आरोग्य

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

आरोग्य यंत्रणेला नवा श्वास; सर्व आरोग्य समित्यांच्या पुनरुज्जीवनाचे आदेश

आरोग्य यंत्रणेला नवा श्वास; सर्व आरोग्य समित्यांच्या पुनरुज्जीवनाचे आदेश

आरोग्य
नांदेड| राज्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा मिळावी यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य समित्यांचे तातडीने पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असलेल्या रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS) तसेच ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अनेक ठिकाणी या समित्या निष्क्रिय झाल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात VHNSC मार्फत स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा आणि प्राथमिक आरोग्य सेवा यावर लक्ष दिले जाते, तर शहरी भागात MAS ही महिला-के...
उद्घाटनानंतरच कुलूप! हिमायतनगरात आयुष्मान आरोग्य मंदिर वर्षभरापासून बंद

उद्घाटनानंतरच कुलूप! हिमायतनगरात आयुष्मान आरोग्य मंदिर वर्षभरापासून बंद

आरोग्य, सामाजिक
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड हिमायतनगर, अनिल मादसवार | सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मागील वर्षी हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये येणाऱ्या संभाजीनगर येथे मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेले “आयुष्मान आरोग्य मंदिर” उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवसापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल वर्षभर उलटूनही हे केंद्र बंदच असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांच्या मते, उद्घाटनाच्या दिवशी मोठ्या घोषणाबाजी आणि गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात सेवा सुरू होण्याऐवजी दुसऱ्याच दिवशी दाराला कुलूप लागले. त्यानंतर आजपर्यंत येथे कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे “हे आरोग्य मंदिर आहे की बंद मंदिर?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आधीच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मर्यादित असताना अशा प्रकारे उभारलेले केंद्र निष्क्रिय ठेवणे ही ग...
जागतिक हिवताप दिन नांदेड येथे साजरा

जागतिक हिवताप दिन नांदेड येथे साजरा

आरोग्य
नांदेड| “जागतिक हिवताप दिन” निमित्त आज नांदेड येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला महात्मा गांधी पुतळा येथून सुरुवात करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आले. रॅलीची सुरुवात मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठे आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बद्दीओदीन सर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी सहाय्यक अधीक्षक विजय चव्हाण, आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले, गंगाधर गनलेवार, आरोग्य निरीक्षक माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, बालाजी निलपत्रेवार, अरुण आळणे, सुरेश आरगूलवार, मनोहर खानसोळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विलास नाईक, सचिव दळवी, राजू शेट्टे, वैभव कौशल्ये तसेच आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्रीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप ...
कुंटूर तांडा येथे डेंग्यूचा संशय; जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण यांची तातडीची भेट

कुंटूर तांडा येथे डेंग्यूचा संशय; जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण यांची तातडीची भेट

आरोग्य
नांदेड/नायगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुंटूर तांडा येथे डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण यांनी जिल्हास्तरीय पथकासह मंगळवारी (दि. २२ एप्रिल) भेट देत परिस्थितीची पाहणी केली. या भेटीदरम्यान पथकाने संशयित रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी केली तसेच ताप रुग्णांचे सर्वेक्षण, अबेटिंग आणि किटकशास्त्रीय सर्वेक्षणाची मोहीम राबवली. काही रुग्ण नांदेड येथे उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाने ग्रामस्थांना डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना सांगितल्या. परिसर स्वच्छ ठेवणे, नाल्या वाहत्या ठेवणे, घरातील पाणीसाठे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवणे (ड्राय डे) तसेच डेंग्यूची लक्षणे ओळखून त्वरित उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांसोबत कॉर्नर बैठक घेऊन आरोग्य शिक्षणही देण्यात आले. तसेच ग्रामविकास...
कामारीत भव्य मोफत आरोग्य शिबिर; ५००हून अधिक रुग्णांची तपासणी

कामारीत भव्य मोफत आरोग्य शिबिर; ५००हून अधिक रुग्णांची तपासणी

आरोग्य
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून कामारी येथे आज भव्य मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ५००हून अधिक रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले, तर सुमारे २०० रुग्णांना पुढील तपासणी व शस्त्रक्रियेसाठी वर्धा येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. वर्धा येथे जाण्यासाठी मोफत बस सेवा, राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था, सर्व तपासण्या व उपचार विनामूल्य, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमास आमदारांचे चिरंजीव शिवराज पाटील यांच्यासह दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले असून, ...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून नांदेडमध्ये १०६७ रुग्णांना ८.२१ कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून नांदेडमध्ये १०६७ रुग्णांना ८.२१ कोटींची मदत

आरोग्य
नांदेड (प्रतिनिधी) शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रभावी आधार ठरत असून, नांदेड जिल्ह्यात आर्थिक वर्षात १,०६७ रुग्णांना सुमारे ८ कोटी २१ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून या योजनेत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. जिल्हा कक्षांची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, अर्जांचा तातडीने निपटारा यामुळे मदत वितरण अधिक वेगवान व पारदर्शक झाले आहे. तसेच, सामंजस्य करार (MoU) आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून विविध रुग्णालये, धर्मादाय संस्था व दाते यांचे सहकार्य मिळत आहे. २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वर्षे), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, नवज...
‘सखी’ वन स्टॉप सेंटरमुळे नांदेडमध्ये १,१७५ महिलांना आधार; संकटात ठरते विश्वासाचे ठिकाण

‘सखी’ वन स्टॉप सेंटरमुळे नांदेडमध्ये १,१७५ महिलांना आधार; संकटात ठरते विश्वासाचे ठिकाण

आरोग्य
नांदेड(प्रतिनिधी) घरगुती हिंसाचारापासून सामाजिक अन्यायापर्यंत विविध संकटांना सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी नांदेड येथील ‘सखी’ वन स्टॉप सेंटर हे केंद्र खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १ हजार १७५ महिलांना मदत मिळाली असून, शेकडो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश आले आहे. महिलांना अनेकदा घराच्या चार भिंतीत किंवा सार्वजनिक ठिकाणी अन्याय सहन करावा लागतो. अशा वेळी तक्रार कुठे करावी, मदत कुठून मिळवावी हा प्रश्न उभा राहतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘वन स्टॉप सेंटर’ अर्थात ‘सखी केंद्र’ ही संकल्पना सुरू केली. नांदेडमध्ये १७ जून २०१७ रोजी या केंद्राची स्थापना झाली असून, अल्पावधीतच हे केंद्र महिलांसाठी विश्वासाचे ठिकाण बनले आहे. विविध सेवांमुळे महिलांना दिलासा नांदेड सखी केंद्रात आतापर्यंत आलेल्या १,१७५ प्रकरणांमध्ये सर्व महिलांचे समुपदेशन करण्...
नांदेडमध्ये मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिर; २७ मुलींना लाभ

नांदेडमध्ये मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिर; २७ मुलींना लाभ

आरोग्य
नांदेड| मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुमती व्याहाळकर यांच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडले. शिवशक्तीनगर येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रमेश माने यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेश नारलावार होते, तर शीतल खांडील यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमांतर्गत १४ ते १५ वर्षे वयोगटातील २७ मुलींना सुमारे ₹४५०० किंमतीची एचपीव्ही लस पूर्णपणे मोफत देण्यात आली. भाजप नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्रेकरू संघ आणि मनपा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभ...
प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

आरोग्य, शेती
हदगाव (गौतम वाठोरे) एकीकडे विकासाच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे हदगाव तालुक्यातील शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्जमुक्तीचा रखडलेला प्रश्न, पीक विम्यातील अडचणी आणि उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत “निवडणुकीपुरते दर्शन देणारे नेते जनतेच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. हवामान बदलामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना शेतकऱ्यांना ना कर्जमुक्तीचा लाभ मिळतो आहे, ना वेळेवर पीक विमा. विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हदगाव शाखेत ‘KYC’ प्रक्रियेच्या नावाखाली ग्र...
कामारी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

कामारी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

आरोग्य
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने कामारी (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत जिल्हा परिषद शाळा, कामारी येथे पार पडणार आहे. या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी विविध आजारांची मोफत तपासणी, उपचार तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच गरजूंना मोफत औषध वितरणाचीही सुविधा देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असून मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिक माहितीसाठी मुरलीधर उमाटे (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता) – 9921112903, आमदार बाबुराव कदम कोहळीकर सं...
error: Content is protected !!