क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड LCBची मोठी कारवाई; 2.25 किलो गांजासह आरोपी जेरबंद

नांदेड LCBची मोठी कारवाई; 2.25 किलो गांजासह आरोपी जेरबंद

क्राइम
नांदेड| स्थानिक गुन्हे शाखा (LCB) नांदेडने अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत सुमारे ₹1 लाख 12 हजार किमतीचा 2 किलो 251 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्या आरोपीचाही तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शंकरराव चव्हाण चौक परिसरात एक इसम गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. 17 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7.45 वाजता महशीचा बाजार परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडून प्लास्टिक पिशवीत ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला. आरोपी सय्यद सदरु सय्यद सलीम (वय 29, रा. सांगवी, नांदेड),  शेख शफी (रा. महेबूबनगर, नांदेड) त्यांच्याकडून 2 किलो 251 ग्रॅम गांजा अंदाजे किंमत ₹1,12,550...
इज्जतगावात अवैध रेती माफियांवर मोठी कारवाई; 1.70 कोटींचा मुद्देमाल जप्त

इज्जतगावात अवैध रेती माफियांवर मोठी कारवाई; 1.70 कोटींचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत इज्जतगाव (ता. नायगाव) येथील गोदावरी नदीपात्रातून तब्बल ₹1 कोटी 70 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली आणि कुंदूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने सुरू असलेला अवैध रेती उपसा उघडकीस आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 3 हायवा ट्रक (रेतीसह) 1 जेसीबी मशीन, 2 फायबर बोटी (मोठी व लहान), अंदाजे 8 ब्रास काळी रेती, असा एकूण सुमारे ₹1.70 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. हलविणे शक्य नसल्याने फायबर बोटी जागीच नष्ट करण्यात आल्या. या प्रकरणी 9 जणांसह इतर काही इसमांविरुद्ध BNS कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त वाहनांचे चालक,...
गुन्हेगारीवर लगाम घाला; कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश – पालकमंत्री अतुल सावे

गुन्हेगारीवर लगाम घाला; कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश – पालकमंत्री अतुल सावे

क्राइम
पालकमंत्री अतुल सावे यांनी कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने घेतला आढावा नांदेड| जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभागासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आज पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.   पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घ्यावी, तसेच शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अचानक धाडी टाकून गुन्हेगारीला आळा घालावा, कोम्बींग ऑपरेशन राबवून आरोपी शोधासाठी विश...
देगलूर नाका मृत्यूकांड हादरवणारे! चार चिमुकल्यांच्या बळीप्रकरणी दोन अभियंते निलंबित; कंत्राटदारावर गुन्हा

देगलूर नाका मृत्यूकांड हादरवणारे! चार चिमुकल्यांच्या बळीप्रकरणी दोन अभियंते निलंबित; कंत्राटदारावर गुन्हा

क्राइम
नांदेड| शहराला हादरवून टाकणाऱ्या देगलूर नाका परिसरातील चार शाळकरी मुलांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. कर्तव्यातील गंभीर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत दोन अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, संबंधित कंत्राटदार व इतर जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. १६ एप्रिल) इस्लामपुरा भागातील १० ते १३ वयोगटातील चार मुले एमजीआर गार्डन परिसरात खेळत असताना नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खोल खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडली. या भीषण घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी तातडीने चौकशी सुरू केली. प्राथमिक अहवालात निष्काळजीपणा स्पष्ट झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता शिवकन्या जायभाये आणि कनिष्ठ अभियंता किरण सूर्य...
आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू; इस्लापूर हादरले

आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू; इस्लापूर हादरले

क्राइम
किनवट/इस्लापूर (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील श्री फुलाजी बाबा आश्रम शाळा येथे शिकणाऱ्या सातवीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव सुरेश अंकुश वाळके (वय १४, रा. सावरी) असे असून तो संबंधित आश्रम शाळेत सातवी इयत्तेत शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या तापमानामुळे शाळा सकाळच्या सत्रात घेऊन दुपारी सुट्टी देण्यात आली होती. शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थी कैऱ्या खाण्यासाठी जवळील शेतात गेले. यावेळी काही मुलांनी शेतातील विहिरीत पोहण्यासाठी प्रवेश केला. सुरेशला पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सोबतच्या विद्यार्थ्यांनी त्याला वा...
यवतमाळ प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
कृषी विभाग व पोलीस प्रशासनाची संयुक्त धडक कारवाई यवतमाळ| जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री व वाहतुकीविरोधात कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी (प्लॅटिनम 5G) कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २० लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ‘किया सोनेट’ (GJ-09-5486) तसेच अन्य एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या सापळा रचून संबंधित वाहने अडवली. सदर वाहणाची झडती घेतली असता पथकाला मोठ्या प्रमाणात अवैध बियाणे सापडले. त्यामध्ये: ‘प्लॅटिनम 5G’ कापूस बियाण्यांची ४०० पाकिटे (८ पोते) बियाण्यांची किंमत: ₹३.६० लाख, २ चारचाकी वाहने व ३ मोबाईल फोन इतर साहित्यांसह एकूण...
नांदेडमध्ये गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका तरुणाच्या ताब्यातून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई इतवारा, नांदेड पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा क्रमांक 2026 अंतर्गत भा.ह.का. कलम 3/25, 7/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम ऊर्फ बबलुलाला आनंद लोखंडे (वय 22, रा. संघसेन नगर, इतवारा) हा अवैधरीत्या गावठी पिस्टल विक्रीसाठी बाळगत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पथकाने 15 एप्रिल 2026 रोजी संघसेन नगर परिसरात छापा टाकून संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत एक लोखंडी गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला, जो पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्य...
नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

क्राइम
११ जणांविरुद्ध गुन्हा, २.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान जुगार अड्ड्यावर छापा टाकत ११ जणांविरुद्ध कारवाई केली असून, एकूण २ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १४ एप्रिल रोजी पहाटे माळटेकडी रोड परिसरातील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 399/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. छाप्यादरम्यान काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले, तर काहींना ताब्यात घेण्यात आले. शेख अहमद शेख मिहीख, मोहम्मद नावीद मोहम्मद रफिक, सय्यद अथर, सय्यद अर्शद, फिरोज खान, अजहर खान व इतर (सर्व रा. नांदेड)   रोख रक्कम व जुगार साहित्य (पत्...
पैनगंगा काठावर केबल चोरट्यांचा हैदोस; २५–३० शेतकरी अंधारात, सुमारे ३ लाखांचे नुकसान

पैनगंगा काठावर केबल चोरट्यांचा हैदोस; २५–३० शेतकरी अंधारात, सुमारे ३ लाखांचे नुकसान

क्राइम
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील धानोरा ज. शिवारात पैनगंगा नदी परिसरात अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लक्ष्य करत मोठा डल्ला मारला आहे. दिनांक ११ एप्रिलच्या रात्री २५ ते ३० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या कनेक्शन केबलची चोरी करण्यात आली असून, या प्रकारात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील ही सलग चौथी घटना असून, अद्याप एकाही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. नदी व शेतीमधील अंतर मोठे असल्याने शेतकऱ्यांनी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करत मोटारींना ऑटोमॅटिक स्टार्टर बसवले आहेत. शेतकरी दररोज मोटारीकडे जात नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, श्रीक्षेत्र बोरगडी येथील माजी सरपंच देवन्ना शेन्नेवाड यांचे पुत्र ज्ञानेश्वर शेन्नेवाड यांना रात्री सुमारे ११.१५ वाजता शेतात पाणी आले नसल्याने संशय आला. ते मोटारीकडे गेले...
कुंडलवाडी पोलीसांची धडक कारवाई : अवैध जुगार अड्ड्यावर छापा

कुंडलवाडी पोलीसांची धडक कारवाई : अवैध जुगार अड्ड्यावर छापा

क्राइम
12 जणांवर गुन्हा; 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त कुंडलवाडी| कुंडलवाडी पोलीसांनी अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकत 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 12 एप्रिल रोजी सायंकाळी पिंपळगाव (कु) शिवारातील दगडे यांच्या शेताजवळ करण्यात आली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे काही इसम ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे समोर आले. त्यानुसार कुंडलवाडी पोलीसांच्या पथकाने तात्काळ छापा टाकला. या कारवाईत काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 24,400 रुपये रोख रक्कम, 52 पत्ते, 4 मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गु.र.नं. 43/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईचा तपास पोना/22...
error: Content is protected !!