
नांदेड| अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना – “प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)” अंतर्गत विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 1 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राबवली जात असून पात्र शेतकऱ्यांना 90 टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे.



या योजनेत ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान उपलब्ध असून पात्र शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च करावा लागणार आहे. अर्जासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, शासकीय ओळखपत्र, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.



इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अर्ज स्वीकारताना “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार प्रक्रिया केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र, सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.


