कुंडलवाडी पोलीसांची धडक कारवाई : अवैध जुगार अड्ड्यावर छापा

12 जणांवर गुन्हा; 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त

कुंडलवाडी| कुंडलवाडी पोलीसांनी अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकत 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 12 एप्रिल रोजी सायंकाळी पिंपळगाव (कु) शिवारातील दगडे यांच्या शेताजवळ करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे काही इसम ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे समोर आले. त्यानुसार कुंडलवाडी पोलीसांच्या पथकाने तात्काळ छापा टाकला. या कारवाईत काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 24,400 रुपये रोख रक्कम, 52 पत्ते, 4 मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गु.र.नं. 43/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईचा तपास पोना/2218 अर्जुन खनपट्टे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. दरम्यान, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!