेरो पिकअपसह प्रतिबंधित पानमसाला जप्त

इस्लापूर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बोलेरो पिकअपसह प्रतिबंधित पानमसाला जप्त

क्राइम
ऑपरेशन क्रॅकडाऊन : २७ लाखांचा गुटखा साठा जप्त; हिमायतनगरसह तिघांविरुद्ध गुन्हा किनवट/नांदेड| नांदेड जिल्हा पोलिसांच्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत इस्लापूर पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधीत जर्दा व तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनासह एकूण २७ लाख १ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हिमायतनगर येथील दोघांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने २४ मे रोजी इस्लापूर हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे कोसमेट शिवारात आर्या बारजवळ स...
नांदेडमध्ये अवैध शस्त्रांचा भलामोठा साठा जप्त

नांदेडमध्ये अवैध शस्त्रांचा भलामोठा साठा जप्त

क्राइम
ऑपरेशन क्रॅकडाऊनचा मोठा फटका! 703 घातक शस्त्रांसह 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत नांदेड | नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध शस्त्र तस्करीवर पोलिसांनी मोठा घाव घालत ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत धडाकेबाज कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून तब्बल 703 अवैध शस्त्रांचा साठा जप्त केला असून, 14 लाख 4 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्र विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई उभी केली. मिळालेल्या माहितीनुसार, देना बँक ते सचखंड गुरुद्वारा रोडवर...
ऑपरेशन क्रॅकडाऊनचा जबरदस्त दणका! नांदेड जिल्ह्यात मटका-जुगार अड्ड्यांवर एलसीबीची तुफान कारवाई

ऑपरेशन क्रॅकडाऊनचा जबरदस्त दणका! नांदेड जिल्ह्यात मटका-जुगार अड्ड्यांवर एलसीबीची तुफान कारवाई

क्राइम
१५ आरोपी जाळ्यात, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड, विशेष प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मटका-जुगार अड्ड्यांवर मोठा घाव घातला आहे. नांदेडच्या शिवाजीनगर भागात दोन आणि हिमायतनगर परिसरात एक अश्या तीन ठिकाणी एकाचवेळी धाड टाकत तब्बल १५ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, १ लाख ३० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असून, मटका-जुगार, अंमली पदार्थ, धारदार शस्त्रे आणि बेकायदेशीर व्यवहारांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधार...
नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा प्रहार

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा प्रहार

क्राइम
20 व्या दिवशी 56 गुन्हे दाखल, 73 लाखांचा मुद्देमाल जप्त, ब्राऊन शुगर हस्तगत  नांदेड | नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेला वेग आला असून, मोहिमेच्या 20 व्या दिवशी आणखी 56 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध कारवायांमध्ये एकूण 73 लाख 93 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नांदेड शहरात ब्राऊन शुगरही हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून 1 ते 31 मे 2026 या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात विशेष अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या 13 इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 43 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, अवैध दारू विक्री करणाऱ्या 38 इसमांविरुद्ध 36 गुन्हे दाखल करून 4 लाख 81 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्...
कुंटूर येथे पोलिसांची मोठी कारवाई; 2.47 लाखांचा गुटखा जप्त

कुंटूर येथे पोलिसांची मोठी कारवाई; 2.47 लाखांचा गुटखा जप्त

क्राइम
नांदेड| नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेअंतर्गत पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत 2 लाख 47 हजार 9 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषी आढळल्यास दहा वर्षांच्या कारावासासह दंडाची तरतूद आहे. नांदेड परिक्षेत्रात 1 ते 31 मे 2026 दरम्यान अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या 15 व्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. याशिवाय, मटका-जुगार खेळणाऱ्या व चालविणाऱ्या 10 इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 45 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, अवैध दारू विक्री करणाऱ्या 27 इसमांविरुद्ध 24 गुन्हे दाखल करून 90 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात ...
सगरोळी हादरले! रेतीच्या भरधाव ट्रकने घेतला निरपराधाचा बळी

सगरोळी हादरले! रेतीच्या भरधाव ट्रकने घेतला निरपराधाचा बळी

क्राइम
बिलोली, गोविंद मुंडकर| शनिवार दिनांक 16 सकाळी सुमारे १०:४५ वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील अनुसया नगर भागाच्या पायथ्याशी शनिवारी सकाळी भीषण अपघात घडून एका सुमारे ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या रेतीच्या ट्रकने विठ्ठल लवटे (रा. अनुसया नगर, सगरोळी) यांना जोरदार धडक देत चिरडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली असून, अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक अत्यंत वेगात होता आणि गावातील मुख्य रस्त्यावरून कोणतीही खबरदारी न बाळगता धावत होता. यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामु...
हिमायतनगरातील स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

हिमायतनगरातील स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

क्राइम
निष्काळजीपणाचा आरोप; परिसरात हळहळ व्यक्त नांदेड/हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील एका स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. सक्षम गायकवाड असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम नागराज गायकवाड हा किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कलमधील भिसी गावचा रहिवासी होता. तो आपल्या आईसोबत मामाच्या गावी लग्नसमारंभ साठी हिमायतनगर येथे आला होता. दरम्यान, स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा हट्ट केल्याने आई त्याला घेऊन गेली होती. मात्र पोहत असताना पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिमुकल्याच्या आईने रुग्णालयात धाय मोकलून आक्रोश केला. “पोटचा गोळा” गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ही घटना पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू आले. दरम्यान, ...
मेव्हण्याच्या लग्नासाठी आलेल्या जावयाने केली पत्नीची हत्या; नंतर स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या

मेव्हण्याच्या लग्नासाठी आलेल्या जावयाने केली पत्नीची हत्या; नंतर स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या

क्राइम
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांड्यातील हृदयद्रावक घटना हिमायतनगर | मेव्हण्याच्या लग्नासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाने पत्नीची चाकूने हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तिन्ही लहान मुले पोरकी झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पायल विनोद राठोड (वय ३५) व पती विनोद रंगराव राठोड (वय ४०, रा. धारजणी फुलवाडी तांडा, ता. भोकर) हे आपल्या तीन मुलांसह बोरगडी तांडा नं. १ येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आले होते. लग्नसमारंभात दोघेही आनंदात वावरत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, दिनांक 11 च्या मध्यरात्रीच्या सुमारास विनोद राठोड यांनी पत्नीला घराबाहेर बोलावून काही अंतरावर नेले आणि धारदार चाकूने तिच्यावर वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला...
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४३.४८ लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४३.४८ लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

क्राइम
नांदेड| ऑपरेशन “क्रॅक डाऊन” अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रसाठ्यावर धडक कारवाई करत तब्बल ४३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार दिनांक ६ मे रोजी रात्री ११.१५ वाजल्यापासून ७ मे रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत बळीरामपूर व गुरूरामदास नगर परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. कारवाईदरम्यान पोलिसांना बळीरामपूर येथे एक संशयित इसम कमरेला तलवार व खंजर बाळगून आढळला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अभिजीत गिरीधर सातपुते, रा. बळीरामपूर असे सांगितले. तसेच ही शस्त्रे गुरू रामदास नगर येथून विकत घेतल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी गुरू रामदास नगर येथे छापा टाकला असता एक संशयित इसम ...
error: Content is protected !!