ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार.! कंधार – मुखेड रोडवरील दुर्दैवी घटना

कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील कंधार – मुखेड रोडवर अंबुलगा येथील (दांडाचा महादेव) येथे रोडवरून जाणारा स्वराज ७४४ कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर हेड हा दि.२८ मे रोज गुरुवारी दुपारी ३:०० च्या सुमारास पलटी होऊन चालक बालाजी गोविंद कदम रा. हिप्परगा (शहा) ता.कंधार जि.नांदेड यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, दि २८ मे रोज गुरुवारी कंधार – मुखेड रोड वरून ट्रॅक्टर हेड हे कुठेतरी शेत मशागत कामासाठी जात असताना कंधार तालुक्यातील अंबुलगा – सावरगाव (नि.) येथे दुपारी ३:०० च्या सुमारास चालकाच्या हलगर्जीपणामुळे व वाढत्या वेगामुळे ट्रॅक्टरवरील ताबा सुटून सदरचा ट्रॅक्टर हेड हा पलटी होऊन, चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली.

घटनेचे वृत्त कळताच कंधार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन ट्रॅक्टर उचलून चालकाचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टम साठी कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून शेवविच्छेदन करून, सदरचे प्रेत हे चालकांचे भाऊ यशवंत गोविंद कदम वय ४१ वर्षे रा. हिप्परगा (शहा) ता.कंधार जि. नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले.

Oplus_16908288

स्वतःचा हलगर्जीपणा व वाढतावेग यामुळे ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटून सदरचा ट्रॅक्टर हेड पलटी होऊन चालक बालाजी गोविंद कदम रा. हिप्परगत(शहा) ता.कंधार हा स्वतःचे मरणास स्वतःच् कारणीभूत असल्याचे माहितीवरून कंधार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरनं. २०३/२०२६ कलम १०६(१), २८१,१२५ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास गीते हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!