
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| येथील गुरुकुल इंग्लिश स्कुल (Gurukul English School) ने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सन 2026 च्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.


यंदा शाळेतून 27 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 10 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, 10 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 7 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


शाळेतील गुणवंत विद्यार्थी: स्वप्नील माधव मेटकर 90%, कु. रिना रामराव राठोड 89%, कु. वैष्णवी दत्तालय हँगरगे हीने 88.20%, कु साशी नथुराम कावडे 87.20% राठोड मांगीलाल अमरसिंग 82.60%, शेख फैजान शेख अजीज 82.20%, तुळसे स्वराज शंकर 78.60%, कु.श्रद्धा गणेश संगनवाड 77.20%, रायपलवार यश सतिश 76-40%, सय्यद सलीम सय्यद रजा 75%, अमीना अक्सा सलीमोहीन 75%, कु-सबा जावेद अदमानकर 73-80%, दिपक संतोष राठोड 73.48%.


साक्षी दामोधर काळे 71.40%,कु.मनिषा गुलाब राठोड 71.20%, प्रतीक धम्मदीप थोरात 69%, करण विलास जाधव 66.40%, कु.स्नेहा रविंद्र शिंदे 66%, अंश प्रविण डाकोरे 65%. सय्यद सलीम सय्यद ईसा 62%, कु. दिव्या राजु हटकर 61%, कु. ऋतुजा भदेवाड 58%, मनोहर सुनिल राठोड 53%, गजानन अनिल आडे 53%, कु. ऋतुजा विनोद आडे 53%, रहेमान शेख आजीम 48%, शेख शहीद शेख जबी 48%, हामजा जावेद मोहम्मद 42% असे विद्यार्थी व विदयार्थीनिंचे नावं आहेत.


या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. मनोहर राठोड, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देत गुरुकुल इंग्लिश स्कूलने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
