Tag: नांदेड

नांदेड मनपा प्रकरणाची मंत्रालयात 11 मे रोजी सुनावणी

नांदेड मनपा प्रकरणाची मंत्रालयात 11 मे रोजी सुनावणी

महाराष्ट्र
नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या (मनपा) एका महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी आता मंत्रालयात होणार आहे. शिवाजीनगर (झोन क्र. 3) येथील कोनाळे कोचिंग क्लासेसच्या अवैध बांधकामाबाबत आणि सहाय्यक आयुक्त रमेश चवरे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. या संदर्भात नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी मनपाकडून चौकशी अहवाल मागवला होता. मात्र मनपाने या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. त्यामुळे अवर सचिव जयंत वाणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रांसह 11 मे 2026 रोजी मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. कोनाळे कोचिंग क्लासेसच्या अवैध बांधकामाबाबत 2023 मध्येच नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये पुन्हा नोटीस देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. 2024 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत कारव...
नांदेड विभागातील रेल्वे प्रश्नांवर 12 जूनला निर्णायक बैठक; प्रवाशांच्या अपेक्षा शिगेला

नांदेड विभागातील रेल्वे प्रश्नांवर 12 जूनला निर्णायक बैठक; प्रवाशांच्या अपेक्षा शिगेला

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| दक्षिण मध्य रेल्वेची महत्त्वपूर्ण बैठक दि. 12 जून 2026 रोजी नांदेड येथे होणार असून, या बैठकीत मराठवाडा व सीमावर्ती भागातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर तोडगा निघावा, अशी जनतेची तीव्र अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रवासी, सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांनी विविध मागण्यांचा पाढा मांडत रेल्वे प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी सोशल मीडियातून केली जात आहे. यामध्ये प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून, आदिलाबाद येथे पिट लाईन सुरू करून नांदेड स्टेशनवरील ताण कमी करणे, नागपूर–छत्रपती संभाजीनगर नवी रेल्वे सेवा किनवट–आदिलाबाद मार्गे सुरू करणे, नंदीग्राम एक्सप्रेसचा विस्तार गोंदिया पर्यंत करणे, तसेच कोल्हापूर–धनबाद एक्सप्रेसला हिमायतनगर येथे थांबा द्यावा. नांदेड–आदिलाबाद इंटरसिटीला हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथे थांबा देण्यात देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच काजीपेट–लोकमान्य...
नांदेडमध्ये मटका अड्ड्यावर धाड; ८ जणांवर कारवाई, ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये मटका अड्ड्यावर धाड; ८ जणांवर कारवाई, ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड शहरातील अवैध मटका व्यवसायावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने मोठी कारवाई करत नवीन मोंढा परिसरातील मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून ३१ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार ३० एप्रिल रोजी नवीन मोंढा भागातील जय गुरुदेव पान शॉपजवळ लिंबाच्या झाडाखाली छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये चार जण मटका खेळताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता १५,७७० रुपये रोख रक्कम व १५,५०० रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण ३१,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान मटका अड्ड्याचे मालक अब्बास (रा. नई आबादी, शिवाजीनगर), शेख जमीर (रा. इतवारा) तसेच बुकी म्हणून संजय गाय...
नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा : अतुल सावे

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा : अतुल सावे

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड विमानतळ अधिक सुसज्ज व आधुनिक करण्यासाठी धावपट्टी विस्तारासह आवश्यक सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, विमानतळ संचालक अमरदीप सिंग सेहरा, संचालक व्यवस्थापक निलेश सोनटक्के आदी उपस्थित होते. सध्या नांदेड येथून सात ठिकाणी विमानसेवा सुरू असून लवकरच ती दहा ठिकाणी वाढविण्याचे नियोजन आहे. वाढत्या विमान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी दोन ते तीन विमाने उतरल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पर्यायी धावपट्टीसाठी आवश्यक जा...
नांदेडला राज्यात सर्वाधिक पीकविमा; पहिल्या टप्प्यात ८१३.९३ कोटी मंजूर

नांदेडला राज्यात सर्वाधिक पीकविमा; पहिल्या टप्प्यात ८१३.९३ कोटी मंजूर

शेती
नांदेड | प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावत पहिल्या टप्प्यात तब्बल ८१३.९३ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करून घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय, सूक्ष्मनियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, एकूण मंजुरी ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४ लाख ३४ हजार ८१९ शेतकरी या योजनेत विमाधारक असून, एकूण ८ लाख २९ हजार ७३७ विमा अर्ज दाखल झाले होते. सुमारे ५ लाख १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले असून, ७ लाख २७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असल्याची नोंद आहे. यासाठी ३३१२ पीक कापणी प्रयोग करण्यात आले आहेत. सध्या २१ महसूल मंडळांची रक्कम प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली पीक कापणी प्रयोगांची वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्य...
नांदेडमध्ये तीव्र चलन टंचाई; खा. अशोक चव्हाण यांचे रिझर्व्ह बँकेला तातडीचे पत्र

नांदेडमध्ये तीव्र चलन टंचाई; खा. अशोक चव्हाण यांचे रिझर्व्ह बँकेला तातडीचे पत्र

राजकारण
नांदेड | नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र चलन टंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या प्रादेशिक संचालकांना तातडीचे पत्र पाठवून पुरेशा चलन पुरवठ्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात सध्या लग्नसराईचा हंगाम आणि शेतकऱ्यांची पेरणीपूर्व तयारी सुरू असताना रोख रकमेची मोठी टंचाई जाणवत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत खासदार चव्हाण यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, नांदेड जिल्ह्यासाठी मुख्य ‘करन्सी चेस्ट’ म्हणून काम करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शिवाजीनगर शाखेतील स्थिती चिंताजनक आहे. 450 कोटी रुपयांची क्षमता असलेल्या या चेस्टमध्ये सध्या अत्यल्प रक्कम शिल्लक असून, उपलब्ध निधी जेमतेम दोन दिवस पुरेल अशी स्थिती आहे. चलनाच्या कमतरतेचा सर्वाधिक फटका लग्नकार्य करणाऱ्या कुटुंबांना तसेच बियाणे व खते खरेदी करणाऱ्या शे...
नांदेडमधील वाढत्या वीज तक्रारींवर महापौरांची गंभीर दखल; महावितरणसोबत तातडीची आढावा बैठक

नांदेडमधील वाढत्या वीज तक्रारींवर महापौरांची गंभीर दखल; महावितरणसोबत तातडीची आढावा बैठक

राजकारण
नांदेड | नांदेड शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याने महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी या समस्येची गंभीर दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची आढावा बैठक घेतली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत पार पडलेल्या या बैठकीत वीजपुरवठ्यातील अडचणी, वारंवार होणारे खंडित पुरवठे, कमी दाबाची समस्या तसेच नागरिकांच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महापौरांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त करत महावितरण अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस उपमहापौर दिपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, माजी उपमहापौर सतीश देशमुख, नगरसेवक संजय मोरे, अभिषेक सौदे, राजू काळे, तुलजेश यादव, राजेश यन्नम यांच्यासह महावितरणचे अधीक्षक अभियंता विनय घनबाहादुर, अतिरिक्त कार्...
नांदेडमध्ये अवैध वाळूविरुद्ध मोठी कारवाई; 87.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये अवैध वाळूविरुद्ध मोठी कारवाई; 87.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलीस विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल 87 लाख 20 हजार रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पथकाला नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कल्हाळ शिवारात पाठविण्यात आले होते. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता छापा टाकण्यात आला असता, गोदावरी नदीपात्रातून इंजिन बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईदरम्यान तीन इंजिन बोटी, एक फायबर बोट, वाळूने भरलेले 34 तराफे, भारत बेंझ कंपनीचा एक हायवा, एक JCB मशीन आणि सुमारे 640 ब्रास वाळू असा एकूण 87.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण प...
नांदेड शहरात मटका अड्ड्यावर धाड; 13 जणांवर कारवाई, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड शहरात मटका अड्ड्यावर धाड; 13 जणांवर कारवाई, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील वजिराबाद पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 13 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, 92 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध व्यवसायविरोधी पथकाला मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, 28 एप्रिल 2026 रोजी कलामंदिर बसस्थानकाजवळील एका शेडमध्ये छापा टाकण्यात आला. या छाप्यात मटका खेळताना 9 जणांना रंगेहात पकडण्यात आले. तपासणीदरम्यान आरोपींकडून 37,600 रुपये रोख रक्कम, 26,500 रुपयांचे 7 मोबाईल फोन तसेच 28,000 रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 92,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चौकशी केली असता, मटका व्यवसायाचे मुख्य सूत्रधार म्हणून कमल यादव (दिलीपसिंह कॉलनी), अन्वर शेख (समीराबाग, खडकपुरा), माधव भुसेवाड...
नांदेड जिल्ह्यात स्व-गणनेचे आवाहन; 1 ते 15 मेदरम्यान नागरिकांनी सहभागी व्हावे

नांदेड जिल्ह्यात स्व-गणनेचे आवाहन; 1 ते 15 मेदरम्यान नागरिकांनी सहभागी व्हावे

सामाजिक
नांदेड| भारताची जनगणना-2027 ही देशातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार असून, त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी 1 ते 15 मे दरम्यान जास्तीत जास्त स्व-गणना करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हा नियोजन भवन येथे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी तसेच एनएसएस व एनसीसी समुपदेशकांची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी डिजिटल जनगणनेच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत स्व-गणनेचे महत्त्व अधोरेखित केले. स्व-गणनेसाठी नागरिकांना 1 ते 15 मे 2026 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर माहिती भरता येणार आहे. नोंदवलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत स्व-गणनेत सहभागी व्हावे आणि नांदेड जिल्ह्याला राज्यात अग्रस्थानी आणण्यासाठी यो...
error: Content is protected !!