शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

खत काळाबाजार उघड करणाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या?; हिमायतनगरात संताप

खत काळाबाजार उघड करणाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या?; हिमायतनगरात संताप

शेती
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार; “धमक्यांना भीक घालणार नाही” वामनराव पाटील वडगांवकर  हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील खत टंचाई, काळाबाजार आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच हिमायतनगरातील काही कृषी दुकानदार व दलालांकडून धमकीचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप समोर करण्यात आला आहे. खताचे पार्सल बाहेर जात असल्याचे फोटो काढल्याच्या कारणावरून काही दलालांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा करण्यात आला असून, अशी पोस्ट सोशल मीडियावर वामनराव पाटील वडगांवकर यांनी व्हायरल केली आहे. याप्रकरणी शेतकरी हितासाठी आवाज उठवणाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू केलेला लढा कोणत्याही धमकीला घाबरणारा नाही,” असा इशारा दिला आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून किंवा काळाबाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांनी “आपल्या औकातीत राहा...
मान्सूनपूर्व तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा; सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा; सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

शेती
छत्रपती संभाजीनगर| आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन, पूरनियंत्रण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश G. Srikant यांनी दिले. विभागीय आयुक्तालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील जिल्हानिहाय मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. शहरी आणि ग्रामीण भागातील नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता वाढविणे, पूरस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतरासाठी सुरक्षित ठिक...
प्रत्येक शेतकऱ्याला दोनच पोती खत? हिमायतनगर कृषी कार्यालयाच्या भूमिकेविरोधात संताप

प्रत्येक शेतकऱ्याला दोनच पोती खत? हिमायतनगर कृषी कार्यालयाच्या भूमिकेविरोधात संताप

शेती
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यात खत वितरणावरून शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “प्रत्येक शेतकऱ्याला फक्त दोनच पोती खत द्यावे” असा आदेश खत विक्रेत्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १ एकर शेती असो किंवा १० ते २० एकर शेती असलेला शेतकरी असो, सर्वांना समान प्रमाणात केवळ दोनच पोती खत देणे अन्यायकारक आहे. “जमीन जास्त, पीक जास्त आणि गरज जास्त असताना खत मात्र समान कसे?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार खत वाटप करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकरी संघटनांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी Farmer ID आणि नियंत्रण प्रणाली लागू करण्याबाबत हालचाली...
QR स्कॅनद्वारे खत उपलब्धतेची माहिती; शेतकऱ्यांना घरबसल्या सुविधा

QR स्कॅनद्वारे खत उपलब्धतेची माहिती; शेतकऱ्यांना घरबसल्या सुविधा

शेती
योग्य दरात खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाहन हिमायतनगर, अनिल मादसवार | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खत उपलब्धतेबाबत अडचणी येऊ नयेत यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना आपल्या नांदेड जिल्ह्यात, तालुक्यात तसेच हिमायतनगर शहरातील कोणत्या दुकानदाराकडे किती खत उपलब्ध आहे याची माहिती QR स्कॅनद्वारे घरबसल्या मिळणार आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना खतासाठी विविध दुकानांवर वारंवार फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित दुकानात कोणत्या प्रकारचे खत उपलब्ध आहे, किती स्टॉक शिल्लक आहे तसेच दुकानदाराची माहितीही पाहता येणार आहे. शेतकरी बांधवांनी सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे देऊ नयेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषतः ...
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती समृद्ध करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती समृद्ध करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

शेती
लालवंडी येथे ‘सबसॉइलर’ व पीक अवशेष व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; खरीपपूर्व मोहिमेचा आढावा नांदेड | बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शाश्वत, उत्पादनक्षम आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी Rahul Kardile यांनी केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाची जोड देत शेती समृद्ध करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील मौजे लालवंडी येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प (BCRC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. बी. गित्ते,...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी ८८४.७२ कोटींची नुकसानभरपाई मंजूर ; ४९९.६० कोटी वितरित

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी ८८४.७२ कोटींची नुकसानभरपाई मंजूर ; ४९९.६० कोटी वितरित

शेती
नांदेड| प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ८८४.७२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ९३ महसूल मंडळे पात्र ठरली असून ६ लाख ३४ हजार ६२३ शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ४ लाख ४४ हजार ८७९.३७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. दि. ७ मे २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार सोयाबीन पिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या ८८४.७२ कोटी रुपयांपैकी ४९९.६० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले असून ३८५.११ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत. विमा कंपनीच्या अद्ययावत माहितीनुसार सोयाबीन, मुग, उडीद, तूर आणि खरीप ज्वारी या पिकांसाठी मंजूर नुकसानभरपाईची एकूण रक्कम ८८८.६७ कोटी रुपये आहे. त्यापैकी ५०२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून...
नांदेडमध्ये जलसंधारण कामांना वेग

नांदेडमध्ये जलसंधारण कामांना वेग

शेती
379 पैकी 177 कामे पूर्ण; भूजल वाढीसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा नांदेड | एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मृद व जलसंधारण विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या एकूण ३७९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी १७७ कामे पूर्ण झाली असून २०२ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत १ लाख ७८ हजार ६६८ मीटर खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून आणखी ८६ हजार ५८३ मीटर खोलीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचून होणारे नुकसान कमी होणार असून भूजल पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. परिणामी पाणीटंचाई निवा...
हिमायतनगरात खतांचा काळाबाजार? होत असल्याचा आरोप 

हिमायतनगरात खतांचा काळाबाजार? होत असल्याचा आरोप 

शेती, सामाजिक
कृत्रिम टंचाई, लिंकिंग आणि चढ्या दराने विक्रीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन नांदेड/हिमायतनगर, प्रतिनिधी| खरीप हंगाम २०२६ तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन देत संबंधित खत विक्रेते व कृषी सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा कृषी अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार हिमायतनगर, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात अनेक खत विक्रेते शासन नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, कृषी विभागाकडून खतसाठा मुबलक असल्याचे सांगितले जात असताना हिमा...
मांजरम येथील खंडगाव पांदण अतिक्रमणमुक्त होणार – तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांचे आश्वासन

मांजरम येथील खंडगाव पांदण अतिक्रमणमुक्त होणार – तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांचे आश्वासन

शेती
नायगाव| मांजरम येथील निजामकालीन खंडगाव पांदण रस्ता अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी स्थळ पाहणीदरम्यान दिले. राज्य शासनाच्या बळीराजा पांदण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते उपलब्ध करून देण्याचे काम राज्यभर सुरू असून, मांजरम येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खंडगाव पांदण रस्ताही याच योजनेतून विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले की, संबंधित पांदणाची लवकरच सरकारी मोजणी करण्यात येणार असून अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांना शेतीसाठी मोकळा रस्ता उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी मंडल अधिकारी राठोड मॅडम, तलाठी अनुपवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकरी नेत्यांचा इशारा यावेळी शेतकरी नेते पांडुरंग देवराव शिंदे यांनी सांगितल...
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा हिमायतनगर तालुक्याला तडाखा; पारवा खुर्द येथे घराचे छत उडाले

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा हिमायतनगर तालुक्याला तडाखा; पारवा खुर्द येथे घराचे छत उडाले

शेती
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी वातावरणामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले असून, हळद, आंबा यासह फळबागां उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील पारवा खुर्द येथे दिनांक 8में रोजी दुपारी झालेल्या अवकाळी पावसा दरम्यान शिवाजी काशिनाथ सूर्यवंशी यांच्या घराचे संपूर्ण छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे घरातील साहित्याचेही नुकसान झाले असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागा, वैरण तसेच हळद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक धोक्यात आले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकस...
error: Content is protected !!