शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून सुरुवात

लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून सुरुवात

शेती
फेरी-९ अंतर्गत राज्यभर लसीकरण; १ कोटी लसमात्रांचे वितरण सुरू नांदेड| राज्यातील पशुधनाचे लाळखुरकूत (एफएमडी) या घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयव्हीबीपी संस्थेकडून प्राप्त झालेल्या १ कोटी लसमात्रांचे शीत साखळीच्या माध्यमातून सुरक्षितपणे वितरण सुरू करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेच्या कोल्ड रूममध्ये लस साठवून ठेवण्यात आली असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत लस वेळेत पोहोचविण्याची कार्यवाही सुरू आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक लससाठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार उपलब्ध १ कोटी लस...
श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात

श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात

शेती
पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; सुकत चाललेल्या खरीप पिकांना मिळाले जीवदान हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आणि ठिकठिकाणी देवदेवतांना पावसासाठी घातलेल्या साकड्यानंतर शनिवारच्या रात्रीपासून तालुक्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली. श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात झाल्याची भावना शेतकरी व नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील खरीप पिके सुकू लागली होती. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू केली होती, तर बहुतांश शेतकरी आभाळाकडे डोळे लाव...
कर्तव्यतत्पर पशुवैद्यकीय सेवेला सलाम!

कर्तव्यतत्पर पशुवैद्यकीय सेवेला सलाम!

शेती
गोवंश तस्करीप्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्पर सेवा; घटनास्थळी उपचार व नमुने संकलित नांदेड, अनिल मादसवार| मौजे बोंढार तर्फे हवेली, ता. नांदेड परिसरात गोवंश तस्करी व कत्तलीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून संपर्क साधण्यात आल्यानंतर जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, नांदेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव तरपेवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दि. १८ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत भूल देण्यात आलेल्या गोवंशावर डॉ. तरपेवाड यांनी तत्परतेने आवश्यक पशुवैद्यकीय उपचार केले. तसेच कत्तल करण्यात आलेल्या एका गोवंशाचे आवश्यक नमुने शास्त्रीय पद्धतीने संकलित करून पुढील तपासासाठी पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत संवेदनशीलता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत पशुवैद्यकीय विभागाने केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. डॉ. राजीव तरपेवाड व त्य...
मुखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या

मुखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या

शेती
शेतकरी पुत्रांचे तहसीलदारांना निवेदन; भारनियमन कमी करण्याचीही मागणी मुखेड/नांदेड, प्रतिनिधी| मुखेड तालुक्यात पावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके करपली असून, अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेती काळी पडली आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी पुत्रांनी तहसीलदार शंकर लाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली असून, काही भागात बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर शेतकऱ्...
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : आधुनिक शेतीसाठी अनुदानाची सुवर्णसंधी; महाडीबीटीवर अर्ज सुरू

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : आधुनिक शेतीसाठी अनुदानाची सुवर्णसंधी; महाडीबीटीवर अर्ज सुरू

शेती
नांदेड| एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी नांदेड जिल्ह्यास रु. २६८.३६ लाखांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. फळबाग लागवड, रोपवाटिका, हरीतगृह, शेडनेट, शेततळे, कांदाचाळ, अळिंबी उत्पादन, मधुमक्षिकापालन, कृषी यांत्रिकीकरण, शीतगृह, पॅक हाऊस आदी विविध घटकांसाठी आकर्षक अनुदान उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार राधाकृष्ण कळसाईत यांनी केले आहे. या अभियानाचा उद्देश आधुनिक, शाश्वत आणि कमी खर्चातील शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रातील लहान व मोठ्या रोपवाटिका, विविध फळपिकांची लागवड, अळिंबी व बीज उत्पादन केंद्र, कंपोस्ट युनिट, सुगंधी व औषधी वनस्पती, फुलशेती, मसाला पिके, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक व वैयक्तिक शेततळे, हरीतगृह, शेडनेट, प्लास्टिक मल्च...
खरीप पीक विम्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत

खरीप पीक विम्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत

शेती
नांदेड| खरीप हंगाम 2026 साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत असून, या मुदतीत कोणतीही वाढ होणार नसल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा काढावा. योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे....
फक्त 10 टक्के खर्चात बसवा सूक्ष्म सिंचन संच; विशेष मोहीम सुरू

फक्त 10 टक्के खर्चात बसवा सूक्ष्म सिंचन संच; विशेष मोहीम सुरू

शेती
नांदेड| अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना – “प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)” अंतर्गत विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 1 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राबवली जात असून पात्र शेतकऱ्यांना 90 टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेत ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान उपलब्ध असून पात्र शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च करावा लागणार आहे. अर्जासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, शासकीय ओळखपत्र, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अर्ज स्वीकारताना “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार प्रक्रिया केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र, सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृष...
पावसासाठी वाघी गावातील महिलांचे साकडे; पैनगंगा नदीचे पाणी आणून मारुतीराय व गणरायाचा जलाभिषेक

पावसासाठी वाघी गावातील महिलांचे साकडे; पैनगंगा नदीचे पाणी आणून मारुतीराय व गणरायाचा जलाभिषेक

शेती
दहा-बारा दिवसांपासून पाऊस गायब; सुकणाऱ्या पिकांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावातील महिलांनी पावसासाठी अनोखी प्रार्थना सुरु केली आहे. महिलांनी पैंनगंगा नदीतून पायी चालत जाऊन पाणी आणून गावातील मारुतीराय आणि श्री गणपती बाप्पाचा जलाभिषेक करत वरुणराजाने कृपा करावी आणि यंदाचा खरीप हंगाम सुगीचा व्हावा, असे साकडे घातले आहे. यंदा हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर मोठा भर दिला असून, त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे पेरण्या पूर्ण झाल्या; मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सलग दहा-बारा दिवस पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके सुकू लागली असून, ...
पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी

पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी

शेती
नांदेड | खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, वादळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून, पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले आहे. या योजनेत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. मात्र, AGRISTACK Farmer ID आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) अंतर्गत पिकांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकराराची माहिती पीक विमा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील. योजन...
पावसाने फिरवली पाठ; हिमायतनगरात खरीप धोक्यात, कृषी विभागाच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांचा संताप

पावसाने फिरवली पाठ; हिमायतनगरात खरीप धोक्यात, कृषी विभागाच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांचा संताप

शेती
उगवलेली पिके करपू लागली; बोगस बियाण्यांच्या संशयाने शेतकरी हवालदिल हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, उगवलेली पिके करपू लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आणि हळद पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सूनच्या सुरुवातीला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र दोन-तीन दिवसांच्या हलक्या सरींनंतर पावसाने पाठ फिरवली. परिणामी जमिनीतील ओलावा संपत चालला असून, अनेक शेतांमध्ये उगवलेली रोपे करपू लागली आहेत. हलक्या जमिनीवरील पिकांची अवस्था सर्वाधिक गंभीर आहे. ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण असून, अनेक ठिकाणी शेतकरी पावसासा...
error: Content is protected !!