खरीप पीक विम्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत

नांदेड| खरीप हंगाम 2026 साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत असून, या मुदतीत कोणतीही वाढ होणार नसल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा काढावा. योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!