करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिमायतनगरच्या कन्येचा पुण्यात डंका; ‘नवराष्ट्र डिजिटल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ने श्रीमयी सूर्यवंशी सन्मानित

हिमायतनगरच्या कन्येचा पुण्यात डंका; ‘नवराष्ट्र डिजिटल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ने श्रीमयी सूर्यवंशी सन्मानित

करियर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| छोट्याशा हिमायतनगर शहरातून मोठी झेप घेत सोशल मीडियाच्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रीमयी शितल श्रीनिवास सूर्यवंशी हिने पुन्हा एकदा आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. आपल्या अप्रतिम नृत्यकला, मनमोहक हावभाव आणि आकर्षक सादरीकरणाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हिमायतनगरच्या या कन्येचा पुण्यात एका भव्य सोहळ्यात सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध माध्यम समूह ‘नवभारत-नवराष्ट्र’ यांच्या वतीने पुण्यातील पंचतारांकित हॉटेल हयात रीजन्सी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘डिजिटल इन्फ्लुएन्सर समिट २०२६’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात श्रीमयीला मानाचा ‘डिजिटल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे हिमायतनगरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्रीमयी सूर्यवंशी हिने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय ड...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार लक्ष्मणराव भवरे यांना जाहीर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार लक्ष्मणराव भवरे यांना जाहीर

करियर
नांदेड | नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव भवरे (कामारीकर) यांना यंदाचा “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 23 मे रोजी नाशिक येथील समुद्र लॉन्स येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते तसेच पणतू व रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अ‍ॅड. अमन आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उप...
महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी नारायण माने सोनारीकर यांची निवड

महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी नारायण माने सोनारीकर यांची निवड

करियर
हिमायतनगर | महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी नारायण माने सोनारीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच तालुका उपाध्यक्षपदी अमोल कलाणे कामारवाडीकर, तर शहरी उपाध्यक्षपदी राम पाटील पतंगे पारवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड येथे महाराष्ट्र कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीशभाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत हिमायतनगर तालुका कार्यकारिणी नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. मागील वर्षभरापासून शहराध्यक्ष म्हणून काम करताना तालुकाभर शाखा स्थापन करून समाजाच्या विविध प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत संघटनेची व्याप्ती वाढविण्यात नारायण माने सोनारीकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या कार्यशैली, नेतृत्वगुण व संघटन कौशल्याची दखल घेत त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीत प्रदेश सचिव व्यंक...
जेईई-ॲडव्हान्स्ड परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जेईई-ॲडव्हान्स्ड परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

करियर
नांदेड| नांदेड जिल्ह्यात रविवारी, 17 मे 2026 रोजी होणाऱ्या JEE-Advanced 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. ही परीक्षा सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार असून, जिल्ह्यातील खालील चार परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे : आर.जी.जी. हायटेक डिजिटल झोन / राजीव गांधी कॉलेज कॅम्पस, विद्युत नगर, नांदेड आय ऑन डिजिटल झोन, विष्णुपुरी, नांदेड एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी संयोग कॅम्पस, नांदेड श्री संभाजी कॉलेज ऑफ प्रायमरी शामल एज्युकेशन कॅम्पस, देगाव रोड समोर, नांदला दिग्रस खडकूत येथे होणार आहे. आदेशानुसार, 17 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्ष...
नांदेड जिल्हा वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. यदुपत अर्धापूरकर यांची निवड

नांदेड जिल्हा वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. यदुपत अर्धापूरकर यांची निवड

करियर
गुरुद्वारा मार्केट व्यापाऱ्यांकडून सत्कार नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्हा अधिवक्ता संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. यदुपत अर्धापूरकर यांची निवड झाल्याबद्दल गुरुद्वारा मार्केट व्यापाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अर्धापूरकर यांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला नवज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार नौनिहालसिंह जहागीरदार, सरदार नवज्योतसिंह जहागीरदार, सरदार कुलप्रकाशसिंह लिखारी, सरदार सतपालसिंह गिल, सरदार परविंदरसिंह शाहू, सरदार गणपतसिंह कामठेकर, सरदार हरमीतसिंह रागी, विष्णू वट्टमवार आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी अँड. अर्धापूरकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा अधिवक्ता संघाच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी ते प्रभावी काम करतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्य...
गुरुद्वारा सचखंड बोर्डाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; विविध विकासकामांचे उद्घाटन

गुरुद्वारा सचखंड बोर्डाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; विविध विकासकामांचे उद्घाटन

करियर, स्थानिक
नांदेड| श्री हजूर साहिब, नांदेड येथील गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ IAS (Retd.) यांनी शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेत अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले. सचखंड पब्लिक स्कूल आणि खालसा हायस्कूलमधील इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 2100 रुपयांऐवजी 5100 रुपये, 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांना 1100 रुपयांऐवजी 3100 रुपये, 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांना 700 रुपयांऐवजी 2100 रुपये तर 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 1100 रुपयांचे प्र...
टेंभीच्या कु. सोनाली सुरमवाड हिचे दहावीत घवघवीत यश

टेंभीच्या कु. सोनाली सुरमवाड हिचे दहावीत घवघवीत यश

करियर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथील कु. सोनाली संतोष सुरमवाड हिने इयत्ता दहावी शालांत परीक्षेत 94.40 टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिने हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयात शिक्षण घेत हे उल्लेखनीय यश संपादन केले. ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे. तिच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षणप्रेमी पालकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. कु. सोनालीच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे....
गुरुकुल इंग्लिश स्कूलचा दहावीला 100 टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

गुरुकुल इंग्लिश स्कूलचा दहावीला 100 टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

करियर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| येथील गुरुकुल इंग्लिश स्कुल (Gurukul English School) ने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सन 2026 च्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा शाळेतून 27 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 10 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, 10 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 7 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शाळेतील गुणवंत विद्यार्थी: स्वप्नील माधव मेटकर 90%, कु. रिना रामराव राठोड 89%, कु. वैष्णवी द‌त्तालय हँगरगे हीने 88.20%, कु साशी नथुराम कावडे 87.20% राठोड मांगीलाल अमरसिंग 82.60%, शेख फैजान शेख अजीज 82.20%, तुळसे स्वराज शंकर 78.60%, कु.श्रद्धा गणेश संगनवाड 77.20%, रायपलवार यश सतिश 76-40%, ...
हिमायतनगरच्या राजा भगीरथ विद्यालयाची एसएससी परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

हिमायतनगरच्या राजा भगीरथ विद्यालयाची एसएससी परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

करियर
हिमायतनगर| एसएससी बोर्ड परीक्षा 2025-26 च्या निकालात राजा भगीरथ विद्यालय, हिमायतनगरने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करून शाळेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील वाघमारे पूजा तुळशीराम हिने 96 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कदम रुद्र रमेशराव व शिंदे सोहम दयानंद यांनी प्रत्येकी 93.40 टक्के गुण मिळवले. तसेच थोंबाळे समीक्षा गुरुप्रसाद (92%), सूर्यवंशी सानिका यशवंत (91.60%), वानखेडे ऋतुराज नामदेव (91.40%), सूर्यवंशी वेदिका देविदास (91.20%), सूर्यवंशी मुक्ता आत्माराम (90.60%), सुरोसे राघवेंद्र अंगद (90.40%) आणि शिंदे अभिजीत परमेश्वर (90%) यांनीही घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे....
अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती

अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती

करियर
नागपूर| राज्य सेवाहक्क आयोगाच्या अमरावती विभागाच्या आयुक्तपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तथा म्हाडाचे सेवानिवृत्त मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे मंगळवार दि. 12 मे रोजी आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात येणार आहे. अरुण डोंगरे यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत विविध महत्त्वाच्या पदांवर उल्लेखनीय कार्य केले आहे. उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून मंगरूळपीर येथून त्यांनी शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर मूर्तिजापूर, दारव्हा, अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती तसेच महसूल उपायुक्त अमरावती व नागपूर या पदांवर त्यांनी काम पाहिले. अमरावती महापालिका आयुक्त असताना शहर विकासासोबत ऑनलाइन इमारत परवाना प्रणाली प्रभावीपणे लागू केली. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
error: Content is protected !!