
११ जणांविरुद्ध गुन्हा, २.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान जुगार अड्ड्यावर छापा टाकत ११ जणांविरुद्ध कारवाई केली असून, एकूण २ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


ही कारवाई १४ एप्रिल रोजी पहाटे माळटेकडी रोड परिसरातील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 399/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. छाप्यादरम्यान काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले, तर काहींना ताब्यात घेण्यात आले. शेख अहमद शेख मिहीख, मोहम्मद नावीद मोहम्मद रफिक, सय्यद अथर, सय्यद अर्शद, फिरोज खान, अजहर खान व इतर (सर्व रा. नांदेड)
रोख रक्कम व जुगार साहित्य (पत्ते), सॅमसंग कंपनीचे मोबाईल, बजाज पल्सर दुचाकी, एकूण किंमत : ₹2,78,800 असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनचा भाग असून, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.


